Friday, April 8, 2011

पिकलं पान

पिकलं पान
पिकलं पान
झाडाला म्हणते बाय बाय
माझं आता
काम काय? ||१||

पिकलं पान
हिरवटपना जात नाही
केव्हा गळेल केव्हा गळेल?
झाडालाच चिकटून राही ||२||

पिकलं पान
झाडावरून गळून जाई
झाडाखाली पडून पडून
सडून जाई ||३||

पिकलं पान
झाडावरून पडून जाई
जमीनीवर पडल्या पडल्या
जुन्या दिवसांची आठवण येई ||४||

पिकलं पान
विचारी दुसर्‍याला
माझा खांदा तुला?
की तुझा खांदा मला? ||५||

पिकलं पान
फळाला म्हणालं
तुझं माझं
नशीबच निराळं ||६||

पिकलं पान
पिकलं फळ
यांची होते
वेगळी वेळ ||७||

पिकलं पान
पिकली केळी
यांचे महत्व वेगळेवेगळे
वेगवेगळ्या वेळी ||८||

पिकलं पान
खाली पडलं
तिला देण्यासाठी
वहीत ठेवलं ||९||

पिकलं पान
खाली पडलं
जाळी होण्यासाठी
पुस्तकात ठेवलं ||१०||

पिकलं पान
पडलं खाली
पुस्तकात ठेवलं
जाळी झाली ||११||

पिकल्या पान
उपयोग किती!
झाडाखालीच कुजते
त्याच झाडाला खत होण्यासाठी ||१२||

पिकलं पान
पडलं खाली
पुस्तकात ठेवलं
जाळी झाली ||||

पिकलं पान
मनात भरलं
कवितेला मग
कारण सुचलं ||||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/०९/२०१०

No comments: