Wednesday, March 17, 2010

चल उसात दंगा करू

चल उसात दंगा करू

मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला:
(पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.)


हिरो:

पिक आलं वयात आता
नको उशीर तू ग करू
अग पारू...
चल उसात दंगा करू



हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने
सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?



हिरवीन:

गाव बोलंना काहीबाही पन लगीन आपलं र्‍हायलंय ठरू
लाजायची येळ गेली अन मी फिकीर कशाची आता करू


हिरो:

आसंच आसलं तर मग
अग पारू...
चल उसात दंगा करू


हिरो:

पाटपान्यात भिजलेत पाय लागल्यात मासोळ्या दिसू
हात लागता हाताला मग डाळींबी दाण्यांना आलं हसू



हिरवीन:

मी तर मैना लाडाची रे तुच माझा राघू
तरीबी सांगते नका उगा कौतीक करू



हिरो:

आरं..र्रर्रर्र....
अग पारू...
चल उसात दंगा करू

No comments: