Monday, March 29, 2010

रेडिओ

रेडिओ


लहाणपणी मला पडायचा एक प्रश्न
असतील का रेडिओमधील माणसं सुक्ष्म?

असतील ही माणसे आपल्यापेक्षा वेगळी
एकत्र बसून वाजवतात वाद्ये सगळी

एकतर रेडिओचा आकार छोटा
गायक, वादक, तबला, पेटी, वाद्ये इतर पसारा केवढा मोठा!

खासच असतील ही माणसे एकजात
तरीही प्रश्न पडे कशी वाजवतात गाणी एकसाथ?

एका गाण्यासाठी लता मंगेशकर येते
तिचे गाणे म्हणून ती निघून जाते

नंतरच्या गाण्यासाठी किशोर कुमार येतो
त्याचेही गाणे म्हणून तो निघून जातो

निश्चितच आहे सगळे वेगळे
त्याशिवाय का सुरळीत चाले सगळे?

हे सगळे प्रश्न मी विचारले माझ्या काकांना
ते म्हटले, "तू नाच कर, तू पण दिसशील सगळ्यांना"

त्यानंतर एकदा दादाला रेडिओत झुरळ दिसले
नुसते फिरे ते इकडून तिकडे, तबकडीमध्ये ते फसले!

दादा म्हणाला, "सच्या चल, रेडिओ उघडू,
झुरळांबरोबर तुझी ती माणसेही बाहेर काढू"

रेडिओ उघडून दादाने केला तो साफसुफ
मला तर तसे काहीच दिसले नाही सगळेच सारे ओम फुस

दादा म्हणाला,"रेडिओत का कधी माणसे असतात वेड्या!
तू उद्योगी लहान म्हणून मोठी माणसे सोडतात पुड्या

अरे रेडिओ म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट. तुला आता नाही कळणार;
कपॅसिटर्स, रेझिस्टर्स, इंडक्टर्स, आयसीज, स्पिकर्स अन वायर्स
आताच बघून ठेव, पुढे अभ्यासात उपयोगी पडणार"

कालच लहान भाच्याने रेडिओ लावला त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर
त्याच्या गॅदरिंगचे फोटो अन व्हिडिओ क्लिप्सही दाखवल्या स्क्रिनवर

मी मनात म्हटले आजची पिढी खुप पुढे गेली
पण आमच्यावेळच्या रेडिओची मजा तिला नाही कधी आली.


- सचिन बोरसे
२८/०३/२०१०

No comments: