Friday, October 13, 2017

जय महाराष्ट्र बोला

जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला
कुणाच्या बापाची भीती नाय
बोला दणकूण बोला
तुम्ही जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला
आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी
सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही
उगा पिरपिर करू नका नाहीतर
एकच ठेवून देवू टोला
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
बापजादे खपले आमचे सीमालढा देवून
लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून
खोटे गुन्हे नका दाखल करू
कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो
कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो
सोईचे नियम केले हो केले
दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले
खेळी केली अन गावं खिशात घातले
एक पिढीच संपवली बंद करूनी मराठी शाळा
आतातरी बोला बोला जय महाराष्ट्र बोला
बेळगाव कारवार भालकी बीदर
आळंगा हल्याळ निपाणी घातले घशात
आतल्या गाठीचे तुम्ही
खोटे आयोग लावले कितीक वेळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला
मागच्या पिढ्या संपवल्या मुस्कटदाबी करून
बळजबरी केली कानडीची मार मारून
सांगा कितीदा सोसायच्या मराठीसाठी कळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला
नका आता भाषेचे राजकारण करू
नका आणखी सीमाभागाचे लचके तोडू
मराठीला नका लागू देवू कानडी सक्तीच्या झळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
- पाषाणभेद
मेरे मरदको काम पे है जाना
मेरे मरदको काम पे है जाना
तुम आठ अंडे मेरेकू देना
रे बाबा आठ अंडे मेरेकू देना ||
सुब सुब मिल मे वो जाता
सायकल को डब्बा टांगता
वो डब्बेको बुर्जीच मांगता
नही दुसरी भाजी वो खाता
इसलिए आठ अंडे मेरेकू देना
मेरे मरदको काम पे है जाना ||१||
मिल मे वो कपडा लुंगी बनाता
घर मे भी वो चौकडी लुंगी पहेनता
पलंग पे चद्दरजैसी लुंगी डालता
अभी लुंगीकेही पिशवी मे अंडे देना
टोटल आठ अंडे मेरेकू देना
मेरे मरदको काम पे है जाना ||२ ||
मेरे मरद की मै औरत अकेली
नही दुसरी बिवी कोई उसकी
दो बेटी छोटे तिन बेटे है मेरे
खाने को एकसाथ गिल्ला करे
उनको आम्लेट है मुझे खिलाना
आठ अंडे मेरेकू देना
मेरे मरदको काम पे है जाना ||३||
बच्चे जब स्कूलकू जाते
तभी तो वो घरकू आते
थकेले दमेले वो होते
सेवा स्पेशल मै करती
हातपैर मै उनके दबाती
वो काम करनेकी ताकद मेरेमे होना
आठ अंडे मेरेकू देना
मेरे मरदको काम पे है जाना ||४||
- ( लुंगीवाला) पाभे

काडीचा सरडा

काडीचा सरडा
ही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते.
होती शुष्क एक काडी झाडावरती
तुटूनी पडली खाली धरणीवरती

जणू ओढावले तिचे मरणचकी
वय होवोनी मातीत मिळाली

वेगळी झाली मग तिचे व्हावे काय?
धुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय

प्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे
पण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे

डोके छोटे वरती बघे मान उंचावूनी
पुढील पाय लांब केले खाली रेटूनी

लांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती
उडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी

निसर्गाचा चमत्कार हा पहा या छायाचित्रात
काडी मोडोनी वृ्क्षाची रुप बदलले सरड्यात


Monday, October 9, 2017

पावसामुळे काय काय !!तुझी झाली ओली अर्धी...
साडी.

अन माझाही भिजला पुर्ण...
खांदा.

एकाच छत्रीमुळे झाला वांधा.वरतून दणका जोरदार...
पावसाचा.

साथीला गोल गोल टपोर्या...
गारा.

भसकन शिरला त्याचवेळी...
छत्रीमध्ये वारा.

आणीक खोल फसला माझा...
चिखलात पाय.

धुमाकूळ घालून उलटे केले...
वार्याने छत्रीला.

तू ही गेली दुर निघूनी...
अन हातामध्ये दांडा आला.

==============================================
कवितेवरील प्रश्न:

अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा.

१) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा.
२) पावसामुळे कसे परिणाम झाले? सचित्र उत्तर लिहा.
३) छत्री हे कशाचे प्रतीक आहे? चर्चा करा. (म्हणजे चर्चात्मक उत्तर लिहा.)
४) छत्रीमुळे कुणाचे संरक्षण होते? छत्री नसल्याने काय दुष:परिणाम होतात? सविस्तर उत्तर लिहा.

ब) रिकाम्या जागा भरा.
१) तुझी झाली ओली अर्धी XX
२) माझाही भिजला पुर्ण XX
३) वरतून दणका जोरदार XXXX
४) XXXX शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा

क) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) वार्याने कुणाला उलटे केले?
२) कुणाचा खांदा पुर्ण भिजला?
३) कुणाचा दणका जोरदार होता?

पुरवणी प्रश्न
१)"तू ही गेली दुर निघूनी" हे उद्गार कुणाला उद्देशून आहेत? आणि का? सविस्तर उत्तर अपेक्षित.

- पाभे (प्रश्नपत्रीका सेटर)