Saturday, November 28, 2026

कोळीगीत: आई एकवीरा

कोळीगीत: आई एकवीरा

आई एकवीरा हाय माजी पावन मोठी
तिच्या पुजेला आनली साडी चोली          ||ध्रु||

आम्हा कोल्यांची देवी ही नवसाची
वाट अवघड गो हिच्या मंदीराची
डोंगरावर जाऊन माय बसली
तिच्या पुजेला आनली साडी चोली          ||१||

हळद कुंकू निरांजनाने 
ताट पुजेचे हे सजवीले
साडी चोली बांगड्या नथ कानातले
कंबरपट्टा जोडवी पैंजन पायातले
तिच्या पुजेची अशी तयारी केली
तिच्या पुजेला आनली साडी चोली           ||२||

पायऱ्या हजार हजार तिच्या मंदीराला
चढून जावाचो जावाचो तिच्या दर्शनाला
बरो वाटतोय गो वाटतोय माझ्या मनाला
नवस फेडाया निघाले आशा मला भोळीला
तिच्या पुजेला आनली साडी चोली             ||३||

 

वरील गीत चालीसह येथे ऐकता येईल.

चाल:-  कोळीगीत: आई एकवीरा

(गीतलेखन करतांना कोणत्याही कृ.बु. चा वापर केला गेला नाही)

 

- पाषाणभेद

२७/०९/२०२६

काव्यरस
कोळीगीत, भक्ति गीत 

No comments: