Showing posts with label काव्यरस. Show all posts
Showing posts with label काव्यरस. Show all posts

Tuesday, May 19, 2026

रानफुले

असाच भटकत रानात असता
रानफुले समोर येती

नव्हता कसला गंध तयांना
रंगही नव्हते भरजरी 
 
विविध परी तयांत होती 
नक्षी बारीक नाजूक सुंदर 
 
कोमल पिवळे गेंद 
उन्हात चमके वार्यावरती 
 

वेड लागले मलाच तेथे 
दृष्य मनोरम खरोखर ते 
 
डोंगर उतार पठारावरती 
फुले पाहता लागली समाधी 
 
घोस तयांचे लेऊन घ्यावे 
वाटले तक्षणी अंगावरती 
 
एकरूप व्हावे, तेथेच रमावे 
परत न फिरावे घराप्रती 
 
बघतो जेव्हा अचानक 
रानफुले समोरी येती 
 
- पाभे (03/10/24) 
(काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)