Showing posts with label भक्तीगीत. Show all posts
Showing posts with label भक्तीगीत. Show all posts

Saturday, September 28, 2019

तुझ्या भेटीला आलो दत्ता

तुझ्या भेटीला आलो दत्ता
सत्वरी या आता ||
तुझ्या मंदीराची केली वाट सोपी
नसे काही चिंता, मनी आस मोठी
वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा ||
भक्तांची दु:खे करुनीया दूर
दिले जीवनात सुख भरपूर
सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता ||
पाहूनिया रुप होईल मनाची शांती
नसे आस कसली, तिच विश्रांती
सखा तूच गुरू तूच तूच होई दाता ||
ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती
तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी
रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां ||
- पाषाणभेद
२८/०९/२०१९

Saturday, June 8, 2019

माझे मन पाही विठ्ठल मुर्ती

माझे मन पाही विठ्ठल मुर्ती
सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१||
नाही मज वेळ जाण्या राऊळा
नच पूजा केली कधी काळां ||२||
रमलो संसारी विना विचार
भाव भक्तीचा केवळ उपचार ||३||
नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी
पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४||
०९/०५/२०१९

Wednesday, January 16, 2019

मरण धाड देवा | कधीचा केला धावा ||

मरण धाड देवा | कधीचा केला धावा ||
कितीक वाट पाही | जिवाची चिंता नाही ||
जगणे जगले | तृप्त होवोनिया गेले ||
सच्या पाषाणाचे वाची | सत्य कळो सकळांसी ||
कितीक वाट पाही | जिवाची चिंता नाही ||
जगणे जगले | तृप्त होवोनिया गेले ||
सच्या पाषाणाचे वाची | सत्य कळो सकळांसी ||

Sunday, December 16, 2012

मोहन मै तेरे प्रेम की प्यासी


मोहन मै तेरे प्रेम की प्यासी
तेरे चरण की हो जावूं दासी
मै तेरे प्रेम की प्यासी

मेरे नैन तुझको चाहे
तुझे देखते वहीं सुखावे
मेरे मनकी दूर हो जाय उदासी
मोहन रे मै तेरे प्रेम की प्यासी
हरी मै तेरे प्रेम की प्यासी


{{{मोहन मै तोरे प्रेम की प्यासी
तोरे चरण की हो जावूं दासी
हरी रे मै तोरे प्रेम की प्यासी

मोरे नैन तोहे चाहे
तोहे देखते वहीं सुखावे
मोरे मनकी दूर हो जावे उदासी
मोहन मै तो तोरे प्रेम की प्यासी
हरी रे मै तोरे प्रेम की प्यासी }}}

- पाषाणभेद

Monday, January 23, 2012

नको रे कान्हा

नको रे कान्हा

नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी
नको लगट दावू उगीचच खेटूनी ||

नार मी भोळी साधी सरळ हरणी
रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी
सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले
अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी ||

गोरी माझी काया तू रे सावळा
मनात दुजे काही चेहेरा भोळा
नको छेडाछेडी दिसे मग सार्‍यांना
ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी ||

श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा
केशव मुरलीधर माधवा गोविंदा
अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी
विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी ||

तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण
तुझ्याविण जग सारे होई वैराण
यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले
तुझ्यासवे त्यात गेले चिंब न्हाऊनी ||

- पाभे

Friday, December 30, 2011

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||

या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||१||

नांदूरमधमेश्वर धरण जवळ दोन मैलावर
उस द्राक्ष पिकवी शेतकरी कष्टाने फार
नाशिकजिल्ह्यातले हे पक्षी अभयारण्य
गोदावरी पुढं वाहते पिकवीत रानं
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||२||

गणपती सरस्वती देवीच्या आजूबाजूला
होमकुंड मंदिरात दाखवीते ज्वाला
वाहन देवीचे वाघ समोर दर्शनाला
मन प्रसन्न होई आईला भेटून
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||३||

निळकंठेश्वर महादेव मंदिर हेमाडपंथी
हरहर शंभो शंकराची समोर वसती
एका गावात दोन देव नांदती
अख्यायीका प्रसिध्द पुरानकालापासून
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||४||

म्हाळसादेवी कुळदेवी भक्त कुळांची
भक्त तिचे सारे देशातून येती
आशिर्वाद दर्शन घेवून जाती
पाषाणभेद बुध्दीहीन करी आईचे कवन
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||५||

- पाषाणभेद

Sunday, May 17, 2009

आरती पालीच्या बल्लाळेश्वराची

आरती बल्लाळाची(चालीसहीत)

जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वरा
आरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळा
जयदेव जयदेव || ध्रु ||

देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी
आत असे मुर्ती शेंदरी उघडी
समोर मोठी घंटा अन खांब लाकडी
वर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी ||१||
जयदेव जयदेव ||ध्रु||

देवा तुझा वास असे पाली गावी
तव दर्शने माझी द्रुष्टी सुखावी
मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी
भक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी ||२||
जयदेव जयदेव ||ध्रु||

पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असे
मंदिर सुंदर मागे सरसगड वसे
वर्णन म्या पामर करू कैसे
सच्चा एक मुढ वंदन करीतसे ||३||
जयदेव जयदेव ||ध्रु||

५/०१/१९९८