लेखन व लेखकाचे बाह्यरुप
हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात.
असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?
येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.
माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.
अवांतर : (आज हा लेख लिहून मिपावरच्या माझ्या लेखांची शंभरी भरली आहे. शंभरी गाठल्याबद्दल मी माझेच अभिनंदन करतो व तुम्ही मला सहन केले त्याबद्दल तुम्हाला आधीच धन्यवाद देतो. माझ्या लेखनाने तुम्हाला थोडाजरी आनंद मिळाला असेल तर मी धन्य आहे. )
No comments:
Post a Comment