काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)
फुलपाकळ्या कुस्कूरूनी टाकल्या तलावी या पसरूनी
काठावरती तुम्ही उभे! पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा
दिवस नाही अन रातही नाही सुर्यफुल हे उमलू पाही
सुगंधीत या पाण्यामध्ये वत्रांकित पहूडले मी एकटी
धुकाळ या अशा पहाटे मोहरली मज काया ||१||
तरी तुम्ही काठावरती उभे? पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा
चुंबूनीया मी माझाच खांदा, केला इशारा धावत याया
पाण्याविण तडफे मीन, तशीच प्रेमाविण आहे मी नं?
जळ न भासे आता हे जाळ की मजला ||२||
तरी तुम्ही काठावरती उभे? पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
१६/०३/२०१०
गुढीपाडवा
(बैठकीची लावणी ही खड्या लावणीपेक्षा वेगळी असते. काही जणांना ती शास्त्रीय संगीत अन लोकसंगीत याच्या मधली वाटते. ज्या सामान्य जनांना शास्त्रीय संगीत उमगत नाही पण समजते अशा नागर जनांसाठी बैठकीची लावणी योग्य वाटते. म्हणूनच बैठकीची लावणी घोळवून घोळवून म्हटली जाते/ जावी.)
पाभे/दफो.
1 comment:
वाव्वा ! क्या बात है..!!
आवडली लावणी आणि ब्लॉगही.
http://gangadharmute.wordpress.com
Post a Comment