Wednesday, March 17, 2010

काय करावे कळेना

काय करावे कळेना



काय करावे कळेना मजला
आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु ||

साडीवरती फुलली फुले, रंग तयांचा नारंगी
तसलीच कुंचूकी लांब हाती, शोभतोय अंगी
निर्‍या पायघोळ एकसरी, नेसण्याची रीत न्यारी
पाहूण जणू वाटते तु सुरी की ग दुधारी

ह्रूदय माझे तुझ्याकडे तरी
जिवंत मी कसा प्रश्न मजला || १ ||
आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु ||



चाफेकळी नाक तुझे भुवयांना वक्र बाक
काळे नयन पाणीदार पापण्यांची उघडझाप
मादक ओठ गुलाबी शब्दांचेच मदनबाण
चोरटी तू पाहू नको, मनातले सांगून टाक

मोत्यांची कांकणे ल्यालीस हाती
सुखावती नजरेला || २ ||
आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)

No comments: