Wednesday, January 16, 2019

आमचा ग्गो आडमिन

हलके हलके हलवा गृपचा पाळणा
पाळणा हलला तर खुष होती नाना ||

बातमी दे लिंक दे फोटो स्टिकर दे
चर्चा करुन वाद घालून प्रतिउत्तर घे
आजच्या दिसाचा कोटा भरला पाहीजे ना ||

कुणी काही म्हण पण आडमिन खमक्या हो
कुणाला काढील कुणाला घेईल माहीत नसते हो
धडधड मनी मेंबरांच्या आज माझा नंबर नाही ना? ||

आजकाल आडमिन फार कडक झालेत
शिथीलता गेली अन चांगले वळ आलेत
गळून गेले अवसान अन बडवले वळूंना  ||

असे नका करु तुम्ही विनवणी आमची
गृप एक जरी नाही कमी इतर गृपांची
कितीक चालवती गृप आम्हाला माहीत नाहीना ||

======================================


करु स्वागत प्रतिक आपूले
तुमच्यासाठी नाना नमले ||

काढ घाल करायला नका लावू
ठोकाठोकी नका करत जावू
आम्हा सार्यांचे त्यांनी ऐकले ||

ताठपणा दोघेही सोडा
शिथीलतेने सारे जोडा
गर्वपणाही गळून गेले
करु स्वागत प्रतिक आपूले||

===========================

आमचा ग्गो आडमिन
येईल त्याला बडविन

बडवित गेला गृपात
मेंबरं गेली जात्यात

जात्याचा दांडा
कोणी उभा मांडा

मेसेजचे दाणे जात्यात
खालून प्रतिसाद पडतात

प्रतिसादाचे लोणचे
चर्चेचे गुर्हाळाचे

गुर्हाळात नाही गुळ
आम्हाला आहे वेळ

वेळ गेला वेलीवर
चर्चा गेली भांडणावर

भांडण भांडण खेळू
आडमिनला देवू निस्तरू

गृप जन्मला ग सखे गृप जन्मला ||

सुर्य अवकाशातून वर आला, पक्षी गण अवकाशात विहारू लागले, हवा मंद वाहू लागली अन केदारनानांना काय झाले पहा:-

गृप जन्मला ग सखे गृप जन्मला ||

संक्रातीच्या या शूभ दिनी
प्रभातीस उठवले आज तुम्ही
घंटागाडीच्या घंटेचा आवाज ऐकला ||

केदारनाना होतेच अडलेले
तसेच होते वेदनेने सहलेले
आजच्याच दिनी पहा प्रसूत जाहला ||

मरण धाड देवा | कधीचा केला धावा ||

मरण धाड देवा | कधीचा केला धावा ||
कितीक वाट पाही | जिवाची चिंता नाही ||
जगणे जगले | तृप्त होवोनिया गेले ||
सच्या पाषाणाचे वाची | सत्य कळो सकळांसी ||
कितीक वाट पाही | जिवाची चिंता नाही ||
जगणे जगले | तृप्त होवोनिया गेले ||
सच्या पाषाणाचे वाची | सत्य कळो सकळांसी ||