स्वप्न
(चाल: एखादी शालेय कविता)स्वप्नामध्ये आज पाहीले सुंदर खासे तळे
बदक पांढरे, हिरवी झाडे, सुंदर पाणी निळे || ध्रू ||
होत्या बोटी, छोटी बेटे
महाल होता पलीकडे
त्यावर होती, चमकत नक्षी
स्वर्गच भासे मला गडे
गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावरती तरती कमळे || १ ||
निळे आभळ वरती वरती
सुर्यकिरण हे सोनेरी झरती
पक्षांची जाय उडत रांग
आनंदाला येतसे भरती
होवुनी स्वार वार्यावरती मन माझे हे पळे || २ ||
मउशार त्या गवतामध्ये
लाल गुलाबी फुले उमलली
फुलपांखरे रंगबीरंगी,
उडे तयांच्या अवतीभवती
बघण्या संदर देखावा हा नजर माझी वळे || 3 ||
No comments:
Post a Comment