पाभे की बात १
मितरों,
कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.
तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.
तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.
आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.
भेटूया पुढल्या पाभे की बातेत.
#पाभे_की_बात
No comments:
Post a Comment