या श्रावणातील चौथ्या सोमवारी त्रंबकेश्चर ला गेलो होतो. गावात मंदिराजवळ पाऊस होता व मंदिरात कॅमेरा नेता येत नव्हता. बाहेर गर्दीचे काय फोटो काढणार? ती तर सगळीकडेच आहे.
दुपारी आम्ही गंगाद्वार या डोंगरावरील ठिकाणी गेलो होतो. तेथेही सतत पाऊस चालू होता म्हणून काही फोटो काढता आले नाही. जे काही तिन चार फोटो काढले ते खाली देत आहे.
गंगाद्वार च्या पायर्या चढतांना दिसणारा ब्रम्हगीरी चा पर्वत. याच पर्वतावर गोदावरी नदी उगम पावली आहे. श्रावणातील तिसर्या सोमवारी या पर्वताला सुमारे ३० ते ६० किमी ची फेरी मारतात. या वेळी ही मी ती मारली होती. त्या बद्दल कधीतरी लिहीनच.
डोंगरावरील जंगलसंपदा
क्रिकेट वेडा देश. क्रिकेटला वेळ, काळ, स्थळ काही लागत नाही. (किती मॅन अवर वेस्ट जातात कुणास ठाव?)
पाझर तलाव दिसतोय
त्रंबकेश्वर शहर
No comments:
Post a Comment