Thursday, April 9, 2009

मि.पा. ला जालिंदर जलालाबादींच्या विरोधकांचा विळखा...

गेले आठ दिवस मी मि.पा. चे संकेतस्थळ पाहतोय. नवीन सदस्य या स्तंभात सतत तेचतेच पाच नविन सदस्यांचीच नावे दिसत आहेत. (GAURIBHADE, असुगो, अल्पना, सचिन घुले, मंजुश्री अशोक बनकर)
त्यामुळे मि.पा. च्या कार्यप्रणाली मध्ये काहीतरी बदल झालेला दिसतोय. नाहितर आठ दिवसात एकही नविन सदस्य नोंदणी करु शकत नाही असे होउ शकत नाही. यामागे विद्रोही साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी' यांचे विरोधक सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या मंडळांचा हात दिसतोय.
यामागे जालिंदर जलालाबादी यांचा नुसता वैयक्तीक द्वेश नसुन त्यांच्या जन्मस्थानातील मराठीतले सगळी संस्थळे व त्यांचा विषेश उल्लेख असणारे मिसळपाव.कॉम हे संस्थळ बळजबरीने अधिग्रहित करण्याचा सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या मंडळांचा कुटिल डाव आहे.
तसा जालिंदर जलालाबादी या नावात व आडनावातच आंतरजाळाचा संशय येतो. ( (कंस सुरुवात) बघा: जालिंदर शब्दाची उत्पत्ती: जालिंदर हा शब्द जाळिंद्र असा आहे. (जसे जितेंद्र, महेंद्र, योगेंद्र इ.) उत्तरेतील पंजाब राज्यातील लोकांना (काही लोक यांना सरदारजी म्हणतात. (हा काही विनोद नाही.)) जोड शब्द जोर लावुन उच्चार करता येत नाही. या लोकांत उत्तर प्रदेस (खरा उच्चार प्रदेश) व बिहार या राज्यांतील लोकांचादेखील समावेश होतो. (राज ठाकरे यांचा विजय असो.) असो. (अजुन कंस पुर्ण झाला नाही.) म्हणुन जाळिंद्र ---> जाळिंदर. आणि हिंदीत 'ळ ' हे अक्षर नाही. (हिंदी भाषकांना मराठीचे वावडे आहे या राज ठाकरेंच्या विधानाला पुष्टी मिळते. ) (राज ठाकरे यांचा विजय असो.) (आता बास. नाहितर कानाखाली जाळ (बघा पुन्हा जाळ शब्द आला ) निघेल. असो. ) तर ळ चा उच्चार हिंदीत 'ल ' होतो. म्हणुन जाळिंद्र ---> जाळिंदर ---> जालिंदर. (कंस पुर्ण) )
तसेच जालिंदरजी चे पुर्वज अफ़गाणिस्तानचे. पुर्वी अफ़गाणिस्तान भारतातच होता. नंतर एवढा मोठा देश काय करायचा म्हणुन तो आपण वेगळा केला. (आपले सरकारच म्हणते: छोटे कुटूंब, सुखी कुटूंब) आताच्या पंजाब राज्याच्या (भारताच्या व पाक च्या. ( पाक आधी भारतातच होता.)) जवळ अफ़गाणिस्तान आहे. भारताच्या पंजाब राज्यात जालंधर गाव आहे. म्हणुनच जालिंदरजी चे पुर्वज अफ़गाणिस्तानचे नसुन जालंधर चे असावे असा संशय घेता येतो. (जाळधर ----> जालधर ---> जालंधर --->जालिंदर )
जी शब्द उत्पत्ती जालिंदरची तशीच जलालाबादी या शब्दाची. जालालाबाद हे पुर्व अफ़गाणिस्तानमधील शहर. (पहा: संदर्भ) (जळाळाबाद --->जलालाबाद (संदर्भः अफ़गाणिस्तान च्या सध्याच्या बातम्या. तेथे कायम दंगे धोपे होतात. त्यात जाळपोळ (बघा पुन्हा जाळ शब्द आला) होते.))
असो.
सबब विद्रोही साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी' यांचे विरोधक सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या साहित्तीक मंडळांनी आधुनीक आय. टी. तल्या लोकांना हाताशी धरुन मराठी जाळावरील (बघा पुन्हा जाळ शब्द आला) संस्थळे हॅक करण्याचा घाट घातलेला दिसतोय. यात मि.पा. विरुद्ध असलेले लोकही असु शकतात. (हा आपला खाजगी संशय)
तरी मराठी संस्थळचालक- मालक (रिक्षा चालक-मालक च्या चालीवर बोलावे. ) याचा विचार करुन काहीतरी सुरक्षा उपाययोजना करतील अशी आशा आहे. आम्ही तसे सावधगिरिसाठी तात्या, अदितीतै, निलकांत, राजे यांना व्य. नी. केला आहे.
आपलेही मराठी संस्थळ असेल तर काळजी घ्या.

No comments: