गणपती त्यांच्या घरी गेले
गणपती त्यांच्या घरी गेले
मनाला रुखरुख लावूनी गेले ||धृ||
दहा दिवस थांबले घरी
आनंद आणला त्यांनी दारी
पुजा अर्चनाने घर पवित्र झाले
गणपती त्यांच्या घरी गेले ||१||
म्हटल्या आरत्या मोठ्या आवाजाने
ओवाळले निरांजन भक्तीभावाने
प्रसादाचे मोदक कितीक वाटले
गणपती त्यांच्या घरी गेले ||२||
हर्षाचा उत्सव पुर्ण झाला आता
नाच नाचून देहभान हरपता
"पुढल्या वर्षी लौकर या" सारे बोलले
गणपती त्यांच्या घरी गेले ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०१०
मनाला रुखरुख लावूनी गेले ||धृ||
दहा दिवस थांबले घरी
आनंद आणला त्यांनी दारी
पुजा अर्चनाने घर पवित्र झाले
गणपती त्यांच्या घरी गेले ||१||
म्हटल्या आरत्या मोठ्या आवाजाने
ओवाळले निरांजन भक्तीभावाने
प्रसादाचे मोदक कितीक वाटले
गणपती त्यांच्या घरी गेले ||२||
हर्षाचा उत्सव पुर्ण झाला आता
नाच नाचून देहभान हरपता
"पुढल्या वर्षी लौकर या" सारे बोलले
गणपती त्यांच्या घरी गेले ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०१०
No comments:
Post a Comment