पाभे की बात©® नं ७
मितरों,
गेल्या
काही दिवसांत एक फसलेली पत्रकार परिषद बघितलीत का? माइक चालत नव्हता,
टेलीप्रॉम्टरवर अक्षरे दिसत नव्हती, प्रश्न विचारणारा पत्रकार हरवला, आणि
उत्तर देणार्या आय ए एस साहेबाचा घसा बसला अन “आमच्या देशाने पूर्वी...”
म्हणताच टेबलावरची फाइल पडली. एकदम फोटोजेनीक अगदी आपल्या ठरवून काढलेल्या
फोटोंसारखे!
मग काय, आता
सरकारने नवीन नियम काढला आहे – फसलेल्या पत्रकार परिषदेला “क्रिएटिव्ह
प्रेस ब्रीफ” म्हणायचं. ज्यांना काही समजलं नाही त्यांना “डीप स्टेट”
समजावं. आणि जे काही चुकीचं बोलले गेलं त्याला “कॉन्टेक्स्ट” म्हणायचं.
मिटरों,
गलगोटीया
युनिव्हर्सिटीने या अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेण्यावर एक अभ्यासक्रम
सुरू केला आहे. प्राध्यापिका आहेत - ओरीऑन रोबोटच्या नेहा सिंघ. आपण
सर्वांनी या कोर्सचा फायदा घेतला पाहीजे.
मिटरों,
मागच्या
काही पाभे की बातेंवर काही मंडळींच्या हुरूप वाढवणार्या प्रतिक्रिया आल्या
आहेत. मिपा नावाच्या गावातील एक सदस्य सुक्या यांनी "पाभे की बातें" चे
हजारो एपीसोड करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक पाकीट पाठवले जाईल.
तेथीलच
दुसरे सदस्य विजुभाऊ यांचे या बातें ऐकाव्यात की नको याबाबत बहूदा दुमत
होते आहे. त्यांनी पायओढू सदस्यांचे न ऐकता त्यांच्या मन की बातेंचे एकले
पाहीजे.
खरे तर पाभे की
बातें तली मते बहूतेक सदस्यांना मान्य असतात किंवा ते त्यावर मार्मीक हसत
असतात. पण येथे प्रतिक्रिया देतांना त्यांना त्यांचा इगो आडवा येतो. मी
मोठा आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे, वेब डिजायनर आहे,
प्रोग्रामर आहे, प्राध्यापक डॉक्टर आहे, प्रोग्रामर आहे, डेव्हलेपर आहे,
कवी आहे, लेखक आहे, तर मग मला ही बाते मान्य असूनही मी तेथे प्रतिक्रिया का
द्यावी? हा कोण मोठा तत्वज्ञ वाया चाललाय? असे त्यांना वाटत असते. पण
मितरों, आपण कमीतकमी १० हजार करोड एपीसोड पूर्ण करणार किंवा १ रुपयाला १
डॉलर किंमत मिळेपर्यंत आपण पाभे की बाते लिहीत राहणार. श्वान भुंकत असूनही
रस्त्याने हत्ती चालतच असतो. त्याच न्यायाने कोणी कितीही आरडाओरड केली
तरी आपण बातें करतच राहणार.
देशासाठी काहीतरी करायचे म्हटले तर केवळ मनीपुरकडेच लक्ष देणे (मणीपुर नव्हे) महत्वाचे नसते.
असो.
तर
पुन्हा पत्रकार परिषद या विषयावर येतो. वरील नव्या तंत्राने आता प्रत्येक
परिषद यशस्वी ठरेल. फक्त माइक बंद ठेवा, प्रश्न विचारू नका, उत्तर देऊ नका –
पूर्ण यश!
भेपुपाकीबा त.
#पाभे_की_बात
रामराम हो पाव्हणं! वाईच जरा बसा ईथं.
Thursday, May 21, 2026
पाभे की बात©® नं ७
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment