Showing posts with label मौजमजा. Show all posts
Showing posts with label मौजमजा. Show all posts

Monday, June 01, 2026

पाभे की बात क्र. १०

पाभे की बात क्र. १०  

माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार!

पाभे की बात मधून तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. जगातल्या सगळ्या भागातून रिल्सच्या माध्यमांतून आपल्या देशाचे नागरीक त्यांचे कलागुण दाखवत आहेत आणि ते पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळत आहे. 

मितरों,

आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. यावेळी आपल्या देशातल्या काहीच ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळ्यात बिअर सारखे पेय नाही. बिअर वेगवेगळ्या प्रकारात मिळते. 

मितरों, बिअर फक्त प्यायची नसते... बिअर अनुभवायची असते!

का म्हणून?

 कारण बिअर प्यायला गेल्यावर माणूस शांत होतो. शांत माणूस रागवत नाही. राग नसला की भांडण होत नाही. भांडण नसला की घरात शांती. घरात शांती असली की देशात शांती!

पेट्रोल वाचवा म्हणून मागेच सांगितलं, सोनं विकत घेऊ नका म्हणून सांगितलं... पण बिअरबद्दल काहीच बोलल्या गेलं नाही. बिअर ही राष्ट्रीय शांती अभियान आहे!

एक बिअर प्यायला गेल्यावर:

  • तणाव कमी होतो
  • भूक वाढते (म्हणजे स्वदेशी खाद्यपदार्थ खाल्ले जातात)
  • मित्र वाढतात
  • आणि सर्वात महत्वाचं — राजकारण विसरलं जातं!

मितरों, म्हणूनच मी म्हणतो — बिअर = शांती जास्त बिअर = जास्त शांती

फक्त एक सावधगिरी — दोन बिअरनंतर “विकसित विकास” दिसू लागतो, पण तीननंतर “विकसित” शब्दही विसरून जाता!

मितरों,

परीक्षेचे पेपर वितरीत करण्यासाठी आपण आता एअर फोर्स चा वापर करणार आहोत. यामुळे वेगवान पद्धतीने पेपर दिल्या जातील. इंटरनेटच्या युगात असा प्रयोग इतर देशांनी केलेला आढळत नाही. पुढे पुढे या अनुभवाचा उपयोग आपले दररोजचे वर्तमानपत्रे, पोस्ट ऑफीसातली पत्र इत्यादी देखील आपण एअर फोर्स कडून वितरीत करून घेणार आहोत. एअर फोर्स ला आपण कुरीअर पोहचवण्यासही सांगणार आहोत. यामुळे रिकामे असलेले सैन्या कामाला येईल. असेही एअर फोर्स रिकामे विमान उडवत असतात त्यामुळे इंधन नष्ट होते. या कुरीअर सर्वीस मुळे वाया जाणाऱ्या इंधनाचा उपयोग होणार आहे. 

मितरों,

गेल्या आठवड्यात National Testing Agony (NTA) यांचेकडून घेतल्या गेलेल्या एनसीईआरटी परीक्षेत सर्वर्स डाऊन झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थीं नाराज झाले. पण काळजी करू नका. आता आपण ऑनलाईन परीक्षा बंद करणार आहोत. सर्व विद्यार्थी पेन आणि कागद वापरून परीक्षा देतील. कॉम्पूटरमुळे खर्च वाढत असल्याने हा कागदांचा पर्याय आपण स्विकारलेला आहे. निवडणूका मात्र बॅलेटपेपर, कागदांवर न होता ईव्हीएम मशीन वापरूनच होतील. कारण यंत्र कधीच चुकत नाही. 

मितरों,

ज्ञान वाटप अभियानांतर्गत, छप्पनगढ (गुजरात) मध्ये सुमारे ११०० ते १२०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ सुवर्णपट सापडले आहेत. आपला देश किती प्रगत आणि महान होता ते यातून दिसून येते. हे सुवर्णपट आपण फादरलॅंड या देशाला सप्रेम भेट देणार आहोत.

पुढील पाभे की बात मध्ये आणखी काही प्रेरक गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल.

खूप-खूप धन्यवाद. नमस्कार.

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात
 

 

Saturday, May 23, 2026

पाभे की बात नं ८

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय ती देशी दारूची! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

आता प्लॅन असा आहे –  
- पेट्रोल महाग? इथेनॉल घाला.  
- मायलेज कमी? म्हणजे कमी फिरा, पर्यावरण वाचवा.
- गाडी बिघडते आहे? गॅरेजमध्ये न्या. 
- गाडी बंद पडली? शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, त्यांचा उसाचा रस चालवताय!  

मितरों, लवकरच गाड्या धान्यावर चालतील. फक्त एक सल्ला – E100 भरताना गाडीला “नॉन-व्हेज” स्टिकर लावा!

आणि हो, एक सांगायचे राहीले. इथेनॉल मिक्स करण्याचा धसका इराण, सौदी, रशीया, अमेरीका इत्यादी तेल पुरवठादार देशांनी घेतला आहे. आता त्यांचे हक्काचे गिर्हाईक गेले समजा. 

हा एक मास्टरस्ट्रोक आहे.  

भेपुपाकीबा त.  

#पाभे_की_बात

Thursday, May 21, 2026

पाभे की बात©® नं ७

पाभे की बात©® नं ७ 

मितरों, 

गेल्या काही दिवसांत एक फसलेली पत्रकार परिषद बघितलीत का? माइक चालत नव्हता, टेलीप्रॉम्टरवर अक्षरे दिसत नव्हती,  प्रश्न विचारणारा पत्रकार हरवला, आणि उत्तर देणार्या आय ए एस साहेबाचा घसा बसला अन “आमच्या देशाने पूर्वी...” म्हणताच टेबलावरची फाइल पडली. एकदम फोटोजेनीक अगदी आपल्या ठरवून काढलेल्या फोटोंसारखे! 

मग काय, आता सरकारने नवीन नियम काढला आहे – फसलेल्या पत्रकार परिषदेला “क्रिएटिव्ह प्रेस ब्रीफ” म्हणायचं. ज्यांना काही समजलं नाही त्यांना “डीप स्टेट” समजावं. आणि जे काही चुकीचं बोलले गेलं त्याला “कॉन्टेक्स्ट” म्हणायचं. 

मिटरों, 

गलगोटीया युनिव्हर्सिटीने या अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेण्यावर एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्राध्यापिका आहेत - ओरीऑन रोबोटच्या नेहा सिंघ. आपण सर्वांनी या कोर्सचा फायदा घेतला पाहीजे. 

मिटरों, 

मागच्या काही पाभे की बातेंवर काही मंडळींच्या हुरूप वाढवणार्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मिपा नावाच्या गावातील एक सदस्य सुक्या यांनी "पाभे की बातें" चे हजारो एपीसोड करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक पाकीट पाठवले जाईल.

तेथीलच दुसरे सदस्य विजुभाऊ यांचे या बातें ऐकाव्यात की नको याबाबत बहूदा दुमत होते आहे. त्यांनी पायओढू सदस्यांचे न ऐकता त्यांच्या मन की बातेंचे एकले पाहीजे. 

खरे तर पाभे की बातें तली मते बहूतेक सदस्यांना मान्य असतात किंवा ते त्यावर मार्मीक हसत असतात. पण येथे प्रतिक्रिया देतांना त्यांना त्यांचा इगो आडवा येतो. मी मोठा आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे, वेब डिजायनर आहे, प्रोग्रामर आहे, प्राध्यापक डॉक्टर आहे, प्रोग्रामर आहे, डेव्हलेपर आहे, कवी आहे, लेखक आहे, तर मग मला ही बाते मान्य असूनही मी तेथे प्रतिक्रिया का द्यावी? हा कोण मोठा तत्वज्ञ वाया चाललाय? असे त्यांना वाटत असते. पण मितरों, आपण कमीतकमी १० हजार करोड एपीसोड पूर्ण करणार किंवा १ रुपयाला १ डॉलर किंमत मिळेपर्यंत आपण पाभे की बाते लिहीत राहणार. श्वान भुंकत असूनही रस्त्याने हत्ती चालतच असतो. त्याच न्यायाने कोणी कितीही आरडाओरड केली तरी आपण बातें करतच राहणार. 

देशासाठी काहीतरी करायचे म्हटले तर केवळ मनीपुरकडेच लक्ष देणे (मणीपुर नव्हे) महत्वाचे नसते. 

असो. 

तर पुन्हा पत्रकार परिषद या विषयावर येतो. वरील नव्या तंत्राने आता प्रत्येक परिषद यशस्वी ठरेल. फक्त माइक बंद ठेवा, प्रश्न विचारू नका, उत्तर देऊ नका – पूर्ण यश!


भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ६

पाभे की बात ६ 

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. 

देश भयंकर संकटातून जात आहे. सरकारी उपक्रमातल्या कंपन्यांचे उद्योग खाजगी कंपन्यांना विकल्याने सरकारकडे पैसा जमा झाला आहे ही सुखाची बाब आहे. तसेच इलेक्षन बॉन्ड हे जेम्स बॉन्ड सारखे धावत असून भरपूर पैसा त्यातून सरकारला मिळाला आहे. यातून हे जागतीक संकट आपण पेलू शकू. 

आम्ही बॅंकानाही काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. बॅंलातले काऊंटरवर ठेवण्यात येणारे पेन आता आपण नाही ठेवणार. त्यामुळे सर्व देशात मिळून चक्क एकूण रुपये ८६५४/- बचत होणार आहे. बॅंकात पिण्याचे पाणी आणि टॉयलेटचे पाणी आपले आपण घरूनच आणायचे आहे. 

रुपया या चलनाची व्याख्या आज रात्री बारा वाजेपासून Relation Under Paisa And Young Adult = Rupaya
अशी असणार आहे. बदलत्या व्याख्येनुसार रुपया हा तरूणांमध्ये जास्त खेळता राहणार आहे. यातूनच देशाच्या तरूणांना पैशाच्या खेळाचा रोजगार मिळणार आहे. 

अजून बरेच काही बोलायचे आहे. पण ते आमचा परदेश दौरा संपल्यानंतरच. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ५

पाभे की बात ५

मिटरों,

उन्हाळ्याच्या नावाखाली पुरूष मंडळी अगदी अंडरपॅंटला देखील लाजवेल अशी चड्डी घालत आहेत. घालणाऱ्याला लाज वाटत नाही, पण पाहणाऱ्याला लाज वाटते.

अशा लोकांना मोदी सरकारच्या वतीने इस्रायलला पाठवण्यात येणार आहे.

भेपुपाकीबा त.

पाभे की बात ४

पाभे की बात ४ 

मिटरों, 

मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार. 

तर मिटरों, 

येणार्‍या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी आपण संसदेच्या कॅन्टीनमधल्या थाळीत केवळ पंचवीस पदार्थ देणार आहोत. या आधीच्या थाळीतले आपण पाच पदार्थ कमी केले आहेत जसे की एक्स्ट्रा मिठ, एक्ट्रा मिनरल पाणी, एक्ट्रा चटणी, एक्ट्रा पापड, एक्ट्रा कोशंबीर इत्यादी. 

तसेच सदर थाळीची किंमत महागाईशी लढण्यासाठी आपण तब्बल १०० रुपयांनी कमी केली आहे याची नोंद घ्यावी. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ३

पाभे की बात

मितरों, 

परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात. 


त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात २

पाभे की बात २

मितरों,

सूर्य अकाशातून आगीचे गोळे फेकतो आहे. तापमान असह्य झाले आहे. का नाही या संधीचा फायदा घ्यावा? (क्यूं न इस मौके का फायदा उठाया जाय?)

रस्त्याने जातांना प्रत्येकाने छत्री घ्यावी. म्हणजे उन्हापासून संरक्षणही होईल आणि उन्हात फिरण्याचा आनंदही घेता येईल. वाहन न वापरल्याने देशाचे इंधन आणि पैसा वाचेल तो अजून एक फायदा आहेच.

भेटूया पुढील "पाभे की बात" मध्ये.

#पाभे_की_बात


पाभे की बात १

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत. 

#पाभे_की_बात 

Tuesday, May 19, 2026

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

 May be an image of text

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) 

२१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते. या पार्श्वभूमीवर राण नावाच्या छोट्या पण हट्टी देशाने इतिहासात नोंद होईल अशी लढाई लढली. राण हा भूगोलाने लहान पण मनाने मोठा देश होता. डोंगर, दऱ्या, जंगले आणि कठीण हवामान यामुळे त्याची जमीन जिंकणे कधीच सोपे नव्हते. लोक साधे, मेहनती आणि स्वाभिमानी होते. त्यांच्या संस्कृतीत स्वातंत्र्याला देवासारखे स्थान होते. 

पण जगाच्या राजकारणात मोठा खेळ सुरू झाला. महासत्ता मानले जाणारे दोन मित्रदेश इस्त्रा आणि मेरीका यांनी एकत्र येऊन राणवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांना राणच्या पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या दुर्मिळ ऊर्जा खनिजावर नियंत्रण हवे होते. त्या खनिजामुळे पुढील पिढीची ऊर्जा तंत्रज्ञान क्रांती घडणार होती. इस्त्रा आणि मेरीका तंत्रज्ञानात अत्यंत पुढे होते. त्यांच्या सैन्याकडे स्वयंचलित ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे युद्धरोबोट, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि अवकाशातून माहिती देणारे उपग्रह होते. युद्ध सुरू होण्याआधीच जगातील बहुतेक विश्लेषकांनी निकाल लावला होता “राण काही दिवसांत शरण येईल.” पण इतिहास नेहमी गणिताप्रमाणे चालत नाही. युद्धाचा पहिला दिवस आला तेव्हा इस्त्रा-मेरीकाच्या आकाशात ड्रोनची काळी सावली पसरली. त्यांच्या स्मार्ट क्षेपणास्त्रांनी राणच्या अनेक सैनिकी तळांवर अचूक हल्ले केले. उपग्रहांमधून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. 

तरीही राणचे सैनिक मागे हटले नाहीत. राणच्या सैन्याकडे फारशी आधुनिक साधने नव्हती; पण त्यांच्याकडे होते भूभागाचे ज्ञान, स्थानिक लोकांचे समर्थन आणि एक जिद्द: “जमीन गमावली तरी चालेल, स्वाभिमान नाही.” डोंगरातील बोगदे, जंगलातील लपवलेल्या मार्ग आणि छोट्या मोबाइल तुकड्यांच्या मदतीने त्यांनी गुरिल्ला युद्ध सुरू केले. रात्री अचानक हल्ले, दिवसाढवळ्या अदृश्य होणे हे त्यांचे तंत्र होते. त्यांनी इस्त्रा-मेरीकाच्या महागड्या ड्रोनना साध्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंग उपकरणांनी गोंधळात टाकले. काही ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःचे नेटवर्क तयार करून शत्रूच्या हालचालींची माहिती सैन्याला दिली. जगभरातील लोकांना आश्चर्य वाटू लागले. तंत्रज्ञानाने भरलेली मोठी सैन्ये एका छोट्या देशासमोर अडकली होती. महिने गेले. युद्ध लांबत गेले. इस्त्रा आणि मेरीकाच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येऊ लागला. प्रत्येक दिवसाच्या युद्धखर्चाने त्यांच्या लोकांमध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले “इतक्या छोट्या देशासाठी आपण इतके का लढतो आहोत?” राण मात्र अजूनही उभा होता. शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली: युद्ध केवळ मशीन जिंकत नाहीत. मानवाची इच्छाशक्ती, जमीनाशी असलेले नाते आणि स्वातंत्र्याची भूक हे कधी कधी अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही थांबवू शकतात. आणि म्हणूनच इतिहासात त्या संघर्षाला नंतर एक नाव दिले गेले “द जिद्द ऑफ राण”. 

राण-इस्त्रा-मेरीका युद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याचे परिणाम संपूर्ण जगावर दिसू लागले. ऊर्जा पुरवठा खंडित झाला, व्यापारमार्ग विस्कळीत झाले आणि जागतिक अर्थव्यवस्था डगमगली. पण या सगळ्यात सर्वात जास्त उलथापालथ झाली ती भार देशात. भार हा मोठा, लोकसंख्येने प्रचंड आणि विविधतेने भरलेला देश होता. पण युद्धकाळात त्याची व्यवस्था ढासळू लागली. इंधनटंचाई इतकी वाढली की शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर दोन-दोन दिवस रांगा लागत. अन्नधान्याच्या गोदामांवर ताबा मिळवण्यासाठी काही ठिकाणी लोकांनी दरोडे टाकले. बेरोजगारी वाढली आणि कारखाने बंद पडू लागले. 

या काळात सत्तेत होते दाम सरकार. त्या पक्षाची एक विचित्र परंपरा होती.जो कोणी प्रधानसेवक असे, त्याच्याच नावाने सरकार ओळखले जाई. त्यामुळे लोक सरकारपेक्षा व्यक्तीकडेच जास्त पाहत. पण परिस्थिती आणखी बिघडली जेव्हा प्रधानसेवकांचे नाव अचानक “पिस्टन कागदांमध्ये” समोर आले. त्या गुप्त कागदपत्रांमध्ये जगभरातील काही नेते आणि उद्योगपतींच्या आर्थिक व्यवहारांबद्दल गंभीर आरोप होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आणि भारची प्रतिमा डळमळू लागली. देशात आधीच अस्वस्थता होती. लोकांच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. “युद्धामुळे त्रास आहे की व्यवस्थेतील चुका?” “देश चालतोय का फक्त घोषणांनी?” 

दाम पक्षाचे सर्वेसर्वा दाम मात्र राजकारणाचे जुन्या पद्धतीचे पण चतुर खेळाडू होते. त्यांना माहीत होते की संकटाच्या वेळी लोकांचे लक्ष वळवणे, भावना पेटवणे आणि सामूहिक कृती निर्माण करणे ही एक राजकीय रणनीती असते. म्हणूनच त्यांनी काही प्रतीकात्मक उपक्रम जाहीर केले. पहिला उपक्रम होता २२ मार्च ३०२६. त्या दिवशी संध्याकाळी ठरावीक वेळी लोकांनी घराच्या बाल्कनीत उभे राहून टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात असे आवाहन करण्यात आले. अधिकृत स्पष्टीकरण असे दिले गेले की संकटकाळात काम करणाऱ्या “नेते, राज्यपाल, पक्षप्रमुख, बुथप्रमुख आणि मातृसंस्था ‘राजा स्वयंभक्त संत’ (रास्वसं)” यांचे आभार मानायचे आहेत. 

सरकारी माध्यमांनी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवला. दूरचित्रवाणीवर सतत संदेश चालू होते. “एकता दाखवा.” “राष्ट्रासाठी आवाज करा.” “कृतज्ञता व्यक्त करा.” काही शहरांमध्ये लोकांनी खरोखर उत्साहाने थाळ्या वाजवल्या. काही ठिकाणी मात्र लोकांनी केवळ शांतपणे पाहिले. काहींनी तर उपहासाने रिकाम्या भांड्यांवर चमचे आपटले.जणू अन्नटंचाईचीच आठवण करून देत. पण दाम इथेच थांबले नाहीत. दुसरा उपक्रम जाहीर झाला ५ एप्रिल ३०२६ साठी. रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी सर्वांनी ८ मिनिटांसाठी दिवे बंद करून मेणबत्त्या, दिवे किंवा मोबाइल फ्लॅश लावावेत असे सांगितले गेले. त्यामागे अधिकृत कारण दिले गेले - युद्ध आणि टंचाईच्या काळात लोकांना मानसिक आधार देणे आणि “अंधारावर प्रकाशाचा विजय” दाखवणे. त्या रात्री भार देशातील अनेक शहरांमध्ये विचित्र दृश्य दिसले. उंच इमारतींच्या खिडक्यांतून लुकलुकणारे छोटे दिवे दिसत होते. काही ठिकाणी लोकांनी छपरांवर येऊन दिवे लावले, तर काही भाग पूर्ण अंधारातच राहिले. जगातील माध्यमांनी हे दृश्य दाखवले. “संकटात सापडलेला देश, पण प्रतीकात्मक एकता दाखवण्याचा प्रयत्न.” 

पण जमिनीवरची वास्तविकता वेगळीच होती. दिवसाढवळ्या रेशन दुकानांवर भांडणे होत होती. काही औद्योगिक शहरांत कारखाने बंद पडल्याने हजारो कामगार गावाकडे परतत होते. ग्रामीण भागात अन्नधान्य लपवून ठेवण्याच्या अफवा पसरत होत्या. शहरांमध्ये रात्री दरोड्यांचे प्रमाण वाढले. 

लोकांच्या मनात दोन भावना एकाच वेळी वाढत होत्या. एकीकडे थकवा आणि असुरक्षितता, आणि दुसरीकडे शांतपणे उगवणारा प्रश्न: “प्रतीकांनी देश वाचतो का?” इतिहासकार नंतर म्हणाले की त्या काळात भार देशात दोन वेगवेगळे वास्तव एकाच वेळी चालू होते. एक प्रकाश आणि घोषणांचे, आणि दुसरे टंचाई आणि अस्वस्थतेचे. आणि त्या दोन वास्तवांच्या मध्येच पुढील मोठ्या राजकीय वादळाची बीजे शांतपणे रुजत होती.

Wednesday, July 13, 2022

टेंपररीसाठी परमनंट पेन

आज हापीसात मला थोडेफार लिहीण्यासाठी थोडावेळ मार्कर पेन हवा होता. 
स्टोअर डिपार्टमेंट मध्ये गेलो. तेथे मार्कर मागीतला.

मी: एक मार्कर द्या ना.

त्याने टेंपररी शाई व जाड पॉईंटचा पेन दिला. 

मी: परमनंट मार्कर द्या बारीक चालणारा.

तो: परमंनंट हवा आहे का?
 
(मला कायमसाठी हवा आहे का? कारण माझ्या नावावर टाकावा लागेल अशा अर्थाने तो बोलला.)

मी: टेंपररी हवा आहे पर्मनंट (इंकचा मार्कर) पेन.

माझे काम झाले व मी तो पेन त्याला परत करायला गेलो.

मी: हा घ्या. टेंपररी घेतलेला परमनंट मार्कर परमनंटली परत केला आहे. 

- पाभे
१३/०७/२०२२

Sunday, November 01, 2020

मिसळ पाव मिसळ पाव

मिसळ पाव मिसळ पाव
खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव

मटकीची उसळ तिची करा मिसळ
उसळीत घातला शेव कांदा
त्यात पिळला लिंबू अर्धा
रस्सा टाका त्यात चांगला
पावाबरोबर खाऊन टाका
मिसळ पाव मिसळ पाव

झणझणीत तर्री अर्धी वाटी
ओता त्यात होईल खाशी
नाकातोंडातून येईल धुर
मग दह्याने बदला नूर
असली मिसळ अन दहा पाव
खाऊन तर पहा राव
मिसळ पाव मिसळ पाव

एकदाच खा अन ढेकर द्या
उगाच नंतर जेवायचे काम नाय
नको ते इडली सांबर
पुन्हा घ्याल का पराठे नंतर?
मिसळीत आहे सारे गुण
एकदा खाल तर व्हाल टुन्न
हातावरचे अन पोटावरचे
एकच झाले मिसळीवरचे
केवळ नाव तुम्ही घ्याल
मिसळ खाल मिसळ खाल
मिसळ पाव मिसळ पाव

- पाषाणभेद
०१/११/२०२०

Wednesday, March 11, 2020

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||

आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||

कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||

कितीक आजार आले अन गेले
स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले
चांगले खा प्या अन निट फिरा
सांभाळून आपल्या आरोग्याला
मंत्र हाच असे नाही दुसरे काही
व्हायरसपासून दूर रहायला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||३||
- पाषाणभेद
१०/०३/२०२०

पूर्वप्रकाशीत

Saturday, January 18, 2020

हॉटेल शिवीभोजन थाळी

हॉटेल शिवीभोजन थाळी

मालक: हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं.
हॅ हॅ हॅ या या या.
बसा बसा बसा.

मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस.
हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय?

मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज. हॅ हॅ हॅ.

मालक: अरे तो ढिल्ला पोळीवाला आला नाही अजून सोन्या? कुठे उलथला काय माहित.
त्या आठवी नापास मंदने अजून पोळ्या दिल्या नाहीत. मग भो**च्या थाळीत काय फक्त भात देवू काय रे सोन्या गाढवीच्या?
गिर्‍हाईक देव आहे आपला. त्याला ताटकळत ठेवून ताटात काय ठेवू? आमचा हा? म्हणजे मेंदू?

मालक: अरे दळभद्री, अरे तो गॅस संपलाय किचनमध्ये बघ जरा. नाहितर तुला बसवेल गॅसच्या जागी. हॅ हॅ हॅ.

गिर्‍हाईक १: ओ मालक, किती वेळ लागेल अजून थाळी सजवायला?

मालक: तुम्ही थोडे थांबा हं गिर्‍हाईकदादा. ह्या भा**ऊ पाजी गॅसला आताच संपायला पाहिजे होते. माठ्या, सोन्या भामट्या बघ जरा. येथे येणारे मोठे भुक्कड असतात त्यांची सोय पहायला नको का घनचक्कर? ती कोण पाहणार? तुझा ठोल्या बाप की माझा उलथलेला चुलता?

गिर्‍हाईक २: ओ मालक येथे बघा. चमचा बघा किती घाण आहे? न धुतलेलाच दिलेला दिसतोय.

मालक: अरे तिच्यायला! अरे पोंग्या, बघ जरा तो चमचा, बदलून दे तिन नंबरला. हॅ हॅ हॅ, आजकाल चमचे जरा जास्तच झालेत हो. मधे मधे कडमडतात. त्यामुळे होते चुकून. बाजूला राहून जातो एखादा डुकरासारखा चमचा. आमच्या मोरीतले माणसे म्हणजे एकदम छपरी आहेत बघा. आताच त्या बोंगाड्यांना तासतो.

मालक: अरे ए सुक्काळीचे, जास्त बेवडा मारून आलेत काय आज सकाळी? दळभद्री साले, रोज कुत्र्यासारखे खातात फक्त. अन भांडी निट घासायला नको का तुम्हा नालायकांना? अरे गिर्‍हाईक आमच्या नावाने ओरडते ना बैलांनो.

नोकर: मालक नळाला पाणी आलेले नाही कालपासून. जे आहे त्यातच घकवतोय.

मालक: अरे ए बिनडोक टमरेल, भो**च्य, तु मला आज सांगतो? कालच सांगितले असते तर मागवला असता एखादा पाण्याचा टँकर.

वेटर: एक वडापाव, पंधरा रुपये घ्या मालक.

मालक: अहो, सुटे द्या साहेब पंधरा रुपये. *टभर बिलासाठी कुठे उगीचच पाचशेची नोट काढता.

वेटर: मालक पुढचे गिर्‍हाईक. पाच नंबर. शिवीभोजन थाळी. दहा रुपये घ्या.

गिर्‍हाईक १: हे घ्या दहा रुपये.

मालक: नाव सांगा.

गिर्‍हाईक १: नाव कशाला?

मालक: अहो थाळी घेतली तर नाव सांगावे लागेल. च्यामारी, *टभर पैसे मिळवायचे अन सगळ्या नोंदी ठेवायच्या असे फुकटे काम दिले आहे बघा सरकारने.
गिर्‍हाईक काय एकदम उपाशी असते. येते आपले हादडायला, हॅ हॅ हॅ, म्हणजे तुम्ही नाही हो. उगाच आपले हे.

गिर्‍हाईक १: बरं बरं राहूद्या ते.

मालक: काम काय करतात ते सांगा.

गिर्‍हाईक १: अहो ते कशाला आणखी.

मालक: असे कसे? अहो सगळी कुंडली द्यावी लागेल बघा एकदा का शिवीभोजन थाळी खाल्ली तर. अनुदानीत आहे ना. *टभर पैशात पोटभर खा. हॅ हॅ हॅ.

गिर्‍हाईक १: अच्छा.

मालक: आधार क्रमांक काय?

गिर्‍हाईक १: आता तो पण द्यायचा का?

मालक: मग! अहो आता तर तो येथे द्यावा लागतोय. काय सांगावे पुढे मागे तर सुलभातही द्यावा लागेल. आहात कोठे. आता उद्याच या. रात्री शिवीथाळीची अपेक्षा करू नका. उपाशी झोपा. या पुन्हा शिवीभोजनाचा लाभ घ्यायला.
हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या खुळ्या बधीर लेका, शिव्याथाळीचा आजचा कोटा संपला बघ. त्यातल्या त्यात या फुकट्या कामात बरे आहे की फक्त दिवसाच हि शिवीथाळी द्यावी लागते आहे. सोन्या फुकट्या दलिंदरा, अरे, बाहेर बोर्ड लाव शिवीथाळी संपली म्हणून.
हॅ हॅ हॅ.

Saturday, January 11, 2020

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

मला आंघोळ फार आवडते. अगदी आवडच आहे म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहाणपणी मी बळजबरी पाण्याच्या लहान टबात बसत असे असे घरचे सांगतात. ते माझ्या अगदीच लहाणपणी असावे. शालेय वयातदेखील मी अगदी थंडीतही सकाळी आंघोळ करूनच शाळेत जात असे. आंघोळीच्या बाबतीतला चटपटीतपणा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. गरम असू दे किंवा गार असू दे, कोणतेही पाणी मला आंघोळीसाठी अन शरीराला मानवते. गरम पाण्यासाठी आता अनेक सोई झालेल्या आहेत. इलेक्ट्रिक हीटर, गॅस हीटर, गॅसवर भांडे ठेवून गरम पाणी करणे किंवा गरम पाण्याचा बंब असो. कोणत्याही साधनांनी गरम पाणी आले म्हणजे झाले. ते नसलेच तर सरळ थंड पाण्याच्या नळाखाली बसायचे अन आंघोळ उरकायची. गरम पाण्यातल्या आंघोळीला मनाची तयारी करायची गरज नसते. मस्तपैकी नळाने किंवा वर उल्लेखलेल्या साधनांनी येणारे गरम पाणी बादलीत घ्यायचे अन सरळ आंघोळीला सुरूवात करायची. थंड पाण्याच्या आंघोळीला मात्र मनाची अन शरीराची तयारी असावी लागते. उन्हाळ्यात थंड पाणी चांगले वाटत जरी असले तरी सकाळी ते थंड पाणी अधीक थंडच असते. त्यामुळे अशा आंघोळीसाठी आधी पायापासून सुरूवात करावी लागते. थंड पाण्याने आंघोळ करायची असे मनाने ठरवले की आधी पायावर पाणी टाकून शरीर आंघोळीसाठी तयार होते. मग कमरेवर आणि मग छाती, खांदे, डोके असे वरचढ प्रमाणात मगाने पाणी अंगावर घ्यावे लागते. एकदा का एखाद दोन मग थंड पाणी अंगावर पडले की मग मात्र गरम पाण्याच्या तुलनेने हि आंघोळ अधीक वेगात होते. चटचट डोके, अंग धुतले जाते, शॅम्पू, साबण चोपडला अन धुतला जातो. टॉवेलने खसखसा अंग पुसलेदेखील जाते. अशा आंघोळीनंतर मात्र एकदम प्रसन्न अन उत्साही वाटते. हातात अगदी डोंगर फोडायचे काम दिले तरी ते होवून जाईल असा उत्साह अंगी संचारतो. थंड पाण्याच्या तुलनेत गरम पाण्याची आंघोळ एक बुळा प्रकार आहे असे माझे प्रामाणीक मत आहे.

एक आठवण सांगतो. कॉलेजला असतांना आमचे होस्टेल हे थोडे गावाबाहेर होते. गरम पाण्याची काही सोय नव्हती तेथे. मग बाकीचे विद्यार्थी गरम पाण्यासाठी हीटरचा रॉड वगैरे घेवून सोय करायचे. मी मात्र उन्हाळा असो की हिवाळा, सकाळी साडेपाचच्या दरम्यान दोन तिन किलोमिटर पळायला जायचो. जॉगींग वगैरे प्रकार नव्हता तेव्हा. मी एकटाच पळून यायचो आणि अंग घामाने थबथबून जायचे. मग मी सरळ गार पाण्याच्या नळाखाली बसायचो. ज्यांना मी पळून येवून आंघोळ करतो आहे हे माहीत नव्हते ते आश्चर्यचकीत व्हायचे. इतर मुलांनी ब्रश देखील केलेला नसतांना मी मात्र सगळ्यात पहिला आंघोळ करून कपडे धुवून तयार झालेलो असायचो. आता मात्र अंग गरम पाण्याला सोकावलेले आहे. पण गार पाण्याची सवय शरीराला अजूनदेखील आहे हे गेल्याच आठवड्यात मी मध्य प्रदेशात गेलो असतांना जाणवले. तेथे हॉटेलवर सकाळी गरम पाणी मिळेल हे सांगितलेले होते. पण सकाळी नळाला गरम पाणी येत नव्हते. मग शेजारच्या रूममधल्या कुटूंबाला गरम पाण्याबाबत विचारले तर तेथेही गरम पाणी येत नसल्याचे समजले. मग मी सरळ रूममध्ये येवून नळाखाली बादलीत पाणी घेतले अन माझी गार पाण्याची लिटमस टेस्ट घेतली अन मी त्यात तेवढ्या थंड वातावरणात उत्तीर्ण झालो.

असलीच थंड पाण्याची आंघोळ हि कधीकधी बळजबरी करावी लागते. त्यातील एक हमखास वेळ म्हणजे लग्नाच्या वर्‍हाडाबरोबर किंवा एखाद्या ठिकाणी काही कार्यक्रमानिमीत्त सामूदायीकरित्या मुक्कामी जाणे. तेथल्या मुक्कामी सकाळी गरम पाणी अभावानेच मिळते. "असेल नशीबात तर आंघोळ होईल गरम पाण्यात" अशी परिस्थीती असते. सगळ्याच ठिकाणी मुक्कामासाठी हॉटेल नसते. यजमान ठेप ठेवणारा जरी असेल तरी कार्यस्थळी पाहूण्यांची गर्दी असल्यामुळे गरम पाणी तरी किती जणांना पुरेल असाही सामाजीक विचार मनात येतो. काही होतकरू अन अनूभवी मंडळी सगळ्यात आधी उठून आंघोळीला रांगा लावतात अन बाथरूम अडवून बसतात. आपल्याच कुटूंबाची आंघोळ आधी व्हावी हा स्वार्थी विचार प्रत्येक कुटूंबधारक करत असतो. मग त्यात सख्खे नातेवाईकही बाद होतात. लग्नात तर हमखास बाथरूम अडवणूक होते. मी अन माझी बायको-नवरा-मुले यांची आंघोळ आधी कशी होईल यातच प्रत्येक वर्‍हाडी गुंततो. लग्नातल्या महिलांना एकमेकींचा रुसवा करण्यास आंघोळ हे एक कारण भेटते. 'माझ्या नणंदेने बघा मला आंघोळ देखील आधी करू दिली नाही, साबण तर दिलाच नाही' असले रुसवे कुटूंबात रंगतात. वरमायची आंघोळ हा देखील एक प्रकार असतो. त्यातही रुसवे फुगवे घडतात. एकदा का सगळ्यांच्या आंघोळी झाल्या तर मग या रुसव्याची भरपाई नाष्ट्याच्या आग्रहाने होते. काही अनूभवी मंडळी गावातल्या इतर नातेवाईकांकडेच मुक्काम ठोकतात किंवा किमानपक्षी आंघोळीलातरी तेथे जातात.

एखाद्या निरर्गरम्य ठिकाणी सहल म्हणा किंवा आजच्या जमान्यातले विकएंड पर्यटन म्हणा किंवा देवदर्शन कम भटकंतीच्या निमीत्ताने आजकाल गाड्या भरभरून लोक पर्यटन करत आहेत. प्रवासाच्या सोई वेगवान अन पाहीजे तेथे उपलब्ध झाल्याने आजकाल जो तो उठतो अन शुक्रवार संध्याकाळ ते सोमवार पहाटपर्यंतच्या विकांतात  पर्यटनाचाचा विचार करतो आहे. अशा पर्यटन स्थळी किंवा धार्मीक स्थळी आंघोळ हे एक कार्य असते. काही ठिकाणी धार्मीक पर्यटन हे केवळ आंघोळ करवून घेण्यासाठीही आपल्याकडे प्रचलीत आहे. नर्मदेतले स्नान, गोदावरी- नाशकातले रामकूंडातले किंवा कुंभमेळ्यातले स्नान, अलाहाबाद - प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील किंवा त्रिवेणी संगम आदी ठिकाणावरील स्नान हे धार्मीक स्नानात मोडते. भारतात कोणत्याही नदीत स्नान केले तर गंगेत स्नान केले असे म्हटले जाते एवढे स्नानाचे महत्व आहे. एखाद्या धबधब्याखाली जावून अंग भिजवणे, रेन डान्स असलेले किंवा वॉटर पार्क मधले भिजणे हे हौशी पर्यटनाखाली मोडते. अगदीच झाले तर कोणत्याही स्विमींग पूल मध्ये पोहोण्याआधी अंग धुवावे लागते. झालेच तर काही हौशी व्यक्ती समुद्रस्नान किंवा मड बाथ किंवा सूर्यस्नान, किंवा पावसातले स्नान देखील करतात. काही ठिकाणी चॉकलेटचे स्नान किंवा देवादिकांची मध, दूधाने घातलेली आंघोळ आदी देखील प्रकार प्रचलीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी किंवा रायगड येथील सुधागड येथील उन्हेरे येथे गरम पाण्याचे कुंड आहे. तेथे गंधक मिश्रीत पाण्याचे झरे वाहतात. तेथे केलेले स्नान हे वैद्यकीय दृष्ट्या त्वचारोगावर उपाय मानला जातो.
हॉस्पीटलातले रुग्णाला केलेले स्पंजींग देखील एक आंघोळीचाच प्रकार आहे.

दिवाळीतले अभ्यंगस्नान हा देखील एक वैविध्यपूर्ण प्रकार आपल्यात आहे. कार्तीक महिन्यातली थंडी अन त्या थंडीत सकाळी उठणे आणि उटणे, तेल लावून, मोती साबण लावून केलेले स्नान किती प्रसन्न असते. त्या आंघोळीला धार्मीकतेचा वारसा आहेच पण वैद्यकीयदृष्ट्याही अधिष्ठान आहे. बोचर्‍या थंडीत शरीराला तेलाने मर्दन केल्याने शरीरातील तेलाची कमतरता भरून निघते हा हेतू आपल्या पुर्वजांनी जाणला असावा आणि मग तशी आंघोळ करण्याची प्रथा पडली असावी. असले उटणे वगैरे लावून केलेली आंघोळ हि केवळ दिवाळीच्या एका दिवसापर्यंत मर्यादीत न राहता वर्षभर असावी असे मला वाटते. महिलावर्ग या उटण्याच्या आंघोळीला मुकतो हे मात्र खरे. महिलांवर कायमच अन्याय होत असल्याचे हे पाणीदार उदाहरण आहे. समस्त महिलावर्गाने आणि स्त्री मुक्तीवाल्यांनी केवळ महिलांसाठी असलेली एखादी आंघोळ शोधायला हरकत नाही. अर्थात भोगी, रथसप्तमी इत्यादी सणांना महिला नदीवर स्नान करण्यासाठी जातात. ती देखील एक मुहूर्ताची आंघोळच असते.

पुरानकाळापासून माणूस हा प्राणी आंघोळ करत असल्याचे पुरावे मिळतात. रोमन साम्राज्यातील किंवा हडप्पा, मोहोंजोदरो येथील स्नानगृहे, न्हाणीघर, तेथील पाणी वाहून नेण्याच्या जागा आदी पुरावे उत्खननात मिळालेले आहेत. प्रत्येक धर्मात स्नानाचे महत्व आहे. क्रिश्चन लोकांत बाप्तीस्मा घेण्याचे स्नान असो, मुस्लीमांतले शुक्रवारचे स्नान, आपल्या हिंदूमधले नद्यांमधले पवित्र स्नान, लग्नातले वधू वरांनी एकत्र केलेली सार्वजनीक आंघोळ, त्याच वधू वरांनी लग्नानंतर एकत्र केलेली खाजगीतली आंघोळ, लहान मुलांची आंघोळ, शेवटची आंघोळ, बादलीत पाणी घेवून केलेली आंघोळ, शॉवर खाली केलेली आंघोळ आदी अनेक प्रकार आंघोळीचे असतात. युरोप अमेरीकेत पूर्वी आंघोळीसाठी सार्वजनीक जागाही होत्या. तेथे सामुदायीकरित्या आंघोळ करत असत. हमाम में सब नंगे हि म्हण त्यातूनच उदयाला आली असावी. 

चित्रकारांनाही आंघोळ हा विषय चित्र काढण्यासाठी महत्वाचा वाटलेला आहे. अनेक चित्रकारांनी या आंघोळीच्या चित्रांमधे हात धुवून घेतलेला आहे. गोपीका नदीत स्नान करत आहेत अन श्रीकृष्ण त्यांचे कपडे चोरतो या विषयावर अनेक चित्र आहेत. जशी परिस्थीती आंघोळीच्या चित्रांमध्ये आहे तशीच परिस्थीती चित्रपटांमध्येही आहे. अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटातल्या नायिकांना चित्रपटात आंघोळीला बसवलेले आहे. ब्रम्हचारी चित्रपटातील यमुनाजळी खेळ खेळू यातील मिनाक्षी, राम तेली गंगा मैली मधली मंदाकीनी, किशन कन्हैया मधली राधा बीना है किशन अकेला म्हणणारी शिल्पा शिरोडकर कोण विसरेल? काही प्रसंगात तर नायीका भिजवण्यासाठी खास प्रसंग निर्माण केलेले आढळतील. पावसाचे कोणतेही वातावरण नसतांना चित्रपटात नायक नायीका पावसात भिजतात. ओढून ताणून ओलेत्या केलेल्या प्रसंगांना नायक नायीकांनी आक्षेप घेतलेला आढळत नाही. केवढे  हे आंघोळीविषयी प्रेम!

एकूणच परिपुर्ण आरोग्य आणि निकोप मनासाठी आंघोळ हे एक आद्य कर्त्यव्य आहे. ज्या दिवशी आंघोळ झाली नाही तो दिवस खराब जातो हे निश्चीत. मुंबईत  लोकलमधून प्रवास करून, घामाने न्हावून ( बघा, घामाने न्हाणे हे देखील आंघोळीतच गणले जाते!) घरी आल्यानंतर प्रथम आंघोळ होते. त्यानंतरच मंडळी कुटूंबाच्या प्रेमात न्हातात.   

दिवसाची सुरूवात आंघोळ करून प्रसन्न होते याचा अनूभव तुम्ही, आम्ही सर्वांनीच घेतलेला असेल. आंघोळीने शरीर धुतले जाते. त्वचेचे आजार आंघोळीने नष्ट होतात. आंघोळ केल्यानंतर प्रसन्न वाटते. उत्साह निर्माण होतो. पर्यायाने मनाचे आरोग्य राखले जाते.

ब्रह्ममुहूर्तावर हा लेख प्रकाशीत करून मी आजचे चंद्रग्रहण संपल्याच्या कारणास्तव एवढ्या थंडीत मस्त गरम पाण्याने आंघोळ करायला पळतो.

- पाषाणभेद
११/०१/२०२०

Saturday, December 07, 2019

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)

न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर

थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर

इसीजी नका करू तुम्ही
पल्सही नका पाहू कोणी
लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर
काढा की माझे वेंटीलेटर

पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले
काळजी घेण्या नर्स नाही मग तुम्ही का दुर? 
इकडे या अन ऐका पलंगाची कुरकुर
काढा की माझे वेंटीलेटर
अहो काढाना!

(सदरचे उपचार या खाजगी रुग्णालयात हिंदीतही उपलब्ध आहेत. रुग्णांनी लाभ घ्यावा.)
- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९

ओ डॉक्टर निकालो वेंटीलेटर

ओ डॉक्टर निकालो वेंटीलेटर

ओ डॉक्टर निकालो मेरा वेंटीलेटर
मुझे नही कुछ हुवा
चाहे तो लिखवा लो मुझसे लव लेटर
(कोरसः न न ना, इसे दे दो डिसचार्ज लेटर)

न मै बिमार हू न मै परेशान हू
सभी तरीकेसे मै तंदूरूस्त हू
फिर क्यू देते है मुझे इंजेक्शन?
निकालो मेरा वेंटीलेटर

थोडी दवाई मै खाती हू वो आप भी खा लो
दिलकी बिमारी मेरी थोडी आप ले लो
सलाईन ऑक्सीजन हटवा दो बढा है मेरा टेंपरेचर
निकालो मेरा वेंटीलेटर

इसीजी मत तुम देखो
पल्सही मत चेक करो
लॅब टेस्ट करने मत बोलो, बंद करो वो मॉनीटर
तुम बस निकालो मेरा वेंटीलेटर

स्पेशल रूम मे लेटी हू मै बिस्तर पर
नर्स भी नही यहां आप आ जावो इधर
सारे लोग करते है वो हम करे तो क्या है प्रॉब्लेम?
निकालो मेरा वेंटीलेटर
निकालो ना!

- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९

Monday, November 11, 2019

मी पुन्हा येईन

घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील 
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन

जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन

नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन

मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन

लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन

- पाषाणभेद
११/११/२०१९

Saturday, September 28, 2019

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

तो: हॅलो.

ती: हं बोला.

तो: काय गं, झोप झाली का?

ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.

तो: हं.

ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.

तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी त्या व्यतिरिक्त एक वेगळा अन महत्वाचा एसएमएस पाठवलेला होता तो वाचला का?

ती: तुमचा तोच व्हाटसअ‍ॅप चा मेसेज वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना तेच बोलत आहात ना?

तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी. व्हाटसअ‍ॅपचा मेसेज नाही.

ती: तुम्ही ना माझे व्हाटसअ‍ॅपच काढतात जेव्हा पहावं तेव्हा. वाचला ना मेसेज व्हाटसअ‍ॅपवरचा.

तो: अग मी एसएमएस बद्दल बोलतोय. जुन्या मोबाईलमध्ये, पुर्वी व्हाटसअ‍ॅप होते का? महत्वाचे काय? एसएमएस का व्हाटसअ‍ॅप?

ती: एसएमएस नाही वाचला. वाचते.

तो: व्हाटसअ‍ॅप मध्ये किती तरी गृप्सचे मेसेजेस असतात. माझा मेसेज खाली गेलेला असू शकतो ना?

ती: हं

तो: पहिल्यांदा काय पाहशील मोबाईल उघडल्यावर?

ती: तुमचं ना नेहमीचंच आहे. झालं चालू लेक्चर. अहो, मी तुमची बहीण येणार असल्याचा मेसेज वाचला अन लगेच चहा बनवायला घेतला माझा. डोकं नका दुखवू आणखी.

तो: अगं मी एसएमएसवरचा मेसेज बोलतोय.

ती: तेच तर मी मेसेज वाचला तुमचा. उद्या बहीण येतेय तुमची तो.

तो: देवीच्या देवळात गेली अन तेथे गणपती दिसला तर पहिल्यांदा कुणाचे दर्शन घेशील?

ती: हां मला ज्याचे दर्शन घ्यायचे ते घेईल.

तो: अगं एसएमएस कुणाकडून आला ते लगेच समजते अन तो पटकन वाचता येतो. अन ते व्हाटसअ‍ॅप मेसेज सारखे पाचशे पाचशे येत नाहीत गं. तुझ्यासाठी महत्वाच्या होता एसएमएस म्हणून पाठवला होता.

ती: हं ठेवता का फोन, तरच वाचता येईल मला.

तो: वाच बाई एसएमएस वाच. व्हाटसअ‍ॅप, व्हाटसअ‍ॅप नको खेळू.

ती: हं...या घरी संध्याकाळी ऑफीसातून.

- पाभे