Thursday, September 1, 2011

काय गुण सांगू माझ्या सालीचे

काय गुण सांगू माझ्या सालीचे

माझ्या सालीचे काय गुण सांगू माझ्या सालीचे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||धृ||

ती घरात येते तर एकदम जसे चक्रीवादळ येते
भाऊजी भाऊजी म्हणत ती माझ्या मागे फिरत असते
नटते थटते लाजत मुरडते
मी जरा बोललो तर लाजून आखडते

भरल्या घरात शोभतात का तिला हे असले धंदे?
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||१||

एकदा मी ऑफीसातून घरी लवकर गेलो
ती एकटीच घरी असल्याने चिंतेत पडलो
तेव्हढ्यात तिने विचारले भाऊजी इकडे जरा येणार का?
कॉलेजच्या नाटकातला प्रेमाचा सीन समजून देणार का?

तुम्हीच सांगा ती नाकाने सोलत असते का कांदे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||२||

खर्चाच्या बाबतीत तिचा हात कोणी नाही धरणार
माझा खिसा खाली करण्यात तिचा असतो हातभार
लाडीगोडीनं ती नेहमी हॉटेलात जायचे म्हणणार
सिनेमा पाहण्यात तर ती पहिला नंबर घेणार

बायकोला म्हणते "मला वाढदिवसाला पैठणी घेवून दे"
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||३||

कुणालातरी ती प्रेमपत्र लिहीते
मायन्यात मात्र प्रिय मलाच म्हणते
बायकोसमोरच हे सारे घडते
म्हणूनच माझ्या संसाराची काळजी वाटते

विचारल्यावर 'त्याचे' नाव सच्याच आहे हे ती सांगे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/०९/२०११

1 comment:

Vishnu Gopal Vader said...

मी कर्नातकतला असून आमच्याकडॆ या लॊकांना `हॆळवी'असॆ म्हणतात. आपली माहिती अत्यंत उपयुक्त असून त्याम्च्या चॊपदीतील एका पानाचॆ दर्शन घदविल्याबद्दल धन्यवाद!!