आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ?
तसं म्हनाल तर आपला बारदाना लई मोट्टा है. चाळीसपंनास एकर उस है. निम्मा उस जातोय साकरकारखान्यात. निम्या उसाचं गुर्हाळं लागत्यात. द्राक्षे है. मागल्या सालाच्या मागल्या साली वायनरी फैक्ट्रीचे सत्तर टक्के शेर घेतले. द्राक्षे वायनरीत आन फारेनला जात्यात. सोसायटी, ग्रामपंचायत झालंच तर पंचायत समिती आपल्याच ताब्यात है. पुढल्या सालाला झेडपीत उडी मारायची है. एक गट अन दोन गण आपलेच है त्यामुळे फिकीर नै. उगाच नै कै पंचक्रोशीत बाळासायेब म्हनून आपल्याला वळखतेत. काय?
तस सौंसारपानी बरा चाललाय. घरामदी एकाला तीन तीन गाड्या हैत. म्हंजी स्कार्पीओ, सपारीचं नवं माडेल स्टार्म, मारूतीची ग्रांडे वैतरणा है. लई बेस हायती या गाड्या. पन बायलीला सालं बुलेटच पसंत हाय. काय तर म्हंती, 'तुमी लय गुनाचं दिस्ता बुलेटवर. लई मर्द वाटता बुलेटवर. तुमी शेतातून परतायच्या रातीच्या वेळी गाडी कितीबी लांब आसूद्या, पार नदीकाठच्या गढीवरून जरी तुमची गाडी येत आसली का मला आवाज पार आपल्या वाड्यात येतूया बघा.'
काय कळंना बाबा. आसं काय हाय त्या बुलेटमधी काय जानो.
म्या काय म्हंतो, तुमाला काय समजलं का काय हाय ते?
- रायल पाभे
02/11/2013
No comments:
Post a Comment