(खुप दिवसांपासून माझे वरिष्ठ संपादक मला सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत घेण्यास सांगत होते. गेल्या पंधरवड्यात एके दिवशी तिच्या सेक्रेटरी आहूजाशी फोनाफोनी करून तिची वेळ ठरवून घेतली. गेल्या आठवड्यात गोरेगावात फिल्मीस्तानमध्ये तिच्या आगामी पिच्चर 'तेरी आंखे काली काली - The Black End' याची शुटींग चालू होती. आम्हाला तिने तेथेच बोलावले. गेटवर आमचे नाव सांगीतले. स्टूडीओत अजून इतर चार पिच्चरचे शुटींग असल्याने बर्यापैकी गर्दी होती. आम्हास आतमध्ये सोडण्यात आले. स्पॉटवर गेलो तर करूणा कर्पूर अन वहिद कर्पूर यांच्या 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्याचे टेक चालू होते. एका कडव्याचे शुटींग झाल्यावर करूणाजी कपडे बदलायला मेकअप व्हॅन मध्ये आल्या तेव्हा त्यांच्याशी आम्ही बातचीत केली.)
मी: नमस्कार करूणाजी!
करूणा: नमस्ते.
मी: आठवते का? आपण 'जब वी हेट' च्या सेटवर मेटलो- आपलं- भेटलो होतो?
करूणाजी: अं...तशी मी फार विसराळू आहे. जर्दाळूही मी काजू समजून खाते कधी कधी. मग माझी आईच डायरीत पाहून सांगते की 'अगं निट चाव. आज तुला जर्दाळू दिलेत मुखशुद्धीसाठी' म्हणून. अं..... आता आठवलं... तुम्ही दै. रातकली मधून आलात ना? सेक्रेटरी आहूजा सांगत होता आज एक इंटरव्ह्यू आहे एका प्रेसवाल्याशी म्हणून.
मी: नाही हो करूणाजी. मी पा. भे. दगडफोडे 'रंगत आणि रंग' कडून आलोय.
करूणाजी: ओह सॉरी. मी विसराळू आहे सांगितलं ना! अस्सं होतं कधी कधी.
मी: काही हरकत नाही. अहो मी म्हणजे काय तुम्ही आहात काय सगळ्या लोकांनी नजरेत ठेवायला. मुलाखत सुरू करायची?
करूणाजी: ओ..येस...ऑफ कोर्स... माझ्या पुढच्या टेकमधला ड्रेसही अजून टाईट करायचा आहे. टेलरकडेच आहे तो. तोपर्यंत होवून जाईल आपले बोलणे.
मी: अच्छा. मला सांगा- 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्यात असे काय आहे वेगळे?
करूणाजी: 'तेरी आंखे काली काली - The Black End' या पिक्चरमध्ये वहिद अन मी शाळेपासून एकमेकांचे मित्र असतो. तो मला दहावीत असतांना मागणी घालतो फ्रेंडशीपची. त्यावेळी तो हिरेकी अंगूठी मला पहनवतो. अन मग आम्ही 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' हे गाणं म्हणतो.
मी: अरे वा. शाळेत असतांनाच तुम्हाला हिरेकी अंगुठी मिळते तर.
करूणाजी: हो. यापुढे तर गाणं झाल्यावर आम्ही दोघं उटीला जातो. शालेय सहलीला. मजा करतो तेथे. एकुणच शाळा अन कॉलेजजिवनावर हा पिक्चर आहे.
मी: तुम्ही एका हॉलीवूड पिक्चरमध्येही काम करताय म्हणे?
करूणाजी: हो. तो एक नायजेरीय ड्रगस्मगलींवरचा पिक्चर आहे. थोडा सस्पेंस आहे. मी तेथील विमानतळावरची पोलीस ऑफिसर आहे. अन एका नायजेरीयन ड्रगसप्लाय टोळीचा मी पर्दाफाश करते असे कथानक आहे. बघाच तुम्ही. माझी भुमीका छोटीशीच आहे. मी टोळीतल्या एका सदस्याची कपडे काढून अंगझडती घेते अशी हटके भुमीका आहे.
मी: तुम्ही काही अॅडही करत आहात सध्या?
करूणाजी: मध्यंतरी मी बंद केले होते अॅड करणे. माझ्या हातात तेव्हा एकावेळी ८ पिक्चर होते. आता दोन पिक्चर आहेत मोठ्या बॅनरचे. वेळ नाही मिळत म्हणून अॅड न करणे चांगले दिसत नाही. मी एका शँपूची अन एका टुथब्रशची अॅड करते आहे.
मी: तुमची अॅड 'घरमेंही कपडे सिलाओ' या टॅगलाईनची शिलाईमशीनची अॅड खुपच गाजते आहे.
करूणाजी: खरे आहे. त्याची तर खुपच गंमत झाली. त्या शिलाईमशीनच्या अॅडच्यावेळी मला कपडेच नव्हते. म्हणजे तयार नव्हते. मग मीच शुटींगच्या वेळचे शिलाईमशीन वापरून माझ्या स्कर्टचा मॅक्रो स्कर्ट करून घेतला. म्हणजे स्कर्टवर टिपा टेलरनेच टाकल्या पण आयडीया माझीच होती.
मी: वा वा. छानच. म्हणजे तुम्ही ड्रेस डिझायनरपण झाल्यात तर.
करूणाजी: गंमतच आहे ती सगळी.
मी: तुम्ही एका पिक्चरसाठी वजनही वाढवता आहेत म्हणे?
करूणाजी: अहो, राज श्रीचे एक पिक्चर येते आहे- 'मेरे साथ सनम है - The True Love'. त्यात मी डबल रोल करते आहे. त्यात जुळ्या बहीणी दाखवल्या आहोत. एका रोलसाठी वजन कमी तर एकासाठी वजन जास्त अशी रिक्वायर्मेंट होती. वजन कमी असलेल्या बहीणीचं शुटींग संपलेले आहे. आता मी म्हणूनच वजन वाढवते आहे. त्यात मला माझे वजन ५० किलो करायचे आहे. कमी वजन असलेल्या बहिणीसाठी माझे एकुण वजन मी ३० किलो केले होते.
मी: त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत असणार ना?
करूणाजी: हो तर. कमी वजनासाठी मी दोन दिवसांत १ चपाती खायचे. थोडा भात सकाळी. रात्री फक्त एक सफरचंद खायचे. माझी आई तर म्हणायची की, 'अग बाई दिड सफरचंद तरी खा'. त्या वेळी मी रोज दोन तास सकाळी व दोन तास सायंकाळी अॅरोबिक्स करायचे, सायकलींग करायचे.
आता वजन वाढवण्यासाठी मी जास्त खाते. रोज सकाळी एक चपाती व सायंकाळी थोडा भात हे माझे जेवण आहे.
मी: तुमची एखादी शुटींगमधली कडू आठवण सांगा ना.
करूणाजी: एकदा आम्ही नॉर्वेला शुटींग करत होतो. अचानक बर्फ पडू लागले. मग मी अन वहिद दोघेच एका हॉटेलमध्ये एका रुममध्ये राहीलो. माझ्या रूममध्ये कोणीतरी असण्याचा पहीलाच प्रसंग होता. हॉटेलमध्ये खायलाही काहीच नव्हते. मलातर चिकन अन सुप अन चायनीज कॉन्टींनेंटल व ईटालीयनच खावे लागले. अन एकच बेड शेअर करावा लागला. वहिद होता म्हणून मला खुप चांगले वाटले. तो खुपच जोक करतो. एकदम मजाकीया स्वभाव आहे त्याचा. तो नसता तर काय झाले असते असे वाटून मला रडू येते.
मी: तुम्हाला मुंबईत रहायला आवडते का? तुम्ही सध्या राहता कोठे?
करूणाजी: मुंबईत रहायला खुपच आवडते. पाली हिलवर माझा ५००० स्क्वेअरचा ब्लॉक घेतला आहे
नविन. तसा छोटाच आहे. पण आवडतो.
मी: तुमची आवडती कार कोणती?
करूणाजी: बिएम्डब्लू- नॅनो ही माझी आवडती कार आहे. मला वेगात पळणार्या गाड्या आवडतात.
मी: तुमची आवडती डीश कोणती?
करूणाजी: मला फ्राँझ खुप म्हणजे खुपच आवडतात.
मी: तुमचा ड्रेसचा आवडता रंग कोणता?
करूणाजी: मला लाल रंगाचा ड्रेस आवडतो.
मी: शुटींगमधली अविस्मरणीय आठवण सांगा ना.
करूणाजी: मागे एका पिक्चरमध्ये मी मेकअप न करता शुटींग केले होते.सतत एक तास, तीन मिनीटे मी मेकअप विना होते. तसेच एका पिक्चरमध्ये मी पुर्ण जेवण करण्याचा सीन खराखूरा केला होता. डमी न वापरता मी जेवणाची पुर्ण थाळी संपवली होती. तसे मी कधीच १ चपाती खात नाही. पण त्यावेळी मात्र मी पुर्ण २ चपात्या अन थोडा भात संपवला होता.
मी: तुमचा देवावर विश्वास आहे का?
करूणाजी: ऑफ कोर्स आहे. तसे मी शिवजींना मानते. झालंच तर पार्वतीदेवींनाही पुजते.
(तेवढ्यात स्पॉट बॉय शॉट रेडी आहे हे सांगायला आला)
मी: जाता जाता तुम्ही आमच्या वाचकांना काय सांगाल?
करूणाजी: मी काय सांगणार? अहो माझे पिक्चर बघा हेच की! तरीही सांगते की कुल वागा.
मी: एक विनंती करतो. दोन एक फोटो मिळाले तर घेवू का?
करूणाजी: ओह! एवढेच ना? घ्या की.
(मी मग तिनचार फोटो घेतो.)
मी: चला पुन्हा भेटू या! नमस्ते.
करूणाजी: नमस्ते!
करूणाजींची आवडः
जेवणात: ग्रीन पीज सुप
आवडता प्राणी: कुत्रा
आवडता पक्षी: मोर
आवडते शहरः दिल्ली

No comments:
Post a Comment