Showing posts with label गीत. Show all posts
Showing posts with label गीत. Show all posts

Monday, June 01, 2026

जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे

जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे

वंदन करूया स्वतंत्र भुमातेचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||ध्रृ||
 
येथे लढल्या कितीक लढाया
भाले फेकले तलवारी परजल्या
अटकेपार झेंडे रोवूनी
शौर्य गाजले मराठी रक्ताचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||१||
 
वेरूळ अजिंठा कार्ला लेणी
दगडी सौंदर्य वसले या ठाणी
किल्ले शिवरायांचे भक्कम दुर्गम
जलदुर्गही रक्षण करीती देशाचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||२||
 
धोंडे केशव भाऊराव टिळक सावरकर
ताराराणी ताराबाई फुले शाहू आंबेडकर
रानडे दादासाहेब यशवंतराव
साने गोखले आण्णाभाऊ नाना पाटील
जिजाऊ अहिल्याबाई दुर्गाबाई सिंधूताई
असे धुरीण जन्मले कौतूक कितीक यांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||३||
 
येथे आहे संतांची पावन परंपरा
ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष खरा
भक्तीच्या रंगात न्हाली ही धरती
गुंजती अभंग स्वर भक्तीमय सुरांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||४||
 
सह्याद्री उभा हा कणखर अभिमानी
नद्या वाहती जणू अमृताचे पाणी
शेतात डोलती सोनरी पिके
वैभव खुलते या समृद्ध मातीचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||५||
 
पश्चिमेस सागरकिनारा, कोकण हिरवागार
पूर्वेला विदर्भभूमी समृद्धीचा भंडार
उत्तरेस खानदेशी कष्टाची असे कास
दक्षिणेस सह्याद्री उभा भूषण देशाचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||६||
 
कला संस्कृती यांचा गंध न्यारा
लावणी पोवाडा भारुडाचा झंकारा
ज्ञान-विज्ञानाच्या तेजाने उजळुनी
नाव झळकले मराठी जनांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||७||
 
हरपले किती भूभाग सीमांच्या वाटेचे
जपले स्वप्न अजुनी एकीच्या लढ्याचे
मराठी मनांत धग संयुक्ततेची
पूर्ण होवो स्वप्न अखंड महाराष्ट्राचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||८||
 
एकीच्या बळावर पुढती जाऊ
महाराष्ट्र भूमीचा गौरव वाढवू
जय जय महाराष्ट्र नाद घुमू दे
वंदन करूया पवित्र मातृभूमीचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||९||

Sunday, January 09, 2022

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले
अजूनी होते हवे ते परी न आता उरले

उबदार किती ते वाटे गारठ्यामधे
लेवून अंगी जणू चिलखत ते भासे
कितीही संकटे आली जरी
घाव वर्मी ते सोसतसे

किती निगूतीने वस्त्र निर्माण केले
उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले 
शिलाई नाजूक टाके अचूक
रंग तयाचे भरदार असले 

या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण
कुणी न विणकर आता न विणणार
भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला
पुन्हा कधी न उमटे

आधार होता किती नाही म्हटले तरी
आठव तयाची राहील कायमची उरी 
न मिळणार कधी मायेचे पांघरूण 
ते कठोर काळाने हिरावले

माझे बाबा देवाघरी गेले

- पाषाणभेद
०९/०१/२०२२

Thursday, December 30, 2021

खंडेरायानं करणी केली

यळकोट यळकोट जय मल्हार

बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥

व्हती मेंढरं खंडीभर 
चराया नेली डोंगरावर
हिरवा पाला रानोमाळं
भवती गार गार वारं
आलं भरूनी आभाळं 
काळ्या ढगांच झालं भार
पळात आलं धरणीवर
चकमक दावली विजेनं
कल्लोळ उठला त्या ठाणं
चमत्कार दावला देवानं
वर रोखूनी धरलं त्यानं
बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥१॥

एका दिशीची कहाणी
तहान लागली मेंढरास्नी
नेली देवानं गिरणेवरी
प्यायला लागली पाणी
नदीला आला पूर भरपूर
जिकडे तिकडे हाहाकार
केला छातीचा बंधार
पाणी अडवती मल्हार
बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥२॥

वाड्यावरी बाणाई
सज्यामधी वाट पाही
कधी येणारं मेंढपाळ
गेला मेंढरं घेवून सकाळ
भरीत कांदा भाकर लसूण
दिली होती देवाला बांधून 
कधी पोटाला खाईल
नाही माहीत कोणती वेळ
बाणाईची जेवायाची काळजी
मनात जाणी मार्तंड मल्हारी
हाती घेवून कांदा भाकर
देव उधळी बेल भंडार
नैव्येद्य पडला वाड्यावर
बाणाईनं जाणलं सारं
मेंढपाळ आहे मल्हार
पाषाण त्याचा नोकर
संगती राही सेवेला सदा तप्तर
बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥३॥

बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥

सदानंदाचा यळकोट!
खंडेराव महाराजांचा विजय असो!!

- पाषाणभेद
३०/१२/२०२१

करा बाई करा ग देवीची आरती

 करा बाई करा ग देवीची आरती
करा बाई करा ग मानाची आरती

आणा बाई आणा ग देवीला कुंकू
लावा बाई लावा ग देवीच्या कपाळा
भरा भाई भरा ग देवीचा मळवट
नेसवा बाई नेसवा ग देवीला नवूवारी
घाला बाई घाला ग देवीला नथनी
घाला बाई देवीला मंगळसुत्र
घाला बाई घाला देवीला कमरपट्टा
घाला बाई घाला ग देवीला तोडे

चाल बदलून

ए निरांजन दिवा ताटात आणा 
हळद कुंकू घेवून धूप कापूर पेटवा
करा देवीची आरती 
भक्त सारे ओवाळती

पहिली चाल

करा बाई करा ग देवीची आरती
करा बाई करा ग मानाची आरती

- पाभे
२९/१२/२०२१

Wednesday, December 29, 2021

पाळणा झुलू दे

असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे
या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे

माझ्या या अंगणी आला ग श्रीरंग
काय सांगू बाई माझ्या बाळाचे रंग
किती द्वाड तो धावतो घरात
आवरता आवरेना दिस जाई त्याचे संग

काय काय मागतो खायला प्यायला
लोणी श्रीखंड बासूंदी करंजी घेते मी कराया
रव्या बेसनाचे लाडू मोतीचूर भरपूर 
केली खीर, कोशिंबीरी सोबतीला शेवया

माझ्या या बाळाला आयुष्य उदंड लाभू दे 
असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे

असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे
या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे

- पाषाणभेद
२९/१२/२०२१

Monday, November 01, 2021

पेट्रोल सस्ता हुवा की नही?

मित्रों....
पेट्रोल सस्ता हुवा की नही?
गैस सस्ता हुवा की नही?

तंग हुवा इस महंगाईसे
अब तो पेट्रोल सस्ता करीयो.
कैसे करे हम सौदा बेपार 
ग्राहक मांगे उधार
खाना कैसे पकाए, गैस महंगा हुवा है
तुम्हारी महंगाई डरा रही है

मित्रों....
पेट्रोल सस्ता हुवा की नही?
गैस सस्ता हुवा की नही?
कैसे जाय स्टेशन कैसे गाडी पकडे
बस का तिकट महंगा रिक्षावाला भी भाडा ज्यादा मांगे
रेलवे आडवांस बुकींग कैसे करे 
कैसे सहे हम, सफर करनाही छोड देंगे

मित्रों....
पेट्रोल सस्ता हुवा की नही?
गैस सस्ता हुवा की नही?
ट्रक का भाडा बढ गया
डिजल महंगा हुवा है
कैसे खरीदारी होगी बाजारमें
हर आदमी अब रो रहा है
जीना अब दुश्वार हुवा अब तो कोई उपाय करो
इस पेट्रोल डिजल के दाम अब तो कम करो

मित्रों....
पेट्रोल सस्ता हुवा की नही?
गैस सस्ता हुवा की नही?

01/11/2021

राम दुहायी, यह दुरी मुझसे अब सहा नही जाए

हवा मे पल्लू लहराये, वो थोडी शरमाये

राम दुहायी, यह दुरी मुझसे अब सहा नही जाए ||


कितनी कातील अदा है उसकी

छुरी बिनाही मै कट जाऊं |

मर तो जाता मै, और क्या करता

कैसे तकलीफ मै सहूं?

वो तो आती जैसे बिन बादल बिजली मुझपर गिर जाए |

राम दुहायी, यह दुरी मुझसे अब सहा नही जाए ||


कितने पागल हो चूके कितने तो बरबाद

रोजगार कितनो का छुटा न करो गिनती बारबार |

एक मै था बचा हुवा जो अब हुवा लाचार

क्या करू मै की तुम हम मिल पायें |

राम दुहायी, यह दुरी मुझसे अब सहा नही जाए ||

Saturday, October 23, 2021

पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर

रानी तू ना करो मांग की, "कही ले जावो हमें",
क्यूं की,
पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर
पिछले साल था वह लीटर का साठ सत्तर
अब वह चढ गया है सौ से बत्तर
कल पचास का डलवाते थे
आज भी उतनाही डलवाये हम
पॉकेट नही मानता, नही अब उसकी खैर
क्यूं की,
पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर
पेट्रोल का रहने दो अब डीजल भी हुवा महंगा
सरकार चाहती है कोई उससे ना ले पंगा
ट्रान्सपोर्टवाले हुवे कंगाल
ना करे सब्जी सामान का व्यापार
कैसे चलेगा चक्का, कैसे दौडेगा देश
टॅक्स के चक्कर में फसा आदमी कैसे करे परहेज
आपही बताओ कैसे निकले घर के बाहर
पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर
एक भैया ने डलवाया पेट्रोल हुए रुपये हजार
उसकी जांच करने आया चौकी का थानेदार
बोला इसकी तकरार अब जायेगी ईडी में
काहे का सकून भैया मन दुविधामें
बोला अब पैदल ही चलता हूं न चलावूंगा कार
क्यूं की,
पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर

23/10/2021

Tuesday, October 12, 2021

अरी ओ फरजाना

अरी ओ फरजाना दरवाजा खोलना
बाहर खडा हूं मै अंदर मुझे है आना

कबसे कर रहा हू मै इंतजार
अंदर आने को मै बेकरार
नही सुनती क्या तू मेरा इकरार
अब ना कर तू मनमानी मुझे है तुझे पाना

जरा देख तो ले मै क्या लाया
मेरे हाथ मै है यह हार नया
चूडी भी है उसके साथ साथ
पहनोगी तो सुंदर लगे तेरे हाथ
बालों की सुई मै लगा है हिरा पन्ना

अपना झगडा तू अब छोड दे
आपस की बाते आपस मे रहने दे
काहे तू जाय मैके क्या है वहा
मै तेरा आशिक खडा है यहा 
भूल जा सारी दुनिया पर मुझे न भुलना 

Sunday, November 01, 2020

मिसळ पाव मिसळ पाव

मिसळ पाव मिसळ पाव
खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव

मटकीची उसळ तिची करा मिसळ
उसळीत घातला शेव कांदा
त्यात पिळला लिंबू अर्धा
रस्सा टाका त्यात चांगला
पावाबरोबर खाऊन टाका
मिसळ पाव मिसळ पाव

झणझणीत तर्री अर्धी वाटी
ओता त्यात होईल खाशी
नाकातोंडातून येईल धुर
मग दह्याने बदला नूर
असली मिसळ अन दहा पाव
खाऊन तर पहा राव
मिसळ पाव मिसळ पाव

एकदाच खा अन ढेकर द्या
उगाच नंतर जेवायचे काम नाय
नको ते इडली सांबर
पुन्हा घ्याल का पराठे नंतर?
मिसळीत आहे सारे गुण
एकदा खाल तर व्हाल टुन्न
हातावरचे अन पोटावरचे
एकच झाले मिसळीवरचे
केवळ नाव तुम्ही घ्याल
मिसळ खाल मिसळ खाल
मिसळ पाव मिसळ पाव

- पाषाणभेद
०१/११/२०२०

Saturday, October 31, 2020

हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)

हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)

पार्श्वभूमी: सदर गीत साधारण २००६-०७ च्या सुमारास दुरदर्शनवर पाहिले अन तेव्हापासून हे गीत मी आंतरजालावर शोधत होतो. कुठेही हे गाणे लिखीत अथवा चित्रीत स्वरूपात मिळाले नाही. नंतर एकदा हे गीत नाशिक आकाशवाणीवर ऐकायला मिळाले. ते गाणे तेथून मिळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. मला नक्कीच खात्री होती की हे गीत वंदना विटणकरांचे आहे. खूप प्रयत्न केले असता सदरच्या गाण्याचा उल्लेख http://www.marathiworld.com/gani/list_action.php?ch=H&sort=1 येथे सापडला. (येथे ते गाणे 59 क्रमांकावर आहे.) (आता बहूदा हि साईट चालत नाहीये.)

पण त्यावेळी ही लिंक उघडत नव्हती. लिंक ब्रोकन असल्याबद्दल मी तेथील अ‍ॅडमीनला इमेल पाठवला. त्यांचा काही प्रतिसाद आला नाही पण काही दिवसांनंतर ही लिंक ओपन होवू लागली व माझी या गाण्यासाठीची खुप दिवसांपासूनची शोधाशोध थांबली. साधारण २०१२ साली हे गीत सापडले. परंतु ते ध्वनी स्वरूपात (गायलेले) आपले मिपाकर डॉक्टर इंद्रनील पाटील सरांंनी २०१९ साली दिले. खूप प्रतिक्षेअंती एका सुमधूर गीताचा शोध संपला. अर्थात या गाण्यावर चित्रीकरण असणारा विडीओ दुरदर्शनच्या लायब्ररीत असणार. पण तो मिळणे दुरापास्त आहे. पण जेव्हा तो मिळेल किंवा तो दाखवतील तेव्हा आपण जरूर पहा. अगदी छान चित्रीकरण असलेले हे गीत आहे. मनास आनंद देईल हे नक्की. एखादे चांगले गीत काळाच्या पडद्या आड जाऊ नये म्हणून हे गीत येथे देत आहे. ऑडीओ अपलोड केल्यास तो देखील देण्यात येईल. 

हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)

हिरवा हिरवा ॠतू, हिरवा हिरवा ॠतू,
अधिकच हें मन हिरवें, जवळीं असतां तूं ॥धृ ॥

विळखा घाली वारा, फुलतो वेलीवरी शहारा
लाटा येतां जवळीं होतो अधीर धुंद किनारा
भ्रमर चुंबितां कळीस, माझा वसंत फुलवी तूं ॥१॥

कोसळती जलधारा, नाचे मनांत मोरपिसारा
ओलेती ही धरा, देतसे हिरवा सृजन-इशारा
मेघ भेटतां तिला, प्रिया, मज दे आलिंगन तूं ॥२॥

हिरवी मस्ती रानीं, प्रणयी राघू उन्मन झाले
अशा निथळत्या वेळीं माझें तनमन हरपुन गेलें
चिंब मातल्या बेहोषीचें उधाण सांवर तूं ॥३॥

गीत - वंदना विटणकर
सं. - यशवंत देव
गा. - शोभा जोशी 

गायलेले गीत खालील लींकमध्ये ऐकता येईल.
https://voca.ro/12JlBPGIDPYN
(वरील लींक नाहीशी होऊ शकत असल्याने आपण डाऊनलोड करून घेवू शकतात.)

Thursday, August 06, 2020

बारीश देखो हमे भिगोने आयी है

नायक एवं नायीका बरसात के मौसममे एक दुसरेसे मिलते है तो वह युगलगीत गाने लगते है!


बारीश देखो हमे भिगोने आयी है

रुत है सुहानी तुझसे बात करनी है

बारीश देखो हमे भिगोने आयी है

हात मे तेरा हात अब ना जुदा होना है

बारीश देखो हमे भिगोने आयी है


बूंदे पडनी लगी पानी बहने लगा
बहेते पानी मे तन भीगने लगा

मौसम का ये हाल हुआ तो अपना क्या होगा

अजी छोडो सारी बाते, जो होगा देखा जाएगा

कितने दिनो के बाद हम करीब आये है


वह दूर देखो एक झील वह कितनी गहरी है

झील क्यू देखें तुम्हारी गहरे नैना क्या कम है

उन्ही मे डूब जाना है तैरके क्या करना

भीग जायेंगे उनमे ना छोडेंगे उन्हे वर्ना

सागर जैसा पानी उस नैनोमें समाया है 

बारीश देखो हमे भिगोने आयी है


कितने करीब आये हम न दूर जाना है

बारीश देखो हमे भिगोने आयी है

रुत है सुहानी तुझसे बात करनी है

बारीश देखो हमे भिगोने आयी है

हात मे तेरा हात अब ना जुदा होना है

बारीश देखो हमे भिगोने आयी है


06/08/2020


Wednesday, March 11, 2020

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||

आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||

कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||

कितीक आजार आले अन गेले
स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले
चांगले खा प्या अन निट फिरा
सांभाळून आपल्या आरोग्याला
मंत्र हाच असे नाही दुसरे काही
व्हायरसपासून दूर रहायला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||३||
- पाषाणभेद
१०/०३/२०२०

पूर्वप्रकाशीत

Thursday, February 06, 2020

एका उदास संध्याकाळी

एका उदास संध्याकाळी


एका उदास संध्याकाळी
कोणी गात होती विराणी ||

शब्दांत अशी आस नव्हती
चाल नव्हती अशी कोणती
धारही नव्हती त्या शब्दांना
तरी काळीज जाय चिरूनी ||

संधीप्रकाश निळा जांभळा
खालून गेला वर आभाळा
कुंद हवा अन वारा पडला
हवेत सूर राही भरूनी ||

धिरगंभीर सूर कवळूनी
गीत हृदयीचे आळवूनी
उलगडे आर्त सरगम
भरूनी राहिली कानी ||

- पाषाणभेद
०५/०२/२०२०

Monday, December 16, 2019

माहेर, सासर

माहेर, सासर
नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा
कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा
अल्याड गाव माझे त्यात मी राहिले
पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले
चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर
नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर
मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते
त्याचाकडची वाट नजरेला खुणावते
मनी लागली हुरहुर कसे असेल सासर
कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर
- पाषाणभेद
०८/१२/२०१९

Saturday, December 07, 2019

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)

न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर

थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर

इसीजी नका करू तुम्ही
पल्सही नका पाहू कोणी
लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर
काढा की माझे वेंटीलेटर

पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले
काळजी घेण्या नर्स नाही मग तुम्ही का दुर? 
इकडे या अन ऐका पलंगाची कुरकुर
काढा की माझे वेंटीलेटर
अहो काढाना!

(सदरचे उपचार या खाजगी रुग्णालयात हिंदीतही उपलब्ध आहेत. रुग्णांनी लाभ घ्यावा.)
- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९

ओ डॉक्टर निकालो वेंटीलेटर

ओ डॉक्टर निकालो वेंटीलेटर

ओ डॉक्टर निकालो मेरा वेंटीलेटर
मुझे नही कुछ हुवा
चाहे तो लिखवा लो मुझसे लव लेटर
(कोरसः न न ना, इसे दे दो डिसचार्ज लेटर)

न मै बिमार हू न मै परेशान हू
सभी तरीकेसे मै तंदूरूस्त हू
फिर क्यू देते है मुझे इंजेक्शन?
निकालो मेरा वेंटीलेटर

थोडी दवाई मै खाती हू वो आप भी खा लो
दिलकी बिमारी मेरी थोडी आप ले लो
सलाईन ऑक्सीजन हटवा दो बढा है मेरा टेंपरेचर
निकालो मेरा वेंटीलेटर

इसीजी मत तुम देखो
पल्सही मत चेक करो
लॅब टेस्ट करने मत बोलो, बंद करो वो मॉनीटर
तुम बस निकालो मेरा वेंटीलेटर

स्पेशल रूम मे लेटी हू मै बिस्तर पर
नर्स भी नही यहां आप आ जावो इधर
सारे लोग करते है वो हम करे तो क्या है प्रॉब्लेम?
निकालो मेरा वेंटीलेटर
निकालो ना!

- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९

कव्वाली: तुला पाहिले की

कव्वाली: तुला पाहिले की

किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे
काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे
दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते
पण तुला पाहिले की काळजात धकधक होते

किती तू वार केले माझ्या हृदयावर
खोल जखमा वरून केल्या त्यावर
नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला
तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला
त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक
पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक
नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये
तुला पाहिले की काळजात धकधक होते

सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी
मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी?
तुझा चेहेरा समोर जेव्हा जेव्हा येतो
समोर तू नाही दिसत म्हणून विव्हल मी होतो
लाख येवोत इतर सुंदर ललना समोर माझ्या
तुझ्या सुंदरतेसमोर काय कथा त्यांची, त्या असती
सा-या फिक्या
नाक डोळे रंग रूप चेहेरा बोलणे चालणे वेगळे ग तुझे
तुझ्या वर मी मरतो लाख वेळा केवळ एकदा नव्हे ते

तू माझी प्रेरणा तू
नदी तू जीवन तू
माझे जगणे तू
माझे तगणे तू
माझे मरणे तू
मला तारणारी तू
तू माझे आकाश अन चांदणे तू
रात्रीच्या अंधारातील प्रकाश तू
डोंगरावरील घनदाट झाडी तू
गर्द उन्हातली माझी सावली तू
तू माझा आधार तू
माझ्या जीवनाची साथीदार तू

तुच माझ्या दिलाची धडधड धडधड
तुझ्याविना राहू कसा मी, होते तडफड
तुझा हात हाती यावा हिच मनाची तगमग
वाढते ती जेव्हा जेव्हा तू समोर माझ्या येते
तुला पाहिले की काळजात धकधक होते

- पाषाणभेद
५/१२/२०१९

Monday, November 25, 2019

यशाचे आता गा मंगल गान

यशाचे आता गा मंगल गान

विजय मिळाला, आनंद झाला,
यशाचे आता गा मंगल गान
बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या,
समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान     ||धृ||

बलाढ्य असा तो शत्रू होता,
तोफा बंदूका शस्त्रसज्जता
फंद फितूरी किती करविली,
अंती आपणच ठरलो विजेता
विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१||

युद्धखोरपणा उगा नका दाखवू,
शत्रृ रणांगणी पाहून घेवू
युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस,
लढता लढता मरण पत्करू
शरणागती नसे कदापी,  ध्वजासवे उंच करू आमची मान ||२||

- पाषाणभेद
२५/११/२०१९

Monday, November 18, 2019

वेदनाच मला मिळू दे

नकोत आनंददायी संवेदना
हे प्रभो वेदनाच मला मिळू दे
हरवू दे माझा मी पणा
त्यासाठी मजला धिर दे
सुख असे हे की डाचते मला ते
तेच ते कणखर मनाला पंगू बनवते
भौतिकाच्या मागे न लागो शाश्वत असा अशिष दे
ऐहीक श्रीमंत असूनही मदतीचा हात नाही
कशाला मग उगाचच मी दानशूर मिरवत राही
तुझ्या हातांची सर येण्याची मजला बुद्धी दे
तावून निघावे भट्टीत सोने मग दागिणा बनण्या
त्यासम माझे मन होवूदे तयार तुझ्या कडे येण्या
घण संकंटांचे घाल पाठी, मळली वाट मला न दे
- पाषाणभेद
१७/११/२०१