Tuesday, June 02, 2026

🏟 पुण्याच्या भेटीचे वर्णन ✈

 🏟 पुण्याच्या भेटीचे वर्णन ✈

नुकतीच मी👩 भारतात आले होते. मला सुटी उशीरा मिळाल्याने एकटीने प्रवास केला. आमचे हे👨 आधीच पोहोचले होते. सध्याला हिंजवडीतल्या त्यांच्या कंपनीत🏛 ते वर्क💻 फॉम होम करत होते. हे काम संपवून आम्ही सगळे परत अमेरीकेत🏡 परतणार आहोत. 

पुण्यातल्या त्यांच्या पेठेतल्या घरी🏙 म्हणजे माझ्या सासरी मला जास्त राहण्याची सवय नाही. मी आपली माझ्या माहेरीच - कोरेगाव पार्कातल्या घरी🏙 उतरले. दोन दिवसांनंतर यांना अधीक महिन्याचे वाण🎁 घ्यायला बोलवले. वाण सामानात सगळ्या वस्तू जिथल्या तिथे केल्या. तयार अनारसे🥮🍥 तर अगदी घरच्यासारखे जाळीदार होते. जावयाचे वाण म्हणून अडीच तोळ्याची अंगठी💍, कपडे👔🧥👕👖 आणि रोख १० हजार💵💶 दिले. 

पुण्यात सध्या खूप उन☀🌡आहे. आमच्याकडे तिकडे उन जास्त⛅ लागत नाही म्हणून मला उन्हाची सवय💇‍♀️ नाही. गेल्या शनिवारी विमाननगरमधल्या फिनीक्स मॉल🏬 मध्ये मस्त शॉपींग🎁🎀🎟🎞🎫🎡🎠🛒👕🕶👓👗👛👜👝🛍👞👠👡👒केली. सध्या आंब्याचा🥭सिजन सुरू असल्याने आंब्याच्या🥭फ्लेवरचे आईसक्रीम🍨🍦 खाल्ले. कोकम सरबत, कैरीचे पन्हे, ताक इत्यादीचा आस्वाद घेतला. एक छानसा मुवी🎞🎟🎫🎟🎵🎶🎬🎥📽 बघितला. पेट्रोलसाठी⛽रांगा🚗🚓🚕🛺🚙🚌🚐🚑🚒🚚🚛🚜🚘🚔🚖🚍🛵🏍 वगैरे लागलेल्या दिसल्या नाहीत. 

दुसऱ्या दिवशी मैत्रीणींना👩👩‍🦰👩‍🦱🙋‍♀️ फोन📱 करून लक्ष्मी रोडला😍 फिरलो. साड्या🥻🥻🥻 घेतल्या. तुळशीबागेत खरेदी🎁🎀🧶🧵🛒👚👝🛍 केली. 

आता पुण्यात खूप ट्राफीक🏍🛵🏍🛵🚚🚒🚐🚌🚙🛺🛺🛺🛺🛺🛺🚗🚗🚗🚗लागते आहे. पूर्वीचे शांत😑😑 पुणे दिसले नाही. जेथे तेथे नवे रस्ते, उड्डाणपुलांचे बांधकाम🏟🏚🏠🏡⛪🏙🛕🛕🕌🕋🏢🏢🏢🏢🏣 अन रहदारी दिसली. 

पुढच्या आठवड्यातले विमानाचे✈तिकीट बुक झाले आहे. आता परतण्याचे वेध लागले आहे.   

- लेखिका: अरूंधती नेटवाडेकर (सहस्त्रधारकर), (क्वीन्स, न्युयॉर्क) @arundhati_n2007

Monday, June 01, 2026

जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे

जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे

वंदन करूया स्वतंत्र भुमातेचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||ध्रृ||
 
येथे लढल्या कितीक लढाया
भाले फेकले तलवारी परजल्या
अटकेपार झेंडे रोवूनी
शौर्य गाजले मराठी रक्ताचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||१||
 
वेरूळ अजिंठा कार्ला लेणी
दगडी सौंदर्य वसले या ठाणी
किल्ले शिवरायांचे भक्कम दुर्गम
जलदुर्गही रक्षण करीती देशाचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||२||
 
धोंडे केशव भाऊराव टिळक सावरकर
ताराराणी ताराबाई फुले शाहू आंबेडकर
रानडे दादासाहेब यशवंतराव
साने गोखले आण्णाभाऊ नाना पाटील
जिजाऊ अहिल्याबाई दुर्गाबाई सिंधूताई
असे धुरीण जन्मले कौतूक कितीक यांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||३||
 
येथे आहे संतांची पावन परंपरा
ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष खरा
भक्तीच्या रंगात न्हाली ही धरती
गुंजती अभंग स्वर भक्तीमय सुरांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||४||
 
सह्याद्री उभा हा कणखर अभिमानी
नद्या वाहती जणू अमृताचे पाणी
शेतात डोलती सोनरी पिके
वैभव खुलते या समृद्ध मातीचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||५||
 
पश्चिमेस सागरकिनारा, कोकण हिरवागार
पूर्वेला विदर्भभूमी समृद्धीचा भंडार
उत्तरेस खानदेशी कष्टाची असे कास
दक्षिणेस सह्याद्री उभा भूषण देशाचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||६||
 
कला संस्कृती यांचा गंध न्यारा
लावणी पोवाडा भारुडाचा झंकारा
ज्ञान-विज्ञानाच्या तेजाने उजळुनी
नाव झळकले मराठी जनांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||७||
 
हरपले किती भूभाग सीमांच्या वाटेचे
जपले स्वप्न अजुनी एकीच्या लढ्याचे
मराठी मनांत धग संयुक्ततेची
पूर्ण होवो स्वप्न अखंड महाराष्ट्राचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||८||
 
एकीच्या बळावर पुढती जाऊ
महाराष्ट्र भूमीचा गौरव वाढवू
जय जय महाराष्ट्र नाद घुमू दे
वंदन करूया पवित्र मातृभूमीचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||९||

पाभे की बात क्र. १०

पाभे की बात क्र. १०  

माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार!

पाभे की बात मधून तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. जगातल्या सगळ्या भागातून रिल्सच्या माध्यमांतून आपल्या देशाचे नागरीक त्यांचे कलागुण दाखवत आहेत आणि ते पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळत आहे. 

मितरों,

आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. यावेळी आपल्या देशातल्या काहीच ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळ्यात बिअर सारखे पेय नाही. बिअर वेगवेगळ्या प्रकारात मिळते. 

मितरों, बिअर फक्त प्यायची नसते... बिअर अनुभवायची असते!

का म्हणून?

 कारण बिअर प्यायला गेल्यावर माणूस शांत होतो. शांत माणूस रागवत नाही. राग नसला की भांडण होत नाही. भांडण नसला की घरात शांती. घरात शांती असली की देशात शांती!

पेट्रोल वाचवा म्हणून मागेच सांगितलं, सोनं विकत घेऊ नका म्हणून सांगितलं... पण बिअरबद्दल काहीच बोलल्या गेलं नाही. बिअर ही राष्ट्रीय शांती अभियान आहे!

एक बिअर प्यायला गेल्यावर:

  • तणाव कमी होतो
  • भूक वाढते (म्हणजे स्वदेशी खाद्यपदार्थ खाल्ले जातात)
  • मित्र वाढतात
  • आणि सर्वात महत्वाचं — राजकारण विसरलं जातं!

मितरों, म्हणूनच मी म्हणतो — बिअर = शांती जास्त बिअर = जास्त शांती

फक्त एक सावधगिरी — दोन बिअरनंतर “विकसित विकास” दिसू लागतो, पण तीननंतर “विकसित” शब्दही विसरून जाता!

मितरों,

परीक्षेचे पेपर वितरीत करण्यासाठी आपण आता एअर फोर्स चा वापर करणार आहोत. यामुळे वेगवान पद्धतीने पेपर दिल्या जातील. इंटरनेटच्या युगात असा प्रयोग इतर देशांनी केलेला आढळत नाही. पुढे पुढे या अनुभवाचा उपयोग आपले दररोजचे वर्तमानपत्रे, पोस्ट ऑफीसातली पत्र इत्यादी देखील आपण एअर फोर्स कडून वितरीत करून घेणार आहोत. एअर फोर्स ला आपण कुरीअर पोहचवण्यासही सांगणार आहोत. यामुळे रिकामे असलेले सैन्या कामाला येईल. असेही एअर फोर्स रिकामे विमान उडवत असतात त्यामुळे इंधन नष्ट होते. या कुरीअर सर्वीस मुळे वाया जाणाऱ्या इंधनाचा उपयोग होणार आहे. 

मितरों,

गेल्या आठवड्यात National Testing Agony (NTA) यांचेकडून घेतल्या गेलेल्या एनसीईआरटी परीक्षेत सर्वर्स डाऊन झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थीं नाराज झाले. पण काळजी करू नका. आता आपण ऑनलाईन परीक्षा बंद करणार आहोत. सर्व विद्यार्थी पेन आणि कागद वापरून परीक्षा देतील. कॉम्पूटरमुळे खर्च वाढत असल्याने हा कागदांचा पर्याय आपण स्विकारलेला आहे. निवडणूका मात्र बॅलेटपेपर, कागदांवर न होता ईव्हीएम मशीन वापरूनच होतील. कारण यंत्र कधीच चुकत नाही. 

मितरों,

ज्ञान वाटप अभियानांतर्गत, छप्पनगढ (गुजरात) मध्ये सुमारे ११०० ते १२०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ सुवर्णपट सापडले आहेत. आपला देश किती प्रगत आणि महान होता ते यातून दिसून येते. हे सुवर्णपट आपण फादरलॅंड या देशाला सप्रेम भेट देणार आहोत.

पुढील पाभे की बात मध्ये आणखी काही प्रेरक गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल.

खूप-खूप धन्यवाद. नमस्कार.

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात
 

 

पाभे की बात क्र. ९

पाभे की बात क्र. ९

जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?

टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत.  एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,

“माझ्या प्रिय देशवासीयांनो,


आम्ही जाणूनबुजून हे साहित्य दिलं आहे. कारण आता काटकसर हा नवीन मंत्र आहे. टोपी छोटी दिली म्हणजे डोकं छोटं ठेवा, विचार छोटे करा. पिशवी कमकुवत दिली म्हणजे जास्त सामान नको, फक्त काम करा. पेन खराब दिला म्हणजे जास्त लिहू नका, फक्त नंबर लिहा.

२५० घरे असतील तेथे ५०० ते ६०० घरे दिली आहेत जेणे करून तुम्हाला उन्हात फिरण्याची सवय लागेल.

आम्ही जगातील सर्वात मोठी जनगणना करतोय, पण स्वस्तात! यालाच म्हणतात आत्मनिर्भर जनगणना.

मितरों, आता समजलं ना? मोठी योजना, छोटं साहित्य!”

भेपुपाकीबा त.


#पाभे_की_बात


Saturday, May 23, 2026

पाभे की बात नं ८

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय ती देशी दारूची! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

आता प्लॅन असा आहे –  
- पेट्रोल महाग? इथेनॉल घाला.  
- मायलेज कमी? म्हणजे कमी फिरा, पर्यावरण वाचवा.
- गाडी बिघडते आहे? गॅरेजमध्ये न्या. 
- गाडी बंद पडली? शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, त्यांचा उसाचा रस चालवताय!  

मितरों, लवकरच गाड्या धान्यावर चालतील. फक्त एक सल्ला – E100 भरताना गाडीला “नॉन-व्हेज” स्टिकर लावा!

आणि हो, एक सांगायचे राहीले. इथेनॉल मिक्स करण्याचा धसका इराण, सौदी, रशीया, अमेरीका इत्यादी तेल पुरवठादार देशांनी घेतला आहे. आता त्यांचे हक्काचे गिर्हाईक गेले समजा. 

हा एक मास्टरस्ट्रोक आहे.  

भेपुपाकीबा त.  

#पाभे_की_बात

Thursday, May 21, 2026

पाभे की बात©® नं ७

पाभे की बात©® नं ७ 

मितरों, 

गेल्या काही दिवसांत एक फसलेली पत्रकार परिषद बघितलीत का? माइक चालत नव्हता, टेलीप्रॉम्टरवर अक्षरे दिसत नव्हती,  प्रश्न विचारणारा पत्रकार हरवला, आणि उत्तर देणार्या आय ए एस साहेबाचा घसा बसला अन “आमच्या देशाने पूर्वी...” म्हणताच टेबलावरची फाइल पडली. एकदम फोटोजेनीक अगदी आपल्या ठरवून काढलेल्या फोटोंसारखे! 

मग काय, आता सरकारने नवीन नियम काढला आहे – फसलेल्या पत्रकार परिषदेला “क्रिएटिव्ह प्रेस ब्रीफ” म्हणायचं. ज्यांना काही समजलं नाही त्यांना “डीप स्टेट” समजावं. आणि जे काही चुकीचं बोलले गेलं त्याला “कॉन्टेक्स्ट” म्हणायचं. 

मिटरों, 

गलगोटीया युनिव्हर्सिटीने या अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेण्यावर एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्राध्यापिका आहेत - ओरीऑन रोबोटच्या नेहा सिंघ. आपण सर्वांनी या कोर्सचा फायदा घेतला पाहीजे. 

मिटरों, 

मागच्या काही पाभे की बातेंवर काही मंडळींच्या हुरूप वाढवणार्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मिपा नावाच्या गावातील एक सदस्य सुक्या यांनी "पाभे की बातें" चे हजारो एपीसोड करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक पाकीट पाठवले जाईल.

तेथीलच दुसरे सदस्य विजुभाऊ यांचे या बातें ऐकाव्यात की नको याबाबत बहूदा दुमत होते आहे. त्यांनी पायओढू सदस्यांचे न ऐकता त्यांच्या मन की बातेंचे एकले पाहीजे. 

खरे तर पाभे की बातें तली मते बहूतेक सदस्यांना मान्य असतात किंवा ते त्यावर मार्मीक हसत असतात. पण येथे प्रतिक्रिया देतांना त्यांना त्यांचा इगो आडवा येतो. मी मोठा आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे, वेब डिजायनर आहे, प्रोग्रामर आहे, प्राध्यापक डॉक्टर आहे, प्रोग्रामर आहे, डेव्हलेपर आहे, कवी आहे, लेखक आहे, तर मग मला ही बाते मान्य असूनही मी तेथे प्रतिक्रिया का द्यावी? हा कोण मोठा तत्वज्ञ वाया चाललाय? असे त्यांना वाटत असते. पण मितरों, आपण कमीतकमी १० हजार करोड एपीसोड पूर्ण करणार किंवा १ रुपयाला १ डॉलर किंमत मिळेपर्यंत आपण पाभे की बाते लिहीत राहणार. श्वान भुंकत असूनही रस्त्याने हत्ती चालतच असतो. त्याच न्यायाने कोणी कितीही आरडाओरड केली तरी आपण बातें करतच राहणार. 

देशासाठी काहीतरी करायचे म्हटले तर केवळ मनीपुरकडेच लक्ष देणे (मणीपुर नव्हे) महत्वाचे नसते. 

असो. 

तर पुन्हा पत्रकार परिषद या विषयावर येतो. वरील नव्या तंत्राने आता प्रत्येक परिषद यशस्वी ठरेल. फक्त माइक बंद ठेवा, प्रश्न विचारू नका, उत्तर देऊ नका – पूर्ण यश!


भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ६

पाभे की बात ६ 

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. 

देश भयंकर संकटातून जात आहे. सरकारी उपक्रमातल्या कंपन्यांचे उद्योग खाजगी कंपन्यांना विकल्याने सरकारकडे पैसा जमा झाला आहे ही सुखाची बाब आहे. तसेच इलेक्षन बॉन्ड हे जेम्स बॉन्ड सारखे धावत असून भरपूर पैसा त्यातून सरकारला मिळाला आहे. यातून हे जागतीक संकट आपण पेलू शकू. 

आम्ही बॅंकानाही काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. बॅंलातले काऊंटरवर ठेवण्यात येणारे पेन आता आपण नाही ठेवणार. त्यामुळे सर्व देशात मिळून चक्क एकूण रुपये ८६५४/- बचत होणार आहे. बॅंकात पिण्याचे पाणी आणि टॉयलेटचे पाणी आपले आपण घरूनच आणायचे आहे. 

रुपया या चलनाची व्याख्या आज रात्री बारा वाजेपासून Relation Under Paisa And Young Adult = Rupaya
अशी असणार आहे. बदलत्या व्याख्येनुसार रुपया हा तरूणांमध्ये जास्त खेळता राहणार आहे. यातूनच देशाच्या तरूणांना पैशाच्या खेळाचा रोजगार मिळणार आहे. 

अजून बरेच काही बोलायचे आहे. पण ते आमचा परदेश दौरा संपल्यानंतरच. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ५

पाभे की बात ५

मिटरों,

उन्हाळ्याच्या नावाखाली पुरूष मंडळी अगदी अंडरपॅंटला देखील लाजवेल अशी चड्डी घालत आहेत. घालणाऱ्याला लाज वाटत नाही, पण पाहणाऱ्याला लाज वाटते.

अशा लोकांना मोदी सरकारच्या वतीने इस्रायलला पाठवण्यात येणार आहे.

भेपुपाकीबा त.

पाभे की बात ४

पाभे की बात ४ 

मिटरों, 

मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार. 

तर मिटरों, 

येणार्‍या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी आपण संसदेच्या कॅन्टीनमधल्या थाळीत केवळ पंचवीस पदार्थ देणार आहोत. या आधीच्या थाळीतले आपण पाच पदार्थ कमी केले आहेत जसे की एक्स्ट्रा मिठ, एक्ट्रा मिनरल पाणी, एक्ट्रा चटणी, एक्ट्रा पापड, एक्ट्रा कोशंबीर इत्यादी. 

तसेच सदर थाळीची किंमत महागाईशी लढण्यासाठी आपण तब्बल १०० रुपयांनी कमी केली आहे याची नोंद घ्यावी. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ३

पाभे की बात

मितरों, 

परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात. 


त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात २

पाभे की बात २

मितरों,

सूर्य अकाशातून आगीचे गोळे फेकतो आहे. तापमान असह्य झाले आहे. का नाही या संधीचा फायदा घ्यावा? (क्यूं न इस मौके का फायदा उठाया जाय?)

रस्त्याने जातांना प्रत्येकाने छत्री घ्यावी. म्हणजे उन्हापासून संरक्षणही होईल आणि उन्हात फिरण्याचा आनंदही घेता येईल. वाहन न वापरल्याने देशाचे इंधन आणि पैसा वाचेल तो अजून एक फायदा आहेच.

भेटूया पुढील "पाभे की बात" मध्ये.

#पाभे_की_बात


पाभे की बात १

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत. 

#पाभे_की_बात 

Tuesday, May 19, 2026

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||ध्रू||

जवा येईल तवा आणीन पेट्रोल डिजेलला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||१||

सैपाक करत होती तवाच सिलेंडर संपला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||२||

साडी चोळी नको, नको घेऊ माळ तू मला
एकडाव पेट्रोलची टाकी भरून दे गाडीला ||३||

कोबीची भाजी करपली, मासे नाही भाजीला
डोनाल्ड अन बेंजामीनचा मुडदा बशिवला ||४||

राकेल नाय मिळत, झाडं नाय सरपणणाला
लवकर ये घराला, काळजी लागली मला ||५||

- पाभे
१८/०४/२०२६

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

 May be an image of text

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) 

२१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते. या पार्श्वभूमीवर राण नावाच्या छोट्या पण हट्टी देशाने इतिहासात नोंद होईल अशी लढाई लढली. राण हा भूगोलाने लहान पण मनाने मोठा देश होता. डोंगर, दऱ्या, जंगले आणि कठीण हवामान यामुळे त्याची जमीन जिंकणे कधीच सोपे नव्हते. लोक साधे, मेहनती आणि स्वाभिमानी होते. त्यांच्या संस्कृतीत स्वातंत्र्याला देवासारखे स्थान होते. 

पण जगाच्या राजकारणात मोठा खेळ सुरू झाला. महासत्ता मानले जाणारे दोन मित्रदेश इस्त्रा आणि मेरीका यांनी एकत्र येऊन राणवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांना राणच्या पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या दुर्मिळ ऊर्जा खनिजावर नियंत्रण हवे होते. त्या खनिजामुळे पुढील पिढीची ऊर्जा तंत्रज्ञान क्रांती घडणार होती. इस्त्रा आणि मेरीका तंत्रज्ञानात अत्यंत पुढे होते. त्यांच्या सैन्याकडे स्वयंचलित ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे युद्धरोबोट, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि अवकाशातून माहिती देणारे उपग्रह होते. युद्ध सुरू होण्याआधीच जगातील बहुतेक विश्लेषकांनी निकाल लावला होता “राण काही दिवसांत शरण येईल.” पण इतिहास नेहमी गणिताप्रमाणे चालत नाही. युद्धाचा पहिला दिवस आला तेव्हा इस्त्रा-मेरीकाच्या आकाशात ड्रोनची काळी सावली पसरली. त्यांच्या स्मार्ट क्षेपणास्त्रांनी राणच्या अनेक सैनिकी तळांवर अचूक हल्ले केले. उपग्रहांमधून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. 

तरीही राणचे सैनिक मागे हटले नाहीत. राणच्या सैन्याकडे फारशी आधुनिक साधने नव्हती; पण त्यांच्याकडे होते भूभागाचे ज्ञान, स्थानिक लोकांचे समर्थन आणि एक जिद्द: “जमीन गमावली तरी चालेल, स्वाभिमान नाही.” डोंगरातील बोगदे, जंगलातील लपवलेल्या मार्ग आणि छोट्या मोबाइल तुकड्यांच्या मदतीने त्यांनी गुरिल्ला युद्ध सुरू केले. रात्री अचानक हल्ले, दिवसाढवळ्या अदृश्य होणे हे त्यांचे तंत्र होते. त्यांनी इस्त्रा-मेरीकाच्या महागड्या ड्रोनना साध्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंग उपकरणांनी गोंधळात टाकले. काही ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःचे नेटवर्क तयार करून शत्रूच्या हालचालींची माहिती सैन्याला दिली. जगभरातील लोकांना आश्चर्य वाटू लागले. तंत्रज्ञानाने भरलेली मोठी सैन्ये एका छोट्या देशासमोर अडकली होती. महिने गेले. युद्ध लांबत गेले. इस्त्रा आणि मेरीकाच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येऊ लागला. प्रत्येक दिवसाच्या युद्धखर्चाने त्यांच्या लोकांमध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले “इतक्या छोट्या देशासाठी आपण इतके का लढतो आहोत?” राण मात्र अजूनही उभा होता. शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली: युद्ध केवळ मशीन जिंकत नाहीत. मानवाची इच्छाशक्ती, जमीनाशी असलेले नाते आणि स्वातंत्र्याची भूक हे कधी कधी अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही थांबवू शकतात. आणि म्हणूनच इतिहासात त्या संघर्षाला नंतर एक नाव दिले गेले “द जिद्द ऑफ राण”. 

राण-इस्त्रा-मेरीका युद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याचे परिणाम संपूर्ण जगावर दिसू लागले. ऊर्जा पुरवठा खंडित झाला, व्यापारमार्ग विस्कळीत झाले आणि जागतिक अर्थव्यवस्था डगमगली. पण या सगळ्यात सर्वात जास्त उलथापालथ झाली ती भार देशात. भार हा मोठा, लोकसंख्येने प्रचंड आणि विविधतेने भरलेला देश होता. पण युद्धकाळात त्याची व्यवस्था ढासळू लागली. इंधनटंचाई इतकी वाढली की शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर दोन-दोन दिवस रांगा लागत. अन्नधान्याच्या गोदामांवर ताबा मिळवण्यासाठी काही ठिकाणी लोकांनी दरोडे टाकले. बेरोजगारी वाढली आणि कारखाने बंद पडू लागले. 

या काळात सत्तेत होते दाम सरकार. त्या पक्षाची एक विचित्र परंपरा होती.जो कोणी प्रधानसेवक असे, त्याच्याच नावाने सरकार ओळखले जाई. त्यामुळे लोक सरकारपेक्षा व्यक्तीकडेच जास्त पाहत. पण परिस्थिती आणखी बिघडली जेव्हा प्रधानसेवकांचे नाव अचानक “पिस्टन कागदांमध्ये” समोर आले. त्या गुप्त कागदपत्रांमध्ये जगभरातील काही नेते आणि उद्योगपतींच्या आर्थिक व्यवहारांबद्दल गंभीर आरोप होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आणि भारची प्रतिमा डळमळू लागली. देशात आधीच अस्वस्थता होती. लोकांच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. “युद्धामुळे त्रास आहे की व्यवस्थेतील चुका?” “देश चालतोय का फक्त घोषणांनी?” 

दाम पक्षाचे सर्वेसर्वा दाम मात्र राजकारणाचे जुन्या पद्धतीचे पण चतुर खेळाडू होते. त्यांना माहीत होते की संकटाच्या वेळी लोकांचे लक्ष वळवणे, भावना पेटवणे आणि सामूहिक कृती निर्माण करणे ही एक राजकीय रणनीती असते. म्हणूनच त्यांनी काही प्रतीकात्मक उपक्रम जाहीर केले. पहिला उपक्रम होता २२ मार्च ३०२६. त्या दिवशी संध्याकाळी ठरावीक वेळी लोकांनी घराच्या बाल्कनीत उभे राहून टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात असे आवाहन करण्यात आले. अधिकृत स्पष्टीकरण असे दिले गेले की संकटकाळात काम करणाऱ्या “नेते, राज्यपाल, पक्षप्रमुख, बुथप्रमुख आणि मातृसंस्था ‘राजा स्वयंभक्त संत’ (रास्वसं)” यांचे आभार मानायचे आहेत. 

सरकारी माध्यमांनी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवला. दूरचित्रवाणीवर सतत संदेश चालू होते. “एकता दाखवा.” “राष्ट्रासाठी आवाज करा.” “कृतज्ञता व्यक्त करा.” काही शहरांमध्ये लोकांनी खरोखर उत्साहाने थाळ्या वाजवल्या. काही ठिकाणी मात्र लोकांनी केवळ शांतपणे पाहिले. काहींनी तर उपहासाने रिकाम्या भांड्यांवर चमचे आपटले.जणू अन्नटंचाईचीच आठवण करून देत. पण दाम इथेच थांबले नाहीत. दुसरा उपक्रम जाहीर झाला ५ एप्रिल ३०२६ साठी. रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी सर्वांनी ८ मिनिटांसाठी दिवे बंद करून मेणबत्त्या, दिवे किंवा मोबाइल फ्लॅश लावावेत असे सांगितले गेले. त्यामागे अधिकृत कारण दिले गेले - युद्ध आणि टंचाईच्या काळात लोकांना मानसिक आधार देणे आणि “अंधारावर प्रकाशाचा विजय” दाखवणे. त्या रात्री भार देशातील अनेक शहरांमध्ये विचित्र दृश्य दिसले. उंच इमारतींच्या खिडक्यांतून लुकलुकणारे छोटे दिवे दिसत होते. काही ठिकाणी लोकांनी छपरांवर येऊन दिवे लावले, तर काही भाग पूर्ण अंधारातच राहिले. जगातील माध्यमांनी हे दृश्य दाखवले. “संकटात सापडलेला देश, पण प्रतीकात्मक एकता दाखवण्याचा प्रयत्न.” 

पण जमिनीवरची वास्तविकता वेगळीच होती. दिवसाढवळ्या रेशन दुकानांवर भांडणे होत होती. काही औद्योगिक शहरांत कारखाने बंद पडल्याने हजारो कामगार गावाकडे परतत होते. ग्रामीण भागात अन्नधान्य लपवून ठेवण्याच्या अफवा पसरत होत्या. शहरांमध्ये रात्री दरोड्यांचे प्रमाण वाढले. 

लोकांच्या मनात दोन भावना एकाच वेळी वाढत होत्या. एकीकडे थकवा आणि असुरक्षितता, आणि दुसरीकडे शांतपणे उगवणारा प्रश्न: “प्रतीकांनी देश वाचतो का?” इतिहासकार नंतर म्हणाले की त्या काळात भार देशात दोन वेगवेगळे वास्तव एकाच वेळी चालू होते. एक प्रकाश आणि घोषणांचे, आणि दुसरे टंचाई आणि अस्वस्थतेचे. आणि त्या दोन वास्तवांच्या मध्येच पुढील मोठ्या राजकीय वादळाची बीजे शांतपणे रुजत होती.

दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे

 दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| 

किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| 

कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| 

त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||

ब्लॅंकेट काढ, दुलई काढ

ती: खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? 

तो: ब्लॅंकेट काढ. 

ती: पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. 

तो: मग दुलई काढ. 

दुलई फार हलकी आहे वजनाला. 

मग ब्लॅकेट काढ. 

ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? 

मग दुलई काढ. 

दुलई थोडी आपरी आहे. 

मग ब्लॅंकेट काढ. 

ब्लॅंकेट अंगाला टोचते. 

मग दुलई काढ. 

दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. 

मग ब्लॅंकेट काढ. 

ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. 

मग दुलई काढ. 

जाऊद्या, आपली गोधडीच बरी आहे.

रानफुले

असाच भटकत रानात असता
रानफुले समोर येती

नव्हता कसला गंध तयांना
रंगही नव्हते भरजरी 
 
विविध परी तयांत होती 
नक्षी बारीक नाजूक सुंदर 
 
कोमल पिवळे गेंद 
उन्हात चमके वार्यावरती 
 

वेड लागले मलाच तेथे 
दृष्य मनोरम खरोखर ते 
 
डोंगर उतार पठारावरती 
फुले पाहता लागली समाधी 
 
घोस तयांचे लेऊन घ्यावे 
वाटले तक्षणी अंगावरती 
 
एकरूप व्हावे, तेथेच रमावे 
परत न फिरावे घराप्रती 
 
बघतो जेव्हा अचानक 
रानफुले समोरी येती 
 
- पाभे (03/10/24) 
(काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

 अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील? आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका. 

लेक लाडकी मोठ्या घरची होणार सुन मी अंबाणीची 

मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला अनंतरावांसारखा जोडीदार भेटला 

लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड 

स्वप्नातला राजकूमार पाहीला होता सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.

भाकरीचे पीठ

कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.

व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला सांगून आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. तान्याने त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.

कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले.

बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.

- पाभे

बग आली माझ्या कोडा

धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा

किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?

डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे

टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी
क्लायंटाला पटव भारी

एकच विनंती असे तुझीया ठाई
मी केवळ आयटी हमाल भार वाही

सुखरूप माझी असाईनमेंट पार कर
गो लाईव्ह जावूदे जोडतो दोन्ही कर

आता उद्धरण्या केवळ तूच येई
पाषाणाची चुकली नाव पार नेई 

- पाभे २६.०३.२०२४