Tuesday, November 3, 2009

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. गेली २६ वर्षे ते सायकलीवर भटकंती करत आहेत. पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

गेल्या गणपतीत त्यांच्याशी पहिली भेट झाली होती. मी ही सायकल (कधीकधी) चालवत असतो. त्यामूळे त्यांना भेटायची उत्सूकता होती पण भेटण्याचा योग येत नव्हता. मागच्या शुक्रवारी ३१/१०/२००९ रोजी त्यांच्या घरी भेट घेतली. एक साधा सज्जन माणूस, ५ फुटाच्या आतबाहेर उंची, वयोमानानूसार केस पिकलेले, स्पष्ट आवाज असा हा माणूस. पण ज्या वयात आराम करायचा त्या वाढत्या वयात सायकलवर फिरलेला.

त्यावेळी त्यांच्याशी घरगूती गप्पा झाल्या. त्या प्रश्नोत्तर स्वरूपातील गप्पांना मुलाखतीचे रुप दिले व ते आपल्यापर्यंत पोचवले. (त्यांचे काढलेले फोटो अजून जालावर चढवलेले नाहीत. उद्यापरवा चढवेलच त्या वेळी परत हा लेख पहा.)

पाषाणभेद: नमस्कार काका.

लक्ष्मण यादव अहिरे : नमस्कार.

पाषाणभेद: तुमच्याबद्दल काही सांगा ना.

लक्ष्मण यादव अहिरे : माझे नाव लक्ष्मण यादव अहिरे. माझा जन्म नाशिकला १२/११/१९३९ साली झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती. आम्ही ४ भाऊ होतो. वडील मिलीट्रीत ड्रायव्हर होते. रहायला मल्हारखाण - अशोकस्तंभ, नाशिक येथे असतो. माझे शिक्षण ४ थी पर्यंत झालेले आहे. वयाच्या १७ वर्षी लग्न झाले. मला २ मुले व १ मुलगी आहेत.

पाषाणभेद: तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा ना.

लक्ष्मण यादव अहिरे : मी १३/१४ वयाचा होतो त्यावेळेपासुन छोटेमोठे कामे करायचो. त्यानंतर एका पिठाच्या गिरणीत जवळजवळ २५ वर्षे कामाला होतो. १९७५ साली मुंबई नाका येथे सायकलचे दुकान काढले. नुकतेच आमदार झालेले मनसे चे श्री. वसंत गिते व माझे सायकलचे दुकान शेजारी शेजारीच होते. वसंत गीते तर मला 'मामा' म्हणतात. अशोकस्तंभावरचे माझे 'अशोकस्तंभ मित्र मंडळाचे' अध्यक्ष श्री. काळे यांनी माझ्या नावाच्या अद्याक्षराच्या पुढे 'जी ' लावून त्याचे 'लयाजी' अहिरे बाबा असे केले. त्यामूळे मला सर्व जण 'लयाजी अहिरे बाबा' असेच बोलवतात.

पाषाणभेद: आता आपण तुमच्या सायकल चालवण्याबद्दल बोलू. मला सांगा तुमची पहिली 'सायकल स्वारी' कधी घडली?

लयाजी : १९८२ साली मी व एक मित्र, थोरात जो एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता, आम्ही दोघांनी सायकलवरून उजैनला जाण्याचा विचार केला. माझे सायकलचे दुकान होतेच. सायकलची आवड असल्याने 'इंधन वाचवा', 'राष्ट्रीय एकात्मता', 'शांतीचा संदेश' घेवून पहिली मोहीम आखली.

पाषाणभेद: प्रवासाची पुर्व तयारी कशी केली?

लयाजी : माझी जुनी अ‍ॅटलास सायकल होती. तिच्या मेड इन इंग्लंडच्या रिंगा एका मित्राने दिलेल्या होत्या. २२ इंचाची सायकल होती. कपडे, स्टोव्ह, जरूरीपुरता शिधा, १००० /१२०० रुपये, कंदील व सायकल रिपेरचे सामान (पान्हे, हवेचा पंप इ.) घेतले आणि निघालो.

पाषाणभेद: तुमचा मोहीमेतला दिनक्रम कसा असायचा?

लयाजी : आम्ही सकाळी दिवस उजाडला की निघायचो. कुठे १२/ १ वाजता थांबून नाश्टा-जेवण करायचो. बर्‍याचदा लोकं आम्हाला जेवण देत. दुपारी थोडं कमी जेवत असू. नंतर पुन्हा सायकल चालवणे. वाटेत काही बघण्यासारखे ठिकाण असेल तर थांबायचो. लोकं भेटली तर त्यांना 'इंधन वाचवा', 'राष्ट्रीय एकात्मता', 'शांतीचा संदेश' असे संदेश देत असू. त्यांना आमची ओळख करून देत असू. साधारणता: आम्ही ७० ते ८० किमी दिवसाला सायकल चालवत असू. ज्यावेळी सुर्य मावळायचा त्यावेळी एखाद्या गावात मुक्काम करत असू. त्यावेळी कुणी गावकरी आम्हाला भोजन वैगेरे देत असे.

पाषाणभेद: तुम्ही कोठेकोठे भ्रमण केले आहे? किंवा कुठकूठली ठिकाणे पाहीलेली आहेत?

लयाजी : नाशिक-इंदूर- उजैन-ओंकरेश्वर-खंडवा, नाशिक-महाबळेश्वर-गोवा, नाशिक-शेगाव, परळी वैजनाथ, शिरडी, अक्कलकोट, तुळजापूर, घॄष्णेश्वर, भिमाशंकर, गोवा, हुबळी, गोकर्ण, नाशिक -कन्याकूमारी, हैदराबाद, तिरूपती, श्री. शैल्यम, रामेश्वर तसेच त्रंबकेश्वर, वणी, बडोदा, सुरत, गिरणार, द्वारका, राजकोट, सोमनाथ आदी ठिकाणी मी सायकलवर भटकलेलो आहे.
तसेच मागच्या वर्षी (वय ७१) एकटा नाशिक-उजैन सायकलवर फिरून आलो आहे. थोडक्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी ९ मी सायकलवर फिरलेलो आहे. बाकीचे ३, बद्रिनाथ, काशी, वैजनाथ मी ४धाम यात्रेत बसने फिरलेलो आहे.

पाषाणभेद: प्रवासात काय काळजी घ्यायचे? काही शारिरीक त्रास झाला का?

लयाजी : मी भगवंताला मानतो. तोच बुद्धी देतो. त्यामूळे काही काळजी नव्हती. प्रवासात काही त्रास झाला नाही. अहो सायकल पंक्चरपण झालेली नव्हती कधी.
माझी जुनी सायकल तिन चार वर्षांपुर्वी चोरीला गेली. दुसरी सायकल मित्राने दिली. ती सायकलही अजुनही पंक्चर झालेली नाही. तिच्यावरच मी मागच्याच वर्षी उजैन, ओंकारेश्वरला जावून आलेलो आहे. आता बोला. पाय दुखले तर आयोडेक्स चोळायचो. बास. बाकी अजूनही मी नाशकात सायकलवरच फिरतो. प्रकृती ठणठणीत आहे.

पाषाणभेद: प्रवासातली एखादी आठवण सांगा.

लयाजी : एकदा प्रवासात दिवस मावळला व आम्ही तरीही पुढे गेलो. अंधार पडल्यावर ३०० मिटर पुढे आम्हाला शेकोटी/ जाळ दिसला. आम्ही तेथेच मुक्काम केला. सकाळी उठून पहातो तर ते स्मशान होते.

पाषाणभेद: खरे आहे. आपल्या सगळ्यांना तेथे एकदा जायचेच आहे तर भिती कसली? बाकी प्रवासात काही अपघात वैगेरे?

लयाजी : अपघात वैगेरे काही झाले नाही. फक्त एकदा जोडीदार थोरात काका रस्त्यावरच्या मोरीवरून खाली पडले होते. मी पुढे होतो. मला मागून आवाज आला. बघतो तर थोरातकाका पडलेले. नशिबाने काही लागलेले नव्हते.

पाषाणभेद: आणखी एखादी आठवण सांगा ना.

लयाजी : कोल्हापूरच्या पुढे असतांना त्यावेळी ईंदिराबाईंची हत्या झालेली होती. सगळीकडे गंभीर परिस्थीती होती. वाटेत बंदोबस्ताला असणार्‍या ईंन्पेक्टर साहेबांनी आम्हाला मागे जायला सांगीतले. मी त्यांना आम्हाला पुढे जाण्यासाठी विनंती केली. ते काही सोडेनाच. मग मी त्यांना नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग मधिल अधीकार्‍यांची नावे सांगीतली. त्यानंतर त्यांनी आम्हाला बसवून चहा पाजला. आमचा पत्ता दिला. त्यांनी आम्हाला १०० रुपये खर्चासाठी दिले. त्या १०० रुपयाचा आम्ही महादेवाला अभिषेक करून त्याची पावती त्यांना त्यांच्या पोलिस स्टेशनला पाठवली. काही वर्षंनंतर ते साहेब नाशिकला अस्थीविसर्जनासाठी आले असता आमच्या अशोकस्तंभ मंडळाने त्यांची सोय केली होती.

पाषाणभेद: तुमच्या सामाजिक कामाबद्दल काही बोला.

लयाजी : मी पडलो गरीब माणूस. तरीही आमच्या परीसरात मी एक पाणपोई १९८८ साली बांधली. आजही त्यातले पाणी गरजू लोकं घेतात. महादेवाचे मंदीर १९९९ साली बांधले.

त्यानंतर आम्ही पाणपोई व मंदिर बघीतले. गोदावरीच्या काठी असलेले मंदिर छोटेसे पण छान आहे. आजूबाजूला झाडी लावलेली आहेत. बेलफळाचे झाड आहे. बाजूलाच स्वामी समर्थांचे पण मंदिर मागच्या २ वर्षांपुर्वी बांधलेले आहे. त्या मंदिराच्या वरती असलेल्या पिंपळात गणपतीचा आकार तयार झालेला अहिरेबाबांनी दाखवला. सकाळसंध्याकाळ मंदिराची व्यवस्था, दिवा, पणती लावणे बाबाच करतात. अनेक सामाजीक कामात ते भाग घेतात. 'अशोकस्तंभ मित्र मंडळाचे' ते सक्रिय कार्यकर्त आहेत.

दर्शन घेवून परत आम्ही त्यांच्या घरी आलो.

पाषाणभेद: तुम्हाला काही व्यसन? शौक?

लयाजी : नाही. काहीच व्यसन नाही. अगदी तंबाखुचेपण नाही. शौक फक्त सायकल चालवण्याचा आहे. पुर्वी मित्रांबरोबर कधितरी बसणे व्हायचे पण आता २५/ ३० वर्षांत ते पण नाही. मांस मच्छी पण खात नाही.

पाषाणभेद: आता पुढचा कार्यक्रम कधी?

लयाजी : आता पुढच्या महिन्यात परत एखाद्या सायकल मोहिमेवर निघणार आहे.

त्यानंतर लयाजी बाबांनी मला त्यांचे मिळालेले पुरस्कार दाखवले त्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा २००९ साली मिळालेला 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार होता, अगणित प्रशस्तीपत्रके होती.
अहिरे बाबांना मी मंदिरात होणार्‍या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात भेटण्याचे आश्वासन देवून मी त्यांचा निरोप घेतला.

Wednesday, October 28, 2009

स्वप्न

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9820

स्वप्न
(चाल: एखादी शालेय कविता)
स्वप्नामध्ये आज पाहीले सुंदर खासे तळे

बदक पांढरे, हिरवी झाडे, सुंदर पाणी निळे        || ध्रू ||



      होत्या बोटी, छोटी बेटे

             महाल होता पलीकडे

      त्यावर होती, चमकत नक्षी

             स्वर्गच भासे मला गडे

गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावरती तरती कमळे        || १ ||



      निळे आभळ वरती वरती

             सुर्यकिरण हे सोनेरी झरती

      पक्षांची जाय उडत रांग

             आनंदाला येतसे भरती

होवुनी स्वार वार्‍यावरती मन माझे हे पळे        || २ ||



      मउशार त्या गवतामध्ये

             लाल गुलाबी फुले उमलली

      फुलपांखरे रंगबीरंगी,

             उडे तयांच्या अवतीभवती

बघण्या संदर देखावा हा नजर माझी वळे        || 3 ||

माकडा माकडा हुप

माकडा माकडा हुप


पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9607

माकडा माकडा हुप
तुझ्या शेंडीला पावशेर तुप

तुप जाय चाटीत
चिंचा दे पाटीत

चिंचा आहेत लांबट
तोंड झाले आंबट

आपण दोघ बागेत फिरू
मग मला दे पेरू

पेरू आहे गोड मोठा
अरे पळ पळ, आला माळीदादाचा सोटा

-पाषाणभेद

बोलत होता मोबाईलवर

बोलत होता मोबाईलवर


आरे त्या देवळात करुंन र्‍ह्यायलाय? इकडे माझ्याकडे सिग्नलवर ये. लई ट्रापीक आसतीया. काय नाय, गाडीला कपडा मारायचा आन हात पुढं करायचा, १०-२० ची नोट मिळती बघ लगेच.
- सिग्नलवरचा एक भिकारी दुसर्‍याला सांगत होता मोबाईलवर.

"हाँ, शाम को दुकानपे आता हूं, कल के भंगार का पैसा तैयार रखना", असे भंगारवाला हातगाडी चालवता चालवता बोलत होता मोबाईलवर.

आर ए मारुत्या, त्या खालच्या शिमीटाच्या गोण्या निट वरती लाव आन त्या बल्या आन फाळके निट रचून ठेव. आन कायरे भाडखाऊ, सेंट्रींग प्लेटांना लावायला ऑयल आनल नाय का रे, तुझ्यायला?
- सुदाम मुकादम बोलत होता त्याच्या मोबाईलवर.

अरे, कॉलेजमध्ये नको, त्याच्या समोरच्या आइस्क्रीमच्या शॉप मध्येच येना. तेथे वरती गर्दी पण नसते काही. चल हट, मागच्या वेळेसारखं काही करायच नाही हं, चल ठेवते, बाय!
-शिल्पा आपल्या मित्राला सांगत होती मोबाईलवर.

अरे, काय क्लिनीकमध्येच आहेस ना? मी बाफणा नावाच्या पेशंटला पाठवतो आहे तुझ्याकडे. हं, टाईप २ डायबेटीक विथ लेफ्ट व्हेंन्ट्रीक्यूलर हायपर्ट्रूफी. जरा बघून घे. हो.. हो... बिजनेसमन आहेत. अन तुझी नवीन जागा कशी आहे? माझे काय रे, सध्या सिझन चालू आहे. रविवारी बसू सगळे. चल बाय.
- डॉ. गोगटे डॉ. शहांशी बोलत होते मोबाईलवर.

भाऊराव, ३ वाजत आले, आता तरी माघार घ्या. नाय बंडखोरी आम्हीपन केली आसती हो, पन आम्ही तुमचं सगळं सांभाळून घेवू. महामंडळाच अध्यक्षपद देवू. चला आता कलेक्टर हापिसात या आन माघारी अर्जावर सह्या करा.
- पक्षाचे अधिकृत उमेदवार बंडखोर भाऊरावांना सांगत होते मोबाईलवर.

आरे गेनू, लवकर ये बाबा. २ पोती जास्त आन शिंच्या. आज लोकांनी जास्त नारळ अन फुलांच्या माळा वाहील्यात देवीला. येतांना मागच्या दाराने ये अन हो पैसे पण घेवून ये हो.
देवीचे पुजारी मंदीराबाहेरच्या गेनू दुकानदाराला सांगत होते मोबाईलवर.

ए आई, आता तू जास्त काम करत जावू नको. बाबांना घरीच रहायला सांगत जा. प्रकृतीची काळजी घेत जा. मी पैसे पाठवतोच आहे. तुझी सुनबाई मजेत आहे येथे. धर आता तुझ्या नातवाशी फोनवर बोल.
- एनआरआय आयटीतला मुलगा आपल्या भारतातल्या आईशी बोलत होता मोबाईलवर.

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9478

प्रिय ताई,

माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे. आता दिवाळीपर्यंत देवळात तो माझ्याशेजारीच बसणार आहे. ईंग्रजी शब्द मारून तो जास्त कमाई करतो. (हे हल्ली असे होते.) तर पुन्हा असो.)

आता भादवा संपला, म्हणजेच पित्तरपाटाही संपला. परत जेवणात कॉस्ट कटिंग करावी लागत आहे. मी नेहमी जाड जाड जिन्स पँन्ट घालतो. माझ्या लाईफस्टाईल मध्ये अजून काही कॉस्ट कटिंग करता येईल का असे माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राला विचारले असता त्याने कपडे धूण्यावर जास्त मेहनत न घेण्यास सांगितले. असेही मला घंद्यासाठी कपडे मळकेच घालावे लागतात. त्याचे मी बर्‍याचदा एकतो तरी पण आपला सल्ला घ्यावासा वाटला म्हणून हे पत्र लिहीत आहे.

तर जिन्स कपडे न धुतले न ईस्त्री केले तर पैसे वाचतात का? माझ्या आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राने पण असेच काहीतरी वेबसाईटीवर वाचले होते असे तो म्हणत होता. ताई, तुझा काय सल्ला आहे?

ताईचा सल्ला:
अरे दादा, तु फारच चांगला सल्ला मागितला आहेस. तुझ्या विचारण्याने अनेक लोकांचाही फायदा होईल. अरे परदेशात जिन्स शर्ट, पॅन्ट, जिन्स कपडे महीना महीना न धुण्याची व ईस्त्री न करण्याची फॅशनच आली आहे. तसेच युनायटेड नेशन्स एन्व्हारमेंट प्रोग्राम ने (United Nation Environment Program= UNEP) तर यावर एक अ‍ॅड्व्हर्टाईज पण तयार केली आहे. ती तू तुझ्या आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राबरोबर बघ. हि बघ त्याची लिंक. http://www.youtube.com/watch?v=vYprgHH7Zrw हि पण बघ. http://www.grist.org/article/un-says-dont-iron-your-jeans आणि हि पण बघ http://udtacheetah.targetgenx.com/never-wash-your-jeans/

अरे, या मुळे पाणी, विज तुझी मेहनत वाचेल. तुझ्या धंद्याला हे फार गरजेचेच आहे. त्यामूळे पर्यावरणावरचा ताण वाचेल. तू हा सल्ला तुझ्या ईतर मित्रांनापण दे, म्हणजे काहितरी समाजीक काम केल्याचे पुण्य तुझ्या पदरात पडेल.

असेच काही प्रश्न तुला पडलेले असतील तर बेधडक विचार. अरे हे वर्तमानपत्रातील "ताईचा साप्ताहिक सल्ला" हे सदर तर तुमच्यासाठीच सुरू केले ना? यात नाव पण गुप्त ठेवले जाते.

विचारशील ना पुढचा सल्ला? जरूर विचार. ( आमचे संपादक तात्या हे सदर बंद करायचा विचार करत आहे, त्यामूळे तु तर आठवड्याला काहितरी जरूर विचारत जा.)

तुझीच ताई.

माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?)

माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?)

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9436

लोकांचे एका ओळीच्या कौलांची संख्या व गुणवत्ता बघून मला पण कौलं काढायची हौस झाली. त्यामूळे मी खालील आगामी कौलं माझ्या नावे राखून ठेवत आहे. गरजू कौल लेखक खालील एक एक कौल त्यांच्या एकास एक लेखाच्या बदल्यात माझ्याकडून मागून घेवू शकतात. गरजूंनी या पत्यावर संपर्क साधावा. (आमच्या येथे पाहिजे तसे कौलं पाडून मिळतील. किंमत व्यक्तिपरत्वे/ स्थान परत्वे बदलेले. महाराष्ट्रीय रहिवाश्यांना खास सवलत. त्वरा करा.)

१) कौलाचे अनेकवचन काय? कौल च/ कौलं / कौले/ कौल्स इ.
२) तुम्हाला मिपा आवडते काय?
३) तुम्हाला मिपा संकेतस्थळ आवडते काय?
४) तुम्हाला (खायची) मिसळपाव आवडते काय?
५) तुम्हाला मिसळ आवडते काय?
६) तुम्हाला मिसळ पावासहीत आवडते काय?
७) तुम्ही श्वास घेतात तेव्हा काय करतात?
८) तुम्ही श्वास घेतात काय?
९) तुम्ही वास घेतात काय?
१०) तुम्ही घरी शर्ट वर असतात की बनीयनवर? (महिला मंडळ प्रश्न (यापुढे : ममंप्र) : साडी - गाउन )
११) तुम्ही अंघोळ करतात काय?
१२) तुम्ही रोज अंघोळ करतात काय?
१३) तुम्ही चित्रकार / गायक/ नट / नर्तक / पाककला निपूण आहात काय?
१४) तुमचा कॉम्पुटर चांगला चालतो का?
१५) तुमचा मोबाईल चांगला चालतो का?
१६) तुमचा स्वयंपाकाचा गॅस चांगला चालतो का?
१७) तुम्हाला साडी आवडते की ड्रेस? (ममंप्र)
१८) तुम्ही बसने जाता की रिक्षाने? (भारतीयांसाठी)
१९) तुम्ही वॉलमार्ट मधून गव्हाचे पिठ आणतात की दुसरीकडून आणतात? (अनिवासी भारतीयांसाठी)
२०) तुम्हाला भविष्य पहायला आवडते का? व का? (उत्सूकांसाठी)
२१) महाराष्ट्र हा शब्द कसा बनला.
२२) भारत हा शब्द कसा बनला.
२३) तुम्हाला काका / काकू म्हटलेले आवडते का?
२४) तुम्ही ट्रक चालवता काय?
२५) आपण सगळे लेख वाचतात काय?
२६) वेळ जात नाही म्हणून कौल काढावा काय?
२७) कौल काढल्यावे वेळ जातो (टाईमपास) जातो काय?
२८) वेळ जाणे म्हणजे काय?
२९) या कौलाला (प्रत्यू)त्तर द्यायचे काय?

अशाच प्रकारे मिक्स अँन्ड मॅच करून मला पाककृतीत पण पंचविशी/ पन्नाशी/ शंभरावी/ हजारावी गाठायची आहे.

डोंबारी

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9363

आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्‍याचे हे फोटो.

ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका.

जस्ट एंजॉय लाईफ अ‍ॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट.

लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट.

Dombari
डोंबारी १

Dombari2
डोंबारी २
निवीदा सुचना

साबुदाण्याच्या गोळ्यांच्या लोणच्याच्या भाकरीच्या मटणाच्या पुरणाच्या पोळीचे शिकरणासाठीच्या रेसीपीची निवीदा सुचना

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9329

"अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" त्यांच्या तुरुंगातील बांघवांसाठी खाणावळ चालवणार्‍या बचत गटातर्फे वरील नावाच्या रेसीपीसाठी खालील खाद्य पदार्थ तयार रेसीपी, दर माणशी प्रमाणानुसार (कैद्याचे अ‍ॅव्हरेज वजन: 60783489 मिलीग्राम, उंची: 0.001041 माईल्स, उमर: 14600 दिवस, १३.५२ महिने) मागवण्यात येत आहेत. हे खाद्य पदार्थ आपण आपल्या खर्चाने आम्ही सांगू त्या त्या तुरूंगात आपण दर आठवड्याला सप्लाय केले पाहीजे. आम्ही ईतर रेसीपीपण कैदी बांधवांना खायला देतो. त्या साठी लागणारे पदार्थ, कृती, प्रमाण यासाठी आपण आमच्या संपर्कात रहावे. वेळोवेळी आम्ही यासाठीचे टेंडरे याच ठिकाणी प्रसिद्ध करू. त्यासाठी आपण आमची वेबसाईट नेहमी वाचत रहा.

नियम व अटी :-

१) सर्व साहित्य ISO ९००० /९००२ प्रमाणपत्र धारण करणार्‍या उत्पादक कंपन्यांचेच असले पाहीजे असे काही नाही.
२) CMM level Certified कंपन्यांनी आवेदन पत्र सादर करू नये. त्यांचे रेट फारच महाग असल्याने व त्यात ते कटींग मागत असल्याने त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत.
३) सर्व पदार्थ पॅकबंद व ताज्या स्थितीतीलच पाहिजे.
४) वजन, मापे परिमाण याबाबर काही शंका असल्यास आपण आमच्या रेसीपी डिझाईन डिपार्टमेंटशी संपर्क साधावा.
५) आपले रेट हे सिलपॅक लिफाफ्यात, ३ लिफाफे पद्धतीत सादर केले पाहिजे.
५) छापील टेंडर किंमत रु. ४२०/- मात्र देवून मिळतील. पोस्टाद्वारे पाहिजे असल्यास रु. १००/- अधिक.
६) टेंडर उघडण्याची तारीख: ३० फेब्रूवारी
७) टेंडर उघडण्याच्या तारखेत व ठिकाणात बदल होईलच. आमच्या संपर्कात रहावे.
८) निवीदा नाकारण्याचा हक्क राखून ठेवलेला आहे.
९) चुकभुल देणेघेणे.

साहित्य:
पाव किलो साबुदाणा (उपासाचा)
१/२ किलो मटण (डॉक्टर (नाना मेड) सर्टीफाईड बोकड्याचे )
८००.८४७६३८४७३८३ ग्राम कच्चे पुरण (इतकेच मोजून मापून घ्यावे. जास्त घेवू नये. नाहीतर आपण करतोय ती कढी आंबट होते.)
०.०००५९३ टे.स्पून नावडतीचे ब्रांड मिठ
२ टे.स्पून गालावरची ब्रांड तीळ
१ तोंडाला पुरेल अशी खसखस, हसण्याची
१/४ टी.स्पून हळद पी अन हो गोरी मेक
१ टे.स्पून गरम मसाला चित्रपट
१ टे.स्पून चोरांसाठीची मिरची पूड
१/४ टी.स्पून आलंगेल्याची पेस्ट
१/४ टी.स्पून ओमशांती ब्रांड लसूण पेस्ट (दुसरा ब्रांड नको.)
अर्धी जुडी डेकोरेशनची कोथिंबीर (चायनीज)
०.००००००९८७६ चमचा डाएट तेल
१ अर्धकच्चा पिकलेला लिंबू (वजन ४२०.७३७३ मि.ग्राम चालेल.)
१२.७६५७ से.मी. x ४ सेमी व्यास केळी x १ नग / प्रती माणूस
१/२ वाटी दुध
२ पुरणाच्या पोळ्या ( ४.८३६३ सेमी त्रिज्या असणार्‍या व ४०० मायक्रॉन इतका जाड काठ नसलेल्या. सप्ल्याय झालेल्या पोळ्या व्हर्नियर कॅलीपरने मोजून घ्याव्यात, अन्यथा रिजेक्ट कराव्यात.)
२०० ग्राम लोणचे (सिंगलडेकर, (डबल=बे)डेकर, खोडकर, आदी ब्रांड चे असल्यास लोणचे असल्यास उत्तम. आधीच तयार केलेले व बरणीवर फोटो नसल्याने मट्णाचे लोणचे असल्यास अधीकच उत्तम.)
0.264172 गॅलन पाणी


कृती:

१.पी अन हो गोरी मेक हळद, नावडतीचे मीठ व अगदी थोडे पाणी घालून मट्णाचे लोणचे शिजवून घ्यावे.
२.गालावरची ब्रांड तीळ व हसण्याची ब्रांड खसखस ओले करून कोरडे होण्याइतपत भाजून घ्यावे.
३.हाताने गालावरची ब्रांड तीळ व केळी कुस्करून घ्यावे, तीळ तीळ करावा.
४. गालावरची ब्रांड तीळ व हसण्याची ब्रांड खसखस, गरम मसाला, तिखट, पी हळद, नावडतीचे मीठ, आले-लसणाची पेस्ट, भाकरी, पुरणाच्या पोळ्या,कोथिंबीर हे सर्व घालून चांगले मिक्सरमध्ये फिक्स करावे.
५.मट्णाचे मटण शिजल्यावर ते काढून घेऊन, कढईत थोडे तेल घालून थोडे थोडे मटण घालून तळून घ्यावे.
६.नंतर तळलेले मटण आणि वरील सर्व मसाला घालून त्यावर लिंबू पिळावे. वरून कोथिंबीरीने डेकोरेशन करावे.

वरील पाककृती एका कैद्यासाठी आहे.

सदर रेसीपीचे हक्क "अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" राखलेले आहेत. सदर रेसीपी पेटंट पेंडींग आहे.
----------------------------------------------------------------------------------
सदर निवीदा सुचना "अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" तयार केली गेली व मिपा तर्फे प्रकाशीत केली गेली.

चड्डीवाला आणि माकडे

चड्डीवाला आणि माकडे

पुर्वप्रसिद्धी :http://www.misalpav.com/node/9291

एक नाना नावाचा टोपी विक्रेता होता. गावातले सगळे लोक नाना टोपीवाला असे म्हणत असत.
त्याच्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर त्याच्या देशात डोक्यात टोप्या घालण्याची फॅशन जरा कमी झालेली होती व लोकं एकमेकांनाच 'टोप्या घालू' लागली होती. आधीच टोप्यांची विक्री कमी व त्यातच
आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन वेगळा धंदा काहीतरी सुरु करायचे नानाच्या मनात होते. म्हणून आपल्या नानाने विजारीच्या आतुन घालतात तसल्या वेगवेगळ्या चड्डया आणि नाड्या विकण्याचा धंदा चालु केला. आताशा सगळे लोकं त्याला "नाना चड्डा" असे म्हणत असत.

त्याच्याकडे सर्व त-हेच्या, विविध मापाच्या, वाढत्या अंगाच्या, बदलत्या घेराच्या, फिट्ट बसणा-या, मोकळ्या चाकळ्या अशा विविध चड्ड्या नाड्यांसह रास्त दरात उपलब्ध होत्या. "इच्छुकांनी या चड्यांचा लाभ घ्यावा ही इनंती!" अशी कसलेल्या दुकानदाराची भाषा तो चड्ड्या विक्री करण्यासाठी गिर्‍हाईकांशी करत असे. नाना चड्डीवाला आपला गरीब स्वभावाचा, हसतमुख, डोक्यावर गांधी टोपी घालणारा व फारच विनोदी, उमद्या व्यक्तिमत्वाचा माणुस होता. त्याचे आधी लक्ष्मी पेठेत दुकान होते पण आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन तो दुकानात एखाद्या माणसाला बसवून आपण स्वत: दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून डोक्यावर चड्ड्यांची पेटी घेवून गावोगावी "चड्ड्या घ्या हो चड्ड्या.... चड्ड्या घ्या हो चड्ड्या" असे ओरडून चाड्ड्यांची विक्री करत फिरत असे. गरीब बिचारा नाना. दिवसभर त्याला ह्या गावातून त्या गावात, उन्हातान्हात फिरावे लागत असे.

असेच एकदा तो पुणेगाव या गावातुन टाणेगावात चड्डी विक्रीसाठी जात होता. वाटेत त्याला भुक लागली. डोक्यावरची चड्ड्यांची पेटी खाली ठेवून नदीच्या काठावर आंब्याच्या झाडाखाली बसून त्याने बरोबर आणलेली चटणी भाकरी खाल्ली. पोट भरल्यावर अंमळ विश्रांतीसाठी तो पहूडला. थोड्याच वेळात त्याला गाढ झोपच लागली.

बर्‍यापैकी झोप घेतल्यावर तो उठला व बघतो तर काय त्याची चड्ड्यांची पेटी उघडी ! तो हादरला. कोणी चोर वैग्रे आला होता की काय असला विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात त्याचे लक्ष झाडावर गेले. त्याला झाडावर खुपशी माकडे दंगामस्ती करत असतांना दिसली. सगळ्या माकडांनी त्याच्या पेटीतल्या चड्ड्या घातल्या होत्या!

ईकडे नाना विचारात पडला. त्या चड्ड्या माकडांकडुन परत कशा मिळवाव्या हा विचार त्याच्या मनात आला. त्याने डोके खाजविले. त्याचे पाहून माकडांनीही त्याची नक्कल केली. नानाने एक दगड माकडांकडे भिरकावला. माकडांनीही झाडावरच्या कैर्‍या नानाकडे फेकल्या. नानाच्या डोक्यात एक कल्पना आली. नानाने आपली विजार काढली. माकडांच्या आईवडीलांनी त्यांना "टोप्या विकणारा व माकडे" ही गोष्ट सांगीतलेली होती. त्यामूळे नाना आता पुढे काय करणार याची कल्पना माकडांना आली. ती वेळ न यावी म्हणून माकडांनी घाई करून त्यांनी घातलेल्या चड्ड्या लगेच खाली टाकल्या. नाना हसला व त्याने पटापट त्या सगळ्या चड्ड्या आपल्या पेटीत टाकल्या. नंतर चतूर नानाने खाली पडलेल्या कैर्‍या पण उचलल्या व तडक टाणेगावात चालता झाला.

तात्पर्य: नानाने जुन्या गोष्टीची पुनरावृत्ती केली. तो जुनी गोष्ट विसरला नाही. माकडेही जुनी गोष्ट विसरले नाहीत पण माकडांनीही काळाचा महिमा जाणून घेवून शिकून सवरून नविन मार्ग अवलंबिला.
म्हणजेच नविन गोष्ट करा पण जुनी गोष्ट पण लक्षात ठेवा.

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

* हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ !
* ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे.
* हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत.

आधार : अर्थातच, आंतरजाळ

Sunday, September 13, 2009

पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9226

{सदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते.
(पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.)

स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.}

पहीले वंदन धरणी मातेला sssssमातेला,
नंतर वंदून मराठी मातीला..
वंदतो शिवाजीराजांना
वंदन माझे मावळ्यांना
वंदतो संयूक्त महाराष्ट्राच्या हुताम्यांना...
वंदतो आई बापाला...
वंदतो हिंदवी सैन्याला....
वंदतो झाशीच्या राणीला
वंदून थोरामोठ्यांना...
शाहीर सचिन बोरसे करतो पोवाड्याला
जी र हा जी जी जी जी जी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी sssssss
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी... स्थापूनी
केले उपकार राज ठाकरेन राज ठाकरेंनी... राज ठाकरेंनी... राज ठाकरेंनी
मरगळलेला महाराष्ट्र जावून...
घेतली उभारी मराठी मनानंss मनानं ss जीरहा जी जी जी...

{गद्य : २००० च्या दशकात अचानक जिकडेतिकडे भैया लोकांचा संचार सुरू झालेला होता...
रेल्वे तर त्यांच्या बापाचीच मालमत्ता आहे असे समजून भैये लोक वागत होते...
कारखान्यात कमी रोजंदारीवर भैया लोक भरती होत होते... अशा वेळी.....}

महाराष्ट्रावर जोरदार हल्ला झाला भैया
अन कारखान्यात बट्याबोळ झाला आपल्या रोजीचा
रेल्वे भरतीत केला चालूपणा लालूने
साथ दिली त्याला तिकडे मुलायमसिंगने
अमरसिंग आहे तो तर त्याच जातीचा
मनातले त्यांच्या हाणून पाडायचा बेत राज ठाकरेंचा

{गद्य : अशा वेळी लालू, मुलायम, अमरसिंग व ईतर उत्तर भारतीय एकत्र आले...
मुंबईत छट पुजा करायची.... उत्तर भारतीय दिवस साजरे करायचे.... असले कार्यक्रम त्यांनी राबवायला सुरूवात केली....}

मुंबई तो हमारीच माई, बोलले युपीचे भाई
काम हम यहीच करेंगे, पैसा सब गाव ले जायेंगे (अहा)
राम आयेगा यहा... तो लछमन को भी यहा लायेंगे

{गद्य : असल्या वल्गना हे भैया लोक करत असत...
येथे राहून, येथे काम करून सगळा पैसा ते युपी बिहारात नेत असत....
ते येथे संटे येत असल्यामुळे येथील पोरीबाळींवर आयाबहीणींवर त्यांची वाईट नजर असे...
अशा ह्या महाराष्ट्रावर आलेल्या वाईट वेळी महाराष्ट्राकडे लक्ष देणारे होतेच कोण?}

महाराष्ट्राचे पुढारी फाडारी
बसले होते दिल्ली दरबारी... दिल्ली दरबारी
हाजी हाजी करू चालू होती सोनीयाची चाकरी...चाकरी (अहा..)
बसले होते मुग गिळुन... बोलत होते आवो आवो महाराष्ट्र
संयूक्त महाराष्ट्रासाठीचे विसरले घेतलेले कष्ट...
असले आपले भ्रष्ट नेते नतद्रष्ट अन भैये झालेत पुष्ट...

{गद्य : आपणच लोकसभा, विधानसभेसाठी निवडुन दिलेले नेते दिल्ली, मुंबईत नुसते तोंड बंद करून बसले होते....
पवार, पाटिल, देशमूख असली सरदारे दिल्ली दरबारात मुजरे करत होते...
मराठी जनतेची चाकरी करायची सोडून ईतर संघटना, पक्ष हेही भैया लोकांची चाकरी करीत होते....
भैया लोकांनी पुरवीलेल्या पैशावर मस्ती चालत होती...
ईकडे भैयांचा लोंढा महाराष्ट्रात येतच होता.... अत्याचार वाढतच होता...}

स्थिती ओळखली राज ठाकरेंनी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापियली
एकत्र जनता मराठी आली
युपी बिहारची जनता हादरली....

{गद्य : महाराष्ट्रावर पडलेल्या संकटकाळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली.
ज्या ठिकाणी आपले पोट भरते त्या महाराष्ट्राला आपले मानणारे जर युपी बिहारातले असतील तर तेही मराठी बांधव आहेत असे उदात्त विचार मांडणार्‍या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत्रूत्व मराठी मनाचे पुरस्कर्ते राज ठाकरेंनी करावे हे महाराष्ट्राचे भाग्यच.}

महाराष्ट्रात राहणारा, राहणारा
महाराष्ट्रात जन्मणारा, जन्मणारा
मराठी बोलणारा, बोलणारा
मराठी मातीला आपलं मानणारा, मानणारा
तोच मराठी माणुस अभिप्रेत राजेंना...राजेंना

{गद्य : जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.
अशा या विचारांत काय वाईट आहे हो? जे जे युपी बिहारातल्या बांधव येथे राहून जर ते मराठी मनाचा, मराठी जनांचा, मराठी अस्मितेचा सन्मान करतात त्यांना दुखवायचे काय कारण?
आम्हालाही प्रगती करायचीय, स्वातंत्रानंतरही आपण फक्त चांगले रस्ते, पाणी ईत्यादी गोष्टींसाठीच आग्रह करत होतो.... आता ती वेळच येणार नाही... कारण....}

भौतिक, सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचे
कर्तव्य आहे आपले प्राप्त करण्याचे...
समस्यांची सोडवणूक करणे,
सर्व जाती, धर्म, पंथ, वर्गांचे...
एकत्र येवूण विकास करण्याचे....
उद्देश असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

{गद्य : विकासाआड येणारे सत्तागटांशी सर्व पातळींवर संघर्ष करणे,विकास करण्यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामे करणे, सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे,महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.}

{गद्य : भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे. }

मराठी माती अन मराठी विचार....
बाळासाहेबांसारखे रक्तात मुरले माझ्या छान.... (अहा)

महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय्य आयुष्याचे
त्यासाठीच जन्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

असे हे विकासाचे राज ठाकरी विचार...
शाहीर सचिन बोरसे मुजरा करी त्रिवार.... जी र हा जी जी जी जी जी

- शाहीर सचिन बोरसे
०३/०९/२००९
स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.

Wednesday, September 2, 2009

(भूत कॉस्टींगचे...)

पुर्वप्रसिद्धी: http://www.misalpav.com/node/9205
मला माझ्या धंद्याबद्दल बेसीक शंका विचारायची होती. ति कुठे विचारावी असा प्रश्न मला पडला होता. माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राने हा धागा दाखवला व माझा हुरूप वाढून धंद्याची लाज न बाळगता हा धागा काढला.

भादव्याच्या महिन्यात घरगुती पित्रांच्या निमीत्ताने जेवणाची सोय झाल्याने माझा जीभेचा आणि तब्येतीचा प्रश्न हे कळीचे मुद्दे निकाली निघाले आहेत. आर्थिक दृष्टीने बघता खर्च व दगदगही कमी झाली आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी! नंतर भादवा संपल्यावर कोणत्या देवळापुढे बसावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नाहितरी आजकाल लोक जेवणाच्या बाबतीत फारच कॉस्टींग बघत जेवण बनवत असून त्यांचे जेवण फार कमी उरते. त्यातच त्यांना काही लोक शिळ्या अन्नाच्याही डिश करायला सांगतात. कोणी आपल्या ऑफीसातल्या गरीब लोकांना ते शिळे अन्न देतात व त्यांचा दुवा घेवून पुण्य मिळाल्याचे समाधान मानतात. पण माझ्यासारख्या भिकार्‍याला कोणी "जेवून जा रे. पोटभर जेव, स्वयंपाक येत असेल तर उद्या स्वयंपाक करायला व जेवायलाच ये, मस्त मटण करू, नाहीतरी मला जेवण घरी बनवायचा कंटाळाच येतो." असे म्हणत नाही. असो. काय हा भिकार्‍याला लेखनाचा हव्यास. आता देवळाच्या समोर लावलेल्या फलकावर लेखन केले पाहीजे. पर्वतीच्या टेकडीवर जाणारे टेकडे लोक आहेतच तेथे. देतील दोन, आपल घास म्हणायचे होते. घासानेच पोट भरते. काय हा विपर्यास. आता अंतीम असो.)

तर आर्थिक दृष्टीने बघता खर्च व दगदगही कमी झाली आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी!) पण तो नक्की किती टक्क्याने कमी झाला हे समजण्यासाठी रोजच्या एकवेळच्या भिक मागण्याचे कॉस्टींग काढून गणित मांडून फायद्याचे (मला तर फायद्याचेच वाटते. कोणी काही म्हणो भिक मागणे फायद्याचेच असते. आहो गुंतवणूक काय लागते, सांगा तुम्ही ? काहीच नाही. काय म्हणताय, तुम्ही येताय आमच्यात? (हे काय, पुन्हा अवांतर लेखन? माझ्यासारख्या चांगल्या भिकार्‍याला भिकेचे डोहाळे लागलेत मला असे वाटते.) असो. असो. (तुम्हीच कंस सोडवा. गणितातले तज्ञ ना तुम्ही?) ) प्रत्यक्ष गणित काढायचे असे ठरवले.

कॉस्टींग हा प्रकार मला नविन असल्याने अख्खा शनिवार भिकार्‍या मारुतीच्या मंदिरात यासंदर्भात माहिती ईतर समवयस्क भिकार्‍यांबरोबर (आय टी मधून ते मंदीच्या काळात हाकलले होते) बुकलत बसलो होतो पण नक्की कल्पना येईल कॉस्टींगची असे काहीच मिळाले नाही. (अगदी मायक्रोसॉफ्ट मनी, टॅली, ईतर ओपन सोर्स पॅकेजेस, राजे नावाच्या माणसाने दिलेली बजेटींगसाठीची एक्सेल फाईल, मिपावरचा हा धागा सर्व पाहून झाले होते. (हे काय, पुन्हा अवांतर लेखन? माझ्यासारख्या चांगल्या भिकार्‍याला भिकेचे डोहाळे लागलेत मला असे वाटते.) असो. असो. (तुम्हीच कंस सोडवा. गणितातले तज्ञ ना तुम्ही?))

कोणाला याबाबत माहिती असल्यास अथवा अभ्यास असल्यास मार्गदर्शन करू शकाल का?

Toll Free No.: 1800-365-24365
माझा फोन नं: 92 -020 -2365 24 365 Extn: 365 (ईंटरनॅशनल कॉल साठी पहिले ० लावा), मोबाईल: 91365 24 365, 91365 24 365 (कधीही फोन करा. 24 x 7 x 365 days service available.) (होलसेल भिक घेतली जाईल. (जुने कपडे/ वस्तू पण चालतील.) ट्रांसपोर्ट चा खर्च पार्टीला करावा लागेल. त्यासाठी ट्रक भाड्याने मिळेल. (वरचाच फोन वापरा.) )
व्य. नि. साठी email ID: it-exiled@cut-copy-paste-jobworker.org
visit us at: cut-copy-paste-jobworker.org

Saturday, August 29, 2009

त्रंबकेश्चर फोटो

या श्रावणातील चौथ्या सोमवारी त्रंबकेश्चर ला गेलो होतो. गावात मंदिराजवळ पाऊस होता व मंदिरात कॅमेरा नेता येत नव्हता. बाहेर गर्दीचे काय फोटो काढणार? ती तर सगळीकडेच आहे.
दुपारी आम्ही गंगाद्वार या डोंगरावरील ठिकाणी गेलो होतो. तेथेही सतत पाऊस चालू होता म्हणून काही फोटो काढता आले नाही. जे काही तिन चार फोटो काढले ते खाली देत आहे.


गंगाद्वार च्या पायर्‍या चढतांना दिसणारा ब्रम्हगीरी चा पर्वत. याच पर्वतावर गोदावरी नदी उगम पावली आहे. श्रावणातील तिसर्‍या सोमवारी या पर्वताला सुमारे ३० ते ६० किमी ची फेरी मारतात. या वेळी ही मी ती मारली होती. त्या बद्दल कधीतरी लिहीनच.


डोंगरावरील जंगलसंपदा


क्रिकेट वेडा देश. क्रिकेटला वेळ, काळ, स्थळ काही लागत नाही. (किती मॅन अवर वेस्ट जातात कुणास ठाव?)


पाझर तलाव दिसतोय


त्रंबकेश्वर शहर

जय तोरणा मित्र मंडळ तोरणा नगर, सिडको, नाशिक - सार्वजनीक गणेशोत्सव २००९

सार्वजनीक गणेशोत्सव २००९

जय तोरणा मित्र मंडळ तोरणा नगर, सिडको, नाशिक
अध्यक्ष: संदिप गांगुर्डे , उपाध्यक्ष: निखील बिरारी , खजीनदार: , सरचिटणीस:



श्रींची मुर्ती


गणपती

स्वप्निल मित्र मंडळ पवन नगर, सिडको, नाशिक - सार्वजनीक गणेशोत्सव २००९

सार्वजनीक गणेशोत्सव २००९

स्वप्निल मित्र मंडळ पवन नगर, सिडको, नाशिक
संस्थापक अध्यक्ष: स्वप्निल, अध्यक्ष: स्वप्निल , उपाध्यक्ष: स्वप्निल , खजीनदार: , सरचिटणीस:



श्रींची मुर्ती


लँप शेडस् मधून तयार केलेला गणपती

जय तोरणा सांस्क्रूतीक, सामाजीक, शैक्षणीक, कला व क्रिडा संस्था, श्रीराम नगर, सिडको, - सार्वजनीक गणेशोत्सव २००९

सार्वजनीक गणेशोत्सव २००९

जय तोरणा सांस्क्रूतीक, सामाजीक, शैक्षणीक, कला व क्रिडा संस्था, श्रीराम नगर, सिडको, नाशिक
संस्थापक अध्यक्ष: मनोज (दादा) बिरार, अध्यक्ष: महेश आहेर, उपाध्यक्ष: भुषण लभडे, खजीनदार: संग्राम जाधव, सरचिटणीस: निलेश शेलार


Jay Torana mitra mandal, CIDCO, Nashik
श्रींची मुर्ती

Silver Idol of Ganesh at Torana mitra Mandal, CIDCO, Nashik
चांदीचा गणपती

Jay Toranaa Mitra Mandal, CIDCO, Nashik
जय तोरणा सांस्क्रूतीक, सामाजीक, शैक्षणीक, कला व क्रिडा संस्था, श्रीराम नगर, सिडको, नाशिक - सदस्य

जय मल्हार सांस्क्रूतीक सामाजीक मित्र मंडळ, श्रीराम नगर, सिडको, नाशिक - सार्वजनीक गणेशोत्सव २००९

सार्वजनीक गणेशोत्सव २००९

जय मल्हार सांस्क्रूतीक सामाजीक मित्र मंडळ, श्रीराम नगर, सिडको, नाशिक
संस्थापक अध्यक्ष: नितीन माळी , अध्यक्ष: हेमंत आहेर, सदस्य : राजूभाई भाटीया, सचिन बोरसे, मेहबुब इनामदार, अरूण रासकर, भालचंद्र देसले, जुनेद सय्यद, दादा देवरे, नंदू जगताप, विलास कामडी, सोनवणे (पार्थ सेल्स), राजेंद्र डहाळे, सोनू पाटिल, राजाभाऊ वाघचौरे, लोटन जाधव, मगन शेलार, भाऊसाहेब देसले, हर्षल झवर, मोनू आहिरे, सचिन पवार, विकास पाटिल, अनंत बोरसे, ज्ञानेश्चर पाटिल, योगेश पवार, दिलीप वाघ.
जय मल्हार सांस्क्रूतीक सामाजीक मित्र मंडळ, श्रीराम नगर, सिडको, नाशिक

Tukaaraam Mahaaraaj

















Tuesday, August 25, 2009

वाहन पार्श्चभाग लिखाण अर्थात बंपर स्टिकर

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/8574

आता बहूतेक जण म्हणतील की यावर बरेच धागे लिहून झाले, हा फूटकळ धागा आहे, मी आपणाला ओळखत नाही त्यामुळे (निगेटिव्ह का होईना पण) प्रतिक्रीया देणार नाही वैग्रे वैग्रे. तरी पण वाचा आणि आनंद घ्या. असो.

रत्याने जातांना वाहनांच्या पार्श्चभागी लिखाण अर्थात बंपर (तसेच) नेम प्लेट, ट्रकचे फाळके, मागील काच, मडगार्ड रबर वर अनेक (महाभागांनी) अनेक तर्‍हेचे लिखाण केलेले असते.
अजाणतेपणी आपण त्या कडे बघतो किंवा बघत नाही. काही काही लिखाण मनास भिडते तर काही वेळा मनोरंजन होते. रहदारीच्या वैतागात आपल्याला ते लिखाण नकळत सुखावून जाते.

मी खाली काही तसले बघीतलेले लिखाण टाकलेले आहे. आपल्याला वाहनांवरील जो काही तसला मजकूर आवडला असेल किंवा आपण त्याचा फोटो काढला असेल तर तो आपण येथे टाकावा जेणे करून आपण तसले लिखाण संपादीत अवस्थेत राहू शकेल.

धन्यवाद.

मी बघीतलेले वाहन ------------------ मजकूर

रिक्षा : --------------------------- Love एक खर्चा
रिक्षा : ---------------------------- O नेते
फाय व्हिलर : -----------------------घुम रही है गली गली ===== १२१६ भरके चली (१२१६ हा त्या वाळूने भरलेल्या फाय व्हिलर चा नंबर होता.)

ट्रक : ----------------------------- HORN OK PLEASE (हे नेहमीचेच. ह्यावरचा हा अ‍ॅनिमेशन पट तर धमाल आहे. An Irish-Indian collaboration, Horn OK Please is a stop motion short movie which follows a day in the life of a taxist in Bombay. Life ain't easy, but the way of karma is just around the corner.
The director and producer is Joel Simon with Vaibhav Kumaresh as director of animation. )

ट्रक मडगार्ड रबर ------------------------ TATA (हे पण नेहमीचेच)

खडी डबर चा ट्रक --------------------- पहेले खंडेराव बोलो फिर दरवाजा खोलो
एस. टी. ---------------------------- (पुढिल काचेवर --- डिझेल वाचवणे हे ड्रायव्हरच्या हातात आहे. (माझा मित्र त्यापुढे म्हणत असे की --- डिझेल वाचवणे हे ड्रायव्हरच्या हातात तर कंट्रोलरच्या पायात आहे. ))

......आणखी नंतर टाकेनच.

(प्रिय सौ. सासुबाईंस..!)

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/8459

आधार: प्राजूताईंची कविता (आणि फालतू सास-बहू टिव्ही सिरीयल्स)

(पस्तूत विडंबनात मला प्राजूताईंच्या कवितेची माझी भ्रष्ट नक्कल व त्यातील आईसारख्या (तसेच सासुबाईंसारख्यासुद्धा) व्यक्तींची टिंगल करण्याचा अजीबात हेतू नव्हता. प्रत्येक आई आदरणीय आहे, वंदनीय आहे. माझा कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही.
मी केलेले विडंबन हि फक्त कल्पना समजावी.)


माझं तुमच्यासोबत असणं..
तुमच्या (खोट्या)कौतुकात माझं बुडुन जाणं..
तुमच्या आवडीनिवडी
सांभाळण्यासाठी मी
माझ्या पार्लरच्या कामांना बाजूला ठेवणं..
संपूर्ण आयुष्यभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!!
पण... काहितरी राहून गेलंय..
माझं निवांत टिव्ही पाहणं..
एकमेकींच्याशिवाय !
केवळ अन केवळ साध बोलणं....
असं झालंच नाही हो !
(वेगवेगळे)हिंडलो, (साडीसाठी)फिरलो.. (खोटे खोटे चांगले वागणे)खेळलो..
पण..
फक्त आणि फक्त आपण दोघी
कितीवेळ एकमेकीसोबत होतो??

आता तूम्ही (धाकट्या दिराकडे) जाणार...

तुमच जाणं तसं वर्षभर लांबलं..
.... अन शेवटी
हो नाही करता करता तूम्ही गेलातही..
तूम्ही इथे आल्यावर.. एकट हिंडण्या फिरण्यासोबतच
तुमच्याशी खूप खूप भांडण करायच... ठरवलं होतं मी.
प्रत्येक वेळी वेगवेगळे हिंडलो, फिरलो..
प्रत्येक वेळी..."तूच कर ना चहा नाष्टा माझ्यासाठी.." असा हुकूम केला..
कित्तीतरी पदार्थ खाल्ले माझ्या हातचे..!!
प्रेमळ (दिखावू) भांडणही झालं..
एकमेकींशी गप्पा सुद्धा मारल्या.. ठरवल्याप्रमाणे!!!
.......... त्या पुरेश्या नव्हत्या का हो??
मन का नाही भरलं कधीच?
तुमच्या इथे असण्याची सवय .. जाईल लवकर !
घरातला प्रत्येक कोपरा... ..
मला तुमच्या वास्तव्याची जाणीव करून देतो आहे..
आणि पुन्हा पुन्हा असंच का वाटतं आहे की..
आपण दोघी मनसोक्त(?) भेटलो..
आणि मनसोक्त(?) भांडलोही..!!!

मनसोक्त(?) ची व्याख्या नक्की काय असते??

महाभयंकर सत्य

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/8401

सगळ्या जगाचा प्राण आहे असे वाटणारे ईंधन आता लवकरच संपणार. लवकरच म्हणजे किती ? अहो आपण किंवा आपली मुलं किंवा अगदी फार फार तर आपली नातवंडं जग बघू शकतील. हे काही तथाकथीत भविष्य नव्हे तर ते एक सप्रमाण सिद्ध केले जाणारे भाकीत आहे. ते लोकप्रभात मांडलय मिलिंद जोशींनी. सगळ्यांना माहीत व्हावे हा या दोन ओळींच्या माहितीचा हेतू.

आजच्या शिक्षणसंस्था

पुर्वप्रसिद्धी: http://www.misalpav.com/node/8385

आजच्या शिक्षणसंस्थांचे खरे रुप सुज्ञ वाचकांसमोर यावे हा हेतू या मागे आहे. (कोठे कर्मवीर आणि कोठे आजकालच्या शिक्षणसंस्था )

नुकतीच नाशिक येथील एका 'विद्यामंदिर' या संस्थेत शिक्षक-शिक्षकसेवक (प्राथमीक+शालेय्+महावीद्यालयीन)या पदांच्या काही जागा भरावयाच्या असल्याची जाहीरात वर्तमानपत्रात आढळली. या पदांसाठी त्यांनी नोकरी अर्ज विक्रीला ठेवले आहेत. ज्या कोणाला या पदांसाठी अर्ज करायचे असतील त्यांना या संस्थेचा 'छापील अर्ज' रु. १००/- मोजुन घ्यावा लागेल आणि तो सुद्धा रोख पैश्याच्या स्वरुपात नव्हे तर "पोस्टल ऑर्डर" देवुन मगच.

आता या सगळ्या कारभारात काही प्रश्न उद्भवतात.

१. सामाजीक शिक्षणसंस्थांचे असले 'छापील अर्जांचे' प्रकार म्हणजे धंदेवाईक प्रकार आहेत हे आपण म्हणू शकतो काय?

२. सगळ्या शाळांत/ कॉलेजात कॅश स्विकारली जाते. अर्जासाठी "पोस्टल ऑर्डर" योग्य आहे काय? एका १००/- रू.च्या "पोस्टल ऑर्डर"साठी १० रु. खर्च येतो. मग पोस्टात जाणे, वेळ, पेट्रोल, प्रतीलीपी (झेरॉक्स हो) आणि मनस्ताप याचा खर्च कोण मोजणार? पोस्टल ऑर्डर घेणे म्हणजे सरकारी काम आहे हे दाखवणे होते काय?

३. एकाच उमेदवाराला दोन पदांसाठी अर्ज करावयाचा असेल तर दोन "पोस्टल ऑर्डर" लागणार होत्या. (म्हणजे पुन्हा खर्च - पुन्हा कमाई) ते टाळण्यासाठी अर्जातच काही सुधारणा केली जाऊ शकत नाही काय?

४. मी तो अर्ज स्वता: बघीतला तर त्यात काही जगावेगळी माहीती विचारलेली नव्हती. तेच ते रकाने जे सर्वसामान्य अर्ज भरायला लागतात तेच होते. तो अर्ज छापायला केवळ १ ते १.५० रु खर्च आला असता. त्याच अर्जाची किंमत रु. १००+१०=११०/- होवू शकते काय?
त्याचबरोबर अर्जासोबत सगळ्या कागदपत्रांच्या प्रतीलीपी आणि उमेदवाराचे छायाचित्र जोडायचा खर्च पण ध्यानात घ्या. तसेच हा अर्ज पोस्टाने मिळविण्याचा व पाठवण्याचा जाहीरातीत काहीच उल्लेख नाही. म्हणजेच सगळे लोक झक मारत 'विद्यामंदिरात' जातील व अर्ज घेतील व भरून देतील. यासाठी काही लोक ग्रामीण भागातून आले असतील, काहींच्या दोन दोन चकरा होतील. हे सगळे
माननीय संचालकांना समजले नाही काय? (हे 'विद्यामंदिर' आधी ग्रामीण भागातलेच होते.)

४. माझ्या माहीतीप्रमाणे बि.एड, डि.एड. पदवी धारक बेरोजगारांची संख्या ध्यानात घेवून व असलेल्या जागा बघून कमीतकमी ५००० अर्ज जरी पकडले तरी 'विद्यामंदिरास' रू. ५००००० ची घसघशीत कमाई होणार होती.

बि.एड, डि.एड. पदवी धारक हा काही निरीक्षर नसतो. त्यास कमीतकमी अर्ज तर 'लिहीता' येतच असणार. असे असतांना 'छापील अर्जाची' गरज काय? त्यांना अर्जाचे छापील स्वरूपच हवे होते तर पेपरध्येच तशा अर्जाचे स्वरूप देवून व ते बेरोजगारांनी टाईप करून घेवून - बेरोजगारांच्या पालकांचे पैसे वाचवता आले नसते काय?

मान्य आहे की, एवढे अर्ज स्वि़कारणे, प्रोसेस करणे, नोकरी देणे हे 'विद्यामंदिराचे' 'काम' आहे. पण ते काही फुकट काम करणार नाहीत. नोकरी लागलेल्या (किमानपक्षी जाहीरात येण्याआधीच लागलेल्या) उमेदवारांकडून काही लाख घेतलेच असतील ना?

अशा प्रकारे एका मोठ्या 'विद्यामंदिराला' एक नोकरीसाठी अर्ज विक्रीचा पायंडा पाडायचा काय अधीकार आहे?

सरकार तर काखा वर करून मोकळे होईल. पण याची दखल कोणी घेईल काय?

Monday, June 29, 2009

टनेल व्हिजन V/S पेरिफेरल व्हिजन किंवा टनेल व्हिजन व पेरिफेरल व्हिजन चर्चा

http://www.misalpav.com/node/8342#comment-128443

विप्र सरांनी 'टनेलवर चर्चा करायला आवडेल' असे सांगीतल्याने या धाग्याचा उदय झाला आहे.

आता काहीजण म्हणतील की फुटकळ चर्चा आहे, हात धुवुन घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे वगैरे वगैरे.
किंवा माननीय संपादकांपैकी काही जण या धाग्याला आक्षेप घेवून हा धागाच गायब करु शकतात. (माझी त्यांना तसे न करण्याची विनंती आहे. (परत्येकाचा ईगो सांबाळाया लागतू. राग याया नकू ना.) )
असो.

तर चित्रे साहेबांनी सांगीतलेले आणि अ‍ॅलन आणि बार्बरा पीस (अंतर्राष्ट्रीय ख्यातीप्राप्त) यांनी लिहिलेले "टनेल व्हिजन व पेरिफेरल व्हिजन" वरील उदाहरण खोटे कसे असेल? हेच उदाहरण काही लोकांना पटलेलेही आहे असे सांगितलेले आहे.

त्या उदाहरणात सांगितले की, "जगण्याची पद्धत बदलली पण पुरूषांची 'लांबपर्यंत बघण्याची दृष्टी (टनेल व्हिजन) विकसित होत राहिली. "
मला तरी वाटते की पुरुषांना 'लांबपर्यंत बघण्याची दृष्टी' आता जितकी आहे तितकीच आधीपासुनच होती. (म्हणजे आता ती तितकीच 'पॉवरफूल' आहे असे मला म्हणावयाचे आहे, ती क्षीण वगैरे झालेली नाही.)
आता "बायकांची 'आसपासचे बघण्याची दृष्टी '(पेरिफेरल व्हिजन) विकसित होत राहिली" यावर मतप्रवाह असू शकतात व त्यावर मिपाधर्मानूसार साधकबाधक चर्चाही होवू शकते.

"ज्याप्रमाणे पुरूषांना फ्रीजमधल्या, कपाटातल्या इ. वस्तू पटकन सापडत नाहीत त्याप्रमाणे स्त्रियांना रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करताना दूरवरचं पहायला अडचण वाटते." हे उदाहरण तर खरोखर पटते. हा अनूभव बहूतेक स्त्रियांनी त्यांच्या नवर्‍याबद्द्ल घेतला असेल आणि बहूतेक माणसांनी ( त्यात नवरे पण आले. ते पण माणुसच असतात.) दिवसासुद्धा घेतला असेल.

प्रॅक्टिकल विचार केला तर बहुतेक ड्रायव्हर हे पुरुष असतात. ट्रक, बस, रिक्षा, मो. सायकल चालवणार्‍यांमधे सांखीकीय द्रुष्ट्या पुरुष हे आघाडीवर आहेत.

आता एकूणच 'टनेल व्हिजन' व 'पेरिफेरल व्हिजन' चा विचार 'एखाद्या खरोखरच्या टनेल' बाबतीत केला आणि त्याच्या बाबतीत "स्त्रि आणि पुरूष" यांत बदल केला तर केवढा मोठा अपघात होवु शकतो याची कल्पना येवु शकते. (म्हणजे विचार करा - स्त्रियांना 'टनेल व्हिजन' आलीय आणि पुरूषांना 'पेरिफेरल व्हिजन' आलीय. खरोखरच्या टनेलमध्ये पुरुष ड्रायव्हर आहे. नुसती कल्पना करा, किती मोठे अपघात होवु शकतात, नाही?)

म्हणुनच माणसांना 'टनेल व्हिजन' आहे तेच बरे आहे.

आता आपण यावर विप्र सरांना आवडेल अशी चर्चा करू शकतात. धन्यवाद.

Monday, June 22, 2009

-: माझे घर कौलारू :-

माझ्या घराचा पत्ता

खाली आहे हिरवळ हिरवी
दोन बाजूंनी डोंगर कडे
उंच बघावे आभाळ निळे
सोनेरी सुर्यकिरण त्यातून पडे ||

घाट सोपा लांब चढा
किंवा डोंगर चढा छोटा वाकडा
दिसेल खाली तलाव नितळ
आणि़क बाजूस सुबक देवूळ ||

खळखळ खळखळ वाहे झरा
वाट आपली पुढे सावध उतरा
चला पुढे चला, हे आहे चिंचबन
थकला तर थांबा थोडे, जीरेल सगळा शिण ||

ती खालची, ती मधली आळी
पाटील गाल्ली अन मोठी आळी आहे ती वर
आता आहे थोडा उतार
त्यानंतर दिसेल तुम्हां माझे कौलारू घर ||

- पाषाणभेद
१७/०२/१९९८

वर्णन (तमाशातले सवाल जबाब): पुन्हा लेखन

वर्णन (पुन्हा लेखन) (जुने वर्णन येथे आहे)
(चालः तमाशातले सवाल जबाब)

(सवाल जबाबात प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतो. प्रस्तुत सवाल जबाबात तो आणि ती एकमेकांची स्तुती करतात.)


तो: अटकर बांधा गोरा गोरा खांदा ss
पदर उडतोय वार्‍यावर
चवळीची तू शेंग शेलाटी
लवलव लवलव करती गss ग ग ग गss

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

ती: अक्क्डबाज मिशी तुझी रं
डोईचा शेमला उडतोय वार्‍यावरss
मनामधला मर्द पाहण्या
नजर माझी वळते रss रssरsरsर

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

तो: गोरा रंग तुझा दुधेरी ss
केस काळे मखमाली
हासणं तूझं मंजूळ मोठं
जणू गुलाब फुलले गाली ग ग ग गss

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

ती: पहीलवानाची छाती तुझी रं
न कधी पाहिली अशी भरदार
नजर न लागो तिला माझी
कोन दुसरा टिकल तिच्या म्होरं ? ss रssरsरsर

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

तो: दात तुझे मोती असती ss
नाक असे अणुकूचीदार
भुवयी ठळक तिरकामठी
नजरेचे मारती शर ग ग ग गss

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

ती: पायतान आस तुझं कोलापुरी
वाजतय लयीत करकर
खरा मावळा शोभे तु तर
पाहिजे हाती फक्त तलवार ss रssरsरsर

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

तो: पाहणं तुझ चोरून चोरून ss
राग तुझा लटका ग
लाजलीस हे सांगाया
फुका मारसी मुरका ग ग ग गss

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

ती: वागनं तुझं आहे मल्मली
रुबाब तुझा मोठा रं
मन मारत झुरते कधीची
जवळ ये धावत लवकर ss रssरsरsर

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

तो: लगबग लगबग तुझं चालणं ss
काम करतीया घाईत
जिंकुन घेई मनास माझ्या
होशी गळ्यातली ताईत ग ग ग गss

कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा
घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss)

- पाषाणभेद
०१/०६/२००९

झाले गेले विसरुनी जाऊन

झाले गेले विसरुनी जाऊन

झाले गेले विसरुनी जाऊन,
सांग तू माफ करशील का? करशील का? || ध्रु ||

न जुळू शकल्या आपूल्या तारा
न फुलू शकला मनमोर पिसारा
माणूस म्हणूनी ओळखशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || १ ||

उलटे सुलटे पडले फासे
दान दैवाचे हातात न गवसे
रिते हात पकडशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || २ ||

न लागली मेंदी हाती
न लागले कुंकू माथी
अखेरचे तू बघशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || ३ ||

- पाषाणभेद
१५/०३/१९९८

खेड्यातला आणि शहरी मुलगा

खेड्यातला आणि शहरी मुलगा

असशील बघत टिव्ही जरी तू
विटीदांडू कधी खेळलास काय? खेळलास काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खॉत असशील ऑईस्क्रीम तू
बांधॉवरची बोरं तू खॉल्लीस कॉय? खॉल्लीस कॉय?

नाय बॉ नाय नाय बॉ नाय

खेळत असशील बुध्दिबळ तू
कब्बड्डी कधी खेळलास काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

येत असशील कराटे तूला तरी
कुस्ती माझ्याशी खेळतोस काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

असशील स्विमींग करत जरी
नदीच्या डोहात डुंबला काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खातो आंबे मंडईतले जरी
चोरून जांभळे पाडली काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

पितोस दुध पिशवीतले
त्याला ताज्या दुधाची चव काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

दिमाख दाखवतोस शहराचा मोठा
खेड्यात एकदा राहतोस काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

- पाषाणभेद
७/०३/१९९८

Sunday, May 17, 2009

कुठवर पाहू तुझी मी वाट

कुठवर पाहू तुझी मी वाट


कुठवर पाहू तुझी मी वाट
सा़जणा, आठवण तुझी येते ||

एकटी मी मनामध्ये कुढते
वेड्या शंकेने उर धडधडते ||

भेट तुझी आहे जवळी
तिच्यामध्येच तुला बघते ||

असेल कारे स्थिती तुझीही
माझ्यासारखी आठवण येते ? ||

कुठवर राहू एकटी मी
मिलनासाठी तडफडते ||


- पाषाणभेद
०९/०६/१९९८

सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या थोडे आधी सरसगडावर जाण्याचे झाले. मी आणि माझा पालीतला भाचा -शुभम- असे दोघे जण सकाळी ११ वाजता बल्लाळेश्वराचे नाव घेवून घरातून निघालो.

छाया. १. निघतांना आम्ही एका बॅगेत खाण्याचे पदार्थ, पाणी आदी. घेतले.


छाया. २. गडाखालच्या विस्तीर्ण पठारावर आस्मादिक व शुभम


छाया. ३. सरसगडाचे खालून घेतलेले छायाचित्र १


छाया. ४. सरसगडाचे खालून घेतलेले छायाचित्र २


छाया. ५. या ठि़काणी आम्ही थांबलो असतांना आमच्या मागून ग. बा. वडेर हायस्कूलची शुभमच्या वर्गातली ४ मुले भेटली. ती शाळा बुडवून आली होती. (असे ते नेहमीच येत असे समजले.) ती मुले आम्हास वाटाड्या म्हणून नंतर उपयोगात आली.


छाया. ६. थोडे पुढे गेल्यानंतर दिसणारा गड. या दोन दिसणार्‍या भागात पायर्‍या खोदलेल्या आहेत. (नंतर छायाचित्र येत आहेच.)


छाया. ७. मागे वळून बघतांना दिसणारे पठार


छाया. ८. गडाच्या पहिल्या टप्प्यावर एक गुहा खोदलेली आहे.


छाया. ९. खालून वर जाणार्‍या पायर्‍या


छाया. १०. वरून खाली दिसणार्‍या पायर्‍या


छाया. १२. घळीतून दिसणारा समोरचा देखावा


छाया. १३. पायर्‍या संपल्यानंतर लागणारा पहीला दरवाजा
या नंतर आमच्याकडचे पाणी संपले आणि गडावर असलेल्या १ ल्या पाण्याच्या टाक्यातुन पाणी भरून घेतले.


छाया. १४. या ठिकाणी असलेली नैसर्गीक खोबण. येथे गडकरी राहत असावेत. (आपली नावे गडावर टाकणार्‍यांना चाबकाने फोडले पाहीजे. )


छाया. १५. या ठिकाणावरुन दिसणारे गडाच्या पाठीमागील द्रुष्य


छाया. १६. दुसर्‍या टप्प्यात आम्ही येथे डबा खाल्ला आणि थोडी विश्रांती घेतली.


छाया. १७. तिसरा टप्पा थोडा अवघड आहे. सरळ चढाईवर पाय सरकू शकतो. गडमाथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे.


छाया. १८. गडावरून दिसणारे सुधागड एज्यू. सोसा. चे ग. बा. वडेर हायस्कूल. शाळेत होणार्‍या वार्षीक क्रॉसकंट्री स्पर्धेत काही मुले शाळेतून येणार्‍या वाटेने ३० मिनीटात गडावर येतात.


छाया. १९. गडावरून दिसणारी अंबा नदी


छाया. २०. गडाच्या उत्तरे कडील द्रुष्य. गडावर येण्यासाठी उत्तरेकडुन पण बिकट वाट आहे.


छाया. २१. आणखी एक द्रुष्य

गडावर थोडे थांबुन ईतिहासातील अनाम विरांचे स्मरण करून आम्ही खाली उतरलो. शाळेतली मुले केव्हाच पसार झाली होती. खाली येण्यास ४:३० झाले होते.

वर्णन

वर्णन
(चालः तमाशातले सवाल जबाब)

अटकर बांधा गोरा गोरा खांदा ss
पदर उडतोय वार्‍यावर
चवळीची तू शेंग शेलाटी
लवलव लवलव करती गss ग ग ग गss (माझ्या रामा तू रं ss)

गोरा रंग तुझा दुधेरी ss
केस काळे मखमाली
हासणं तूझं मंजूळ मोठं
जणू गुलाब फुलले गाली ग ग ग गss

दात तुझे मोती असती ss
नाक असे अणुकूचीदार
भुवयी ठळक तिरकामठी
नजरेचे मारती शर ग ग ग गss

पाहणं तुझ चोरून चोरून ss
राग तुझा लटका ग
लाजलीस हे सांगाया
फुका मारसी मुरका ग ग ग गss

लगबग लगबग तुझं चालणं ss
काम करतीया घाईत
जिंकुन घेई मनास माझ्या
होशी गळ्यातली ताईत ग ग ग गss

मार्च १९९८

(जुलाब)

आमची प्रेरणा स्वप्नयोगी यांचा गुलाब

जुलाबाच्या वेळी पोटावरली लव
जोरात थरथरली
ते पाहुन माझी छाती
मुळव्याधाच्या आठवणींनी हबकली

माझ्या जमीनीच गाणं

रामराम मंडळी. लई दिवसापास्न मी तुम्हास्नी माझ्या शेतावर घेवुन जायच म्हनत होतो. तो योग आज आला बघा.
चला तर मग माझ्या शेतावर.

माझ्या जमीनीच गाणं

हि जमीन माझी काळी काळीभोर
हि जमीन माझी लई दिलदार || ध्रु ||

हिच्यामंदी करीतो मी जोंधळा
लावीतो कधिमधी हरभरा
पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर || १ ||

हि जमीन माझी ...

कोंबडी शेळी बकरं मेंढरं
तसच पाळीतो मी रानपाखरं
गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं || २ ||

हि जमीन माझी ...

हि विहीर माझी लईलई भारी
सतरा झरं तिच्यामंदी पानी भरी
अहो मोटर चाले तास चार || ३ ||

हि जमीन माझी ...

एका तुकड्यात लावले तांबटे वांगे हो
एक तुकडा लावला घास हो खातील जनावरं माझी खास
आलाय कलमी आंब्याला सोन्यावानी मोहोर || ४ ||

हि जमीन माझी ...

औंदा लावलाय मी उन्हाळी कांदा
देईल हातामधी रुपया बंदा
न्याहारी आसं माझी झुनका भाकरं || ५ ||

हि जमीन माझी ...

उस हा हो हिरवा जर्द
त्याला घालतो मी हो बारं
झालीत मनगटाएवढी त्याची पेरं || ६ ||

हि जमीन माझी ...

मी हो शेतकरी भिमथडीचा
गुळासाठी लावतो गुर्‍हाळ
तिकड सहकारी करी साखर || ७ ||

हि जमीन माझी ...

कारभारनीनं लावली हौसेने कपास मऊ
हयो काय, इथं टरारला गहू
त्येला खायाला भिरभीरती पाखरं || ८ ||

हि जमीन माझी ...

कुदळ फावडं विळा नांगर
तण काढती हो ही औजारं
यंदा घ्यायाचा आहे हो ट्याक्टर || ९ ||

हि जमीन माझी काळी काळीभोर
हि जमीन माझी लई दिलदार || ध्रु ||
२८/०१/१९९८
- वणी ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील काव्यसंमेलनात २००० साली वाचन केलेली कविता.

काळा मसाला / गोडा मसाला

जगात भारतीय मसाल्यांना मानाचे स्थान आहे.

आता दिवस उन्हाळ्याचे आहेत. आताच्या दिवसात घरोघरी कुरडया, पापड, लोणची तसेच मसाला आणि तिखट केले जाते. त्यातही मसाला करणे म्हणजे एक प्रोजेक्ट असतो. कोणाचा मसाला कसा आहे यावर त्या त्या घरात ग्रुहीणींत संवाद होत असतो.
प्रत्येक घराची मसाला करायची पद्धत वेगवेगळी असते. कोणी कोणते प्रमाण वापरतो त्या बद्दल वेगवेगळी मते असतात.
तर अशा या वार्षीक पदार्थाचे १ किलो चे प्रमाण आपण सांगावे. लक्षात घ्या की आपण १ किलो मिरची वापरत आहोत. त्या १ किलो मिरचीचा आपण मसाला बनवत आहोत. तर प्रत्येक घटकांचे प्रमाण किती असावे?
जसे:-
गोडतेल: १कि.
तेजपान :
खसखस :
हळद :
शहाजीरे :
सुंठ :
वेलदोडा :

आपण प्रमाण जरी ठरवू / देवु शकत नसाल तरी कमीतकमी घटक पदार्थांची यादी तर द्या म्हणजे जाणकार सभासद त्याचे प्रमाण पण देतील.

आधीच धन्यवाद.

उल्का

उल्का
उन्हाळ्याच्या रात्रीत मी बाहेर झोपतो,
झोपतांना काळेशार आभाळ पहातो.

काळ्याशार अंगणात शुभ्र चांदण्याचा सडा पडतो,
दर वेळी ठरावीक ठिकाणी प्रत्येक चांदणीचा थेंब दिसतो.

गेल्या पंधरवड्यापासून एक चांदणी वेगळी दिसते,
प्रत्येक थेंब शांत असतो, ही मात्र सतत हसते.

अचानक काल रात्री ती चांदणी खाली आली,
लोक म्हणाले, "ती चांदणी नव्हे, उल्का झाली."

मला तर असे वाटते, ती चांदणी कुणा ग्रहाच्या प्रेमात पडली,
आणि त्या ग्रहाच्या ओढीने स्वता:बिचारी भस्मसात झाली.

१०/०५/१९९८

ताड गोळा / ताड फळ / ताडा गेदली

ताड फळ / ताडा गेदली

खालील लिखाण नक्की कोठे टाकावे त्याबद्दल माझा गोंधळ झाला. फोटु आहे म्हणुन कलादालनात टाकावी तर हे फोटू म्हणजे काही कला नाही. जनातलं, मनातलं मध्ये टाकावे तर त्या सारखे लेखन नाही. शेवटी खाण्याशी संबंधीत आहे म्हणून पाककृती या सदरात टाकावे असा विचार केला. पण मी या लेखात तर शेवटी प्रश्न विचारला आहे. म्हणून मी हा लेख काथ्याकूट मध्ये टाकला. आपण मला माफ करालच ही अपेक्षा. असो.

कालपरवाच कामानिमीत्त सुरतेवर स्वारी केली. जातांना एका छोट्या गावात (जिल्हा डांग) आठवडे बाजार भरला होता. स्टेपनी चे पंक्चर काढायचे होतेच. त्यामूळे वेळ होता म्हणून सहज बाजारात फिरलो. तर खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे 'ताडफळे' विकायला आलेली होती.


छाया. १ विक्रीस आलेली ताडफळे


छाया. २ विक्रीस आलेली ताडफळे

त्यांची किंमत रू. १० ला ४ नग अशी होती. विक्री करायला आलेल्या माणसाने सांगितले की, त्यांच्या भागात ते त्या फळास 'ताड गेदली' किंवा 'ताडा गेदली' असे म्हणतात. मी त्याला आणखी माहीती विचारली असता, "ते ताडाचे उंच झाड असते. त्यास हे फळ लागते. त्या झाडाच्या बुंध्यापासुन निरा निघते आणि तिच नंतर ताडी बनते" असे त्याने सांगीतले. मी ती फळे विकत घेतली. त्यावरचे साल काढून टाकले. नंतर ते खालीलप्रमाणे दिसतात.


छाया. ३ साल काढुन टाकलेली ताडफळे


छाया. ४ साल काढुन टाकलेली ताडफळे

आपण कच्चे नारळ सोलून आत ज्या प्रमाणे गर निघतो तशीच चव आतल्या गराची लागते. गरात पाणी निघत नाही. गर सलग असतो. हे फळ उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात येते असे समजले.

हे नक्की ताडफळ आहे ना? दुसरे नाव असेल तर ते काय? ( योग्य नाव समजले तर लेखाचे शिर्षक बदलता येईल.) त्याचा औषधी उपयोग आहे का?