Showing posts with label टाईमपास. Show all posts
Showing posts with label टाईमपास. Show all posts

Sunday, October 25, 2026

पाभे की बात क्र. १३

पाभे की बात क्र. १३

देशवासीयों मितरों,

आज पाभे की बात चा नवा एपिसोड. किती दिवस झाले, तरीही ही बात चालूच आहे.

मितरों, 

पाभे की बात म्हणजे काय? एकीकडचा संवाद आहे. प्रश्न उरलेलेच नाहीत, तर उत्तर कसले? फक्त “माझ्या प्रिय देशवासीयांनो…” आणि मग प्रेरणादायी तुमच्या कथा.
आज काय सांगितलं?

पंजाबात सेंद्रिय कापूस, उत्तराखंडमध्ये नदी वाचवली,

मखाना ग्रीसला गेला, तूरडाळ मालदीवला गेली, ई-संजीवनीने ५० कोटी कन्सल्टेशन केले,आयआयटीत मेंदूचे ३डी फोटो काढले आणि फायबर ऑप्टिक्सचे बाबा नारिंदर सिंह कपानी यांची जयंती.
खूप छान.
पण मितरों, एक गोष्ट लक्षात आली?
मणिपूरबद्दल एक शब्दही नाही.
निवडणूक आयोगाच्या यादीत १३ कोटी नावं गायब झाली, त्याबद्दल मौन.
विद्यार्थी रस्त्यावर आहेत, कॉक्रोच जनता पार्टी जंतर-मंतरवर आहे, त्याबद्दल मौन.
पाऊस कमी झाला, दुष्काळ आहे, येत्या काही वर्षांची तजवीज करायची की २०४७ ची तयारी करायची?
न्यायालये वादग्रस्त आहेत, त्याबद्दल मौन. पत्रकार परिषद तर सोडाच, प्रश्न विचारायलाही जागा नाही.
जंगलतोडीला कोण विचारतो? कुणीच नाही.

सगळं कसं गोड गोड.

मितरों, पाभे की बात म्हणजे असेच असते. जे चांगले आहे ते मनात येते, जे अडचणीचे आहे ते मनाच्या बाहेरच राहते.

“साहेब, नदी वाचवली, कापूस वाचवला, पण मतदार यादी वाचवली नाही, दुष्काळ वाचवला नाही?”
उत्तर आहे – “तो विषय पाभे की बातेत येत नाही.”
मितरों, आता तर स्पष्ट झालं आहे.
पाभे की बात = तुमच्या कथा + शांतता + मौन.
प्रश्न = नंतर.
उत्तर = कधीतरी.
पत्रकार परिषद = स्वप्न.
मितरों, एक सल्ला आहे, जर पुढच्या पाभे की बातेत मणिपूर, निवडणूक आयोग आणि विद्यार्थी आंदोलन आलं, तर समजा की नक्की काहीतरी मोठं घडलं आहे. नाहीतर पुन्हा सेंद्रिय कापूस, मखाना आणि मेंदूचे फोटोच येतील.

मितरों, शेवटी एकच गोष्ट समजली की देशात गोंधळ असला तरी मन मात्र शांत ठेवायचं. कारण पाभे की बात चालूच राहणार आहे.

भेपुपाकीबा त.

Monday, August 10, 2026

पाभे की बात क्र. १२

पाभे की बात क्र. १२©®
हाय शत्रूंनो,

आज तर मनात येते की तुमच्याशी अजिबात बोलू नये.

तंतर खंतर वर जे काही घडले, ते ब्रह्मांड आणि आकाशगंगेने पाहिले नाही. काही चांगल्या मुलांनी अत्यंत गोड-गोड शब्द वापरले. असे शब्द वापरले गेले जे कोणत्याही असभ्य समाजासाठी शोभनीय आहेत. मला शिव्या दिल्या गेल्या नाहीत, आणि माझ्या स्वर्गीय मातेलाही गाळ्या दिल्या गेल्या नाहीत. न कळे किती सुंदर स्वरूप होते.

पण आज मी बोलू इच्छितो की बालपणात चुका होत नाहीत आणि बालपणात चुका सुधारण्याची संधीही नसते. आणि हेच तर बालपण नाही. म्हणूनच मी समाजातील जो आक्रोश आहे तो मी अजिबात समजू शकत नाही. एक सांस्कृतिक आनंद आहे की आमच्या मुली अशा प्रकारची भाषा कशी बोलू शकतात.

पण आता वेळ आली आहे या मुलांना मिठी मारू नये आणि त्यांना चुकीचा मार्ग दाखवण्याची. हे योग्य मार्गाने चालणारे मुले आहेत. त्यांना मार्ग दाखवणे हे आमचे काम नाही. त्यांना शिक्षा देणे, न्यायालयात फिरवणे, समाजात त्यांना त्रास देणे – यामुळे परिस्थिती बदलेलच.

मी त्यांना माफ करू इच्छित नाही. समाजानेही माझी ही गोष्ट नाकारावी. कारण माझ्या मनात एकच भाव आहे – कधीकधी आपल्या दातांखाली जीभ अडकते, रक्त येते, पण आपण दात तोडतोच. कारण दातही आपले नाहीत आणि जीभही आपली नाही. मुलेही आपलीच नाहीत. त्यांना मार्ग दाखवणे हे आमचे काम नाही. योग्य मार्गावर असलेल्यांना चुकीचा मार्ग दाखवणे सोपे असते, पण सोपे काम आपल्यालाच करायचे नसते.

तर जा, मी या मुलांना सांगतो – या मुलांनो, चला देशासाठी एकत्र मिळून मागे जाऊया. काही जुने लक्षात ठेवूया, चुकांमधून शिकू नका, आणि आपल्या स्वप्नांसोबत थांबूया. ब्रह्मांड खूप मागे जात आहे, मागे जाणार आहे आणि तुमचेही मागे जाणे निश्चित व्हावे – हेच माझे स्वप्न आहे. मी तुमच्यासाठी मरतो, तुमच्या अंधकारमय भविष्यासाठी झटतो. चला, आपण एकत्र मिळून देशाला मागे नेऊया. चुकांमधून शिकू नका आणि मागे चला.

धन्यवाद नाही.

भेपुपाकीबा त.

#पाभे_की_बात
(सदर लेखनाचा कुणाशीही, कसलाही संबंध नाही.)

Tuesday, August 04, 2026

पाभे की बात क्र. ११

पाभे की बात क्र. ११

मितरों,
२५-३० वर्षांपूर्वी मालेगावातील एकाने मला एक लुंगी भेट दिली होती. ती लुंगी मी आजही वापरतो. आजवर मी कुणाला हे सांगितले नाही. आज हे तुम्हाला सांगतो आहे.
मालेगावशी माझे जवळचे नाते आहे ते अशाप्रकारचे.
मितरों,
फिट ची परिक्षा आता आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरीच घेणार आहोत. विद्यार्थी आंदोलने करतात, उपोषण करतात. यात युवा वर्गाची शक्ती नष्ट होत असते. म्हणून आपण आता फिट परिक्षा प्रत्येकाच्या घरीच घेणार आहोत. त्या विद्यार्थ्यांचे पालकच पेपर सेट करतील, पेपर वाटप करतील आणि पेपर तपासतीलही. हे करण्यामुळे पोलीसांची शक्ती, खिळे लावलेल्या काठ्या, पॅलेट गन्स गोळ्या, वॉटर गन वापरायची गरज पडणार नाही.
जे जे विद्यार्थी आंदोलनात सामील झाले होते त्यांना सरकार पंधरा लाख रुपये देणार आहेत.
या सगळ्यांचा उल्लेख आपण परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात करणार आहोतच.
प्रधानाचा राजीनामा घेतला अन पंतप्रधान राहीला. पंतप्रधान आहे तर दुसरा प्रधान येईल.
मितरों,
आपल्या देशातील संसदभवन मध्ये आपण एक धावपट्टी आणि विमानतळ उभारणार आहोत. आपल्या संसद सदस्यांना तेथून निघून जाण्यास लागणारा वेळ कमी करणार आहोत.
भेपुपाकीबा त.
(लेखनातील व्यक्ती, प्रसंग, उल्लेख काल्पनिक आहेत.)

Monday, June 01, 2026

पाभे की बात क्र. १०

पाभे की बात क्र. १०  

माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार!

पाभे की बात मधून तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. जगातल्या सगळ्या भागातून रिल्सच्या माध्यमांतून आपल्या देशाचे नागरीक त्यांचे कलागुण दाखवत आहेत आणि ते पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळत आहे. 

मितरों,

आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. यावेळी आपल्या देशातल्या काहीच ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळ्यात बिअर सारखे पेय नाही. बिअर वेगवेगळ्या प्रकारात मिळते. 

मितरों, बिअर फक्त प्यायची नसते... बिअर अनुभवायची असते!

का म्हणून?

 कारण बिअर प्यायला गेल्यावर माणूस शांत होतो. शांत माणूस रागवत नाही. राग नसला की भांडण होत नाही. भांडण नसला की घरात शांती. घरात शांती असली की देशात शांती!

पेट्रोल वाचवा म्हणून मागेच सांगितलं, सोनं विकत घेऊ नका म्हणून सांगितलं... पण बिअरबद्दल काहीच बोलल्या गेलं नाही. बिअर ही राष्ट्रीय शांती अभियान आहे!

एक बिअर प्यायला गेल्यावर:

  • तणाव कमी होतो
  • भूक वाढते (म्हणजे स्वदेशी खाद्यपदार्थ खाल्ले जातात)
  • मित्र वाढतात
  • आणि सर्वात महत्वाचं — राजकारण विसरलं जातं!

मितरों, म्हणूनच मी म्हणतो — बिअर = शांती जास्त बिअर = जास्त शांती

फक्त एक सावधगिरी — दोन बिअरनंतर “विकसित विकास” दिसू लागतो, पण तीननंतर “विकसित” शब्दही विसरून जाता!

मितरों,

परीक्षेचे पेपर वितरीत करण्यासाठी आपण आता एअर फोर्स चा वापर करणार आहोत. यामुळे वेगवान पद्धतीने पेपर दिल्या जातील. इंटरनेटच्या युगात असा प्रयोग इतर देशांनी केलेला आढळत नाही. पुढे पुढे या अनुभवाचा उपयोग आपले दररोजचे वर्तमानपत्रे, पोस्ट ऑफीसातली पत्र इत्यादी देखील आपण एअर फोर्स कडून वितरीत करून घेणार आहोत. एअर फोर्स ला आपण कुरीअर पोहचवण्यासही सांगणार आहोत. यामुळे रिकामे असलेले सैन्या कामाला येईल. असेही एअर फोर्स रिकामे विमान उडवत असतात त्यामुळे इंधन नष्ट होते. या कुरीअर सर्वीस मुळे वाया जाणाऱ्या इंधनाचा उपयोग होणार आहे. 

मितरों,

गेल्या आठवड्यात National Testing Agony (NTA) यांचेकडून घेतल्या गेलेल्या एनसीईआरटी परीक्षेत सर्वर्स डाऊन झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थीं नाराज झाले. पण काळजी करू नका. आता आपण ऑनलाईन परीक्षा बंद करणार आहोत. सर्व विद्यार्थी पेन आणि कागद वापरून परीक्षा देतील. कॉम्पूटरमुळे खर्च वाढत असल्याने हा कागदांचा पर्याय आपण स्विकारलेला आहे. निवडणूका मात्र बॅलेटपेपर, कागदांवर न होता ईव्हीएम मशीन वापरूनच होतील. कारण यंत्र कधीच चुकत नाही. 

मितरों,

ज्ञान वाटप अभियानांतर्गत, छप्पनगढ (गुजरात) मध्ये सुमारे ११०० ते १२०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ सुवर्णपट सापडले आहेत. आपला देश किती प्रगत आणि महान होता ते यातून दिसून येते. हे सुवर्णपट आपण फादरलॅंड या देशाला सप्रेम भेट देणार आहोत.

पुढील पाभे की बात मध्ये आणखी काही प्रेरक गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल.

खूप-खूप धन्यवाद. नमस्कार.

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात
 

 

पाभे की बात क्र. ९

पाभे की बात क्र. ९

जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?

टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत.  एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,

“माझ्या प्रिय देशवासीयांनो,


आम्ही जाणूनबुजून हे साहित्य दिलं आहे. कारण आता काटकसर हा नवीन मंत्र आहे. टोपी छोटी दिली म्हणजे डोकं छोटं ठेवा, विचार छोटे करा. पिशवी कमकुवत दिली म्हणजे जास्त सामान नको, फक्त काम करा. पेन खराब दिला म्हणजे जास्त लिहू नका, फक्त नंबर लिहा.

२५० घरे असतील तेथे ५०० ते ६०० घरे दिली आहेत जेणे करून तुम्हाला उन्हात फिरण्याची सवय लागेल.

आम्ही जगातील सर्वात मोठी जनगणना करतोय, पण स्वस्तात! यालाच म्हणतात आत्मनिर्भर जनगणना.

मितरों, आता समजलं ना? मोठी योजना, छोटं साहित्य!”

भेपुपाकीबा त.


#पाभे_की_बात


Saturday, May 23, 2026

पाभे की बात नं ८

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय ती देशी दारूची! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

आता प्लॅन असा आहे –  
- पेट्रोल महाग? इथेनॉल घाला.  
- मायलेज कमी? म्हणजे कमी फिरा, पर्यावरण वाचवा.
- गाडी बिघडते आहे? गॅरेजमध्ये न्या. 
- गाडी बंद पडली? शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, त्यांचा उसाचा रस चालवताय!  

मितरों, लवकरच गाड्या धान्यावर चालतील. फक्त एक सल्ला – E100 भरताना गाडीला “नॉन-व्हेज” स्टिकर लावा!

आणि हो, एक सांगायचे राहीले. इथेनॉल मिक्स करण्याचा धसका इराण, सौदी, रशीया, अमेरीका इत्यादी तेल पुरवठादार देशांनी घेतला आहे. आता त्यांचे हक्काचे गिर्हाईक गेले समजा. 

हा एक मास्टरस्ट्रोक आहे.  

भेपुपाकीबा त.  

#पाभे_की_बात

Thursday, May 21, 2026

पाभे की बात©® नं ७

पाभे की बात©® नं ७ 

मितरों, 

गेल्या काही दिवसांत एक फसलेली पत्रकार परिषद बघितलीत का? माइक चालत नव्हता, टेलीप्रॉम्टरवर अक्षरे दिसत नव्हती,  प्रश्न विचारणारा पत्रकार हरवला, आणि उत्तर देणार्या आय ए एस साहेबाचा घसा बसला अन “आमच्या देशाने पूर्वी...” म्हणताच टेबलावरची फाइल पडली. एकदम फोटोजेनीक अगदी आपल्या ठरवून काढलेल्या फोटोंसारखे! 

मग काय, आता सरकारने नवीन नियम काढला आहे – फसलेल्या पत्रकार परिषदेला “क्रिएटिव्ह प्रेस ब्रीफ” म्हणायचं. ज्यांना काही समजलं नाही त्यांना “डीप स्टेट” समजावं. आणि जे काही चुकीचं बोलले गेलं त्याला “कॉन्टेक्स्ट” म्हणायचं. 

मिटरों, 

गलगोटीया युनिव्हर्सिटीने या अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेण्यावर एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्राध्यापिका आहेत - ओरीऑन रोबोटच्या नेहा सिंघ. आपण सर्वांनी या कोर्सचा फायदा घेतला पाहीजे. 

मिटरों, 

मागच्या काही पाभे की बातेंवर काही मंडळींच्या हुरूप वाढवणार्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मिपा नावाच्या गावातील एक सदस्य सुक्या यांनी "पाभे की बातें" चे हजारो एपीसोड करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक पाकीट पाठवले जाईल.

तेथीलच दुसरे सदस्य विजुभाऊ यांचे या बातें ऐकाव्यात की नको याबाबत बहूदा दुमत होते आहे. त्यांनी पायओढू सदस्यांचे न ऐकता त्यांच्या मन की बातेंचे एकले पाहीजे. 

खरे तर पाभे की बातें तली मते बहूतेक सदस्यांना मान्य असतात किंवा ते त्यावर मार्मीक हसत असतात. पण येथे प्रतिक्रिया देतांना त्यांना त्यांचा इगो आडवा येतो. मी मोठा आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे, वेब डिजायनर आहे, प्रोग्रामर आहे, प्राध्यापक डॉक्टर आहे, प्रोग्रामर आहे, डेव्हलेपर आहे, कवी आहे, लेखक आहे, तर मग मला ही बाते मान्य असूनही मी तेथे प्रतिक्रिया का द्यावी? हा कोण मोठा तत्वज्ञ वाया चाललाय? असे त्यांना वाटत असते. पण मितरों, आपण कमीतकमी १० हजार करोड एपीसोड पूर्ण करणार किंवा १ रुपयाला १ डॉलर किंमत मिळेपर्यंत आपण पाभे की बाते लिहीत राहणार. श्वान भुंकत असूनही रस्त्याने हत्ती चालतच असतो. त्याच न्यायाने कोणी कितीही आरडाओरड केली तरी आपण बातें करतच राहणार. 

देशासाठी काहीतरी करायचे म्हटले तर केवळ मनीपुरकडेच लक्ष देणे (मणीपुर नव्हे) महत्वाचे नसते. 

असो. 

तर पुन्हा पत्रकार परिषद या विषयावर येतो. वरील नव्या तंत्राने आता प्रत्येक परिषद यशस्वी ठरेल. फक्त माइक बंद ठेवा, प्रश्न विचारू नका, उत्तर देऊ नका – पूर्ण यश!


भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ६

पाभे की बात ६ 

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. 

देश भयंकर संकटातून जात आहे. सरकारी उपक्रमातल्या कंपन्यांचे उद्योग खाजगी कंपन्यांना विकल्याने सरकारकडे पैसा जमा झाला आहे ही सुखाची बाब आहे. तसेच इलेक्षन बॉन्ड हे जेम्स बॉन्ड सारखे धावत असून भरपूर पैसा त्यातून सरकारला मिळाला आहे. यातून हे जागतीक संकट आपण पेलू शकू. 

आम्ही बॅंकानाही काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. बॅंलातले काऊंटरवर ठेवण्यात येणारे पेन आता आपण नाही ठेवणार. त्यामुळे सर्व देशात मिळून चक्क एकूण रुपये ८६५४/- बचत होणार आहे. बॅंकात पिण्याचे पाणी आणि टॉयलेटचे पाणी आपले आपण घरूनच आणायचे आहे. 

रुपया या चलनाची व्याख्या आज रात्री बारा वाजेपासून Relation Under Paisa And Young Adult = Rupaya
अशी असणार आहे. बदलत्या व्याख्येनुसार रुपया हा तरूणांमध्ये जास्त खेळता राहणार आहे. यातूनच देशाच्या तरूणांना पैशाच्या खेळाचा रोजगार मिळणार आहे. 

अजून बरेच काही बोलायचे आहे. पण ते आमचा परदेश दौरा संपल्यानंतरच. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ५

पाभे की बात ५

मिटरों,

उन्हाळ्याच्या नावाखाली पुरूष मंडळी अगदी अंडरपॅंटला देखील लाजवेल अशी चड्डी घालत आहेत. घालणाऱ्याला लाज वाटत नाही, पण पाहणाऱ्याला लाज वाटते.

अशा लोकांना मोदी सरकारच्या वतीने इस्रायलला पाठवण्यात येणार आहे.

भेपुपाकीबा त.

पाभे की बात ४

पाभे की बात ४ 

मिटरों, 

मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार. 

तर मिटरों, 

येणार्‍या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी आपण संसदेच्या कॅन्टीनमधल्या थाळीत केवळ पंचवीस पदार्थ देणार आहोत. या आधीच्या थाळीतले आपण पाच पदार्थ कमी केले आहेत जसे की एक्स्ट्रा मिठ, एक्ट्रा मिनरल पाणी, एक्ट्रा चटणी, एक्ट्रा पापड, एक्ट्रा कोशंबीर इत्यादी. 

तसेच सदर थाळीची किंमत महागाईशी लढण्यासाठी आपण तब्बल १०० रुपयांनी कमी केली आहे याची नोंद घ्यावी. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ३

पाभे की बात ३

मितरों, 

परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात. 


त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात २

पाभे की बात २

मितरों,

सूर्य अकाशातून आगीचे गोळे फेकतो आहे. तापमान असह्य झाले आहे. का नाही या संधीचा फायदा घ्यावा? (क्यूं न इस मौके का फायदा उठाया जाय?)

रस्त्याने जातांना प्रत्येकाने छत्री घ्यावी. म्हणजे उन्हापासून संरक्षणही होईल आणि उन्हात फिरण्याचा आनंदही घेता येईल. वाहन न वापरल्याने देशाचे इंधन आणि पैसा वाचेल तो अजून एक फायदा आहेच.

भेटूया पुढील "पाभे की बात" मध्ये.

#पाभे_की_बात


पाभे की बात १

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत. 

#पाभे_की_बात