बाराची गाडीबी गेली
पाव्हणं र्हावा की इथंच, लई रात झाली
आता जाशीला कसं? बाराची गाडीबी गेली ||धृ||
कोरसः अहो दाजी, आज नका जावू, उद्याच्याला पाहू, कशाला काळजी करता
मन नका मारू, उगा नका झुरू, मैनेचा आग्रह मोडू नका
जत्रा फिरली दिसभर
पाळण्यात झुललो खालीवर
बंदूकीनं फुगं फोडलं, लई मज्जा आली
फ्येटेवालं र्हावा की इथंच, लई रात झाली ||१||
कांदा इकुनशान पैका येईल
उस तयार हाय, कारखान्यात जाईल
तकतक कशापाई, काळजी रोजचीच मेली!
फ्येटेवालं र्हावा की इथंच, लई रात झाली ||२||
कशापाई जाता, लगेच निघता
मन न्हाई तरी चपला घालता
घरी सांगा की तब्बेत नव्हती बरी
टोपीवालं र्हावा की इथंच, लई रात झाली ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०२/२०११

No comments:
Post a Comment