पाभे की बात ६
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत.
देश
भयंकर संकटातून जात आहे. सरकारी उपक्रमातल्या कंपन्यांचे उद्योग खाजगी
कंपन्यांना विकल्याने सरकारकडे पैसा जमा झाला आहे ही सुखाची बाब आहे. तसेच
इलेक्षन बॉन्ड हे जेम्स बॉन्ड सारखे धावत असून भरपूर पैसा त्यातून सरकारला
मिळाला आहे. यातून हे जागतीक संकट आपण पेलू शकू.
आम्ही
बॅंकानाही काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. बॅंलातले काऊंटरवर ठेवण्यात
येणारे पेन आता आपण नाही ठेवणार. त्यामुळे सर्व देशात मिळून चक्क एकूण
रुपये ८६५४/- बचत होणार आहे. बॅंकात पिण्याचे पाणी आणि टॉयलेटचे पाणी आपले
आपण घरूनच आणायचे आहे.
रुपया या चलनाची व्याख्या आज रात्री बारा वाजेपासून Relation Under Paisa And Young Adult = Rupaya
अशी
असणार आहे. बदलत्या व्याख्येनुसार रुपया हा तरूणांमध्ये जास्त खेळता
राहणार आहे. यातूनच देशाच्या तरूणांना पैशाच्या खेळाचा रोजगार मिळणार आहे.
अजून बरेच काही बोलायचे आहे. पण ते आमचा परदेश दौरा संपल्यानंतरच.
भेपुपाकीबा त.
#पाभे_की_बात
रामराम हो पाव्हणं! वाईच जरा बसा ईथं.
Thursday, May 21, 2026
पाभे की बात ६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment