Friday, April 8, 2011

चित्रपटगीतः चला रे चला, चला गणपतीला आणू चला

चित्रपटगीतः चला रे चला, चला गणपतीला आणू चला

सिच्युएशनः गल्लीत सार्वजनीक मंडळाचा गणपती बसतोय. दोन हिरो अन दोन हिरवीनी आहेत. म्युझीक सुरू.....
(सुचना: एक ओळ हिरो नं एक म्हणेल अन दुसरी ओळ हिरो नं २ म्हणेल असाही बदल करता येवु शकतो)


दोघे हिरो: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||धृ||

हिरो नं १: गणपतीची मुर्ती आणूया आज
हिरो नं १: कशी आणायाची ठरवा लगेच

हिरो नं २: अष्टविनायक आणूया की राजा लालबागचा?
हिरो नं २: बालगणेश आणूया की श्रीमंत दगडूशेटचा?

दोघे हिरो: घाई करा घाई करा, लगेच निघु चला
कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||१||

हिरो नं १: ढोल ताशे बडवा तुम्ही रे जोरात
हिरो नं १: डिजे आणूनी लावा मोठ्या आवाजात

हिरो नं २: झाडून सारे सगळे नाचा चला रे
हिरो नं २: गणेशाच्या उत्सवात सहभागी व्हा रे

दोघे हिरो: उगा फिकीर उन्हापावसाची करता कशाला
कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||२||

हिरवीन नं १: साजिरी सुंदर गणेशाची मुर्ती
हिरवीन नं १: पुजनाने त्याच्या भक्तां येई स्पुर्ती

हिरवीन नं २: मनामध्ये साठवूया भावभक्तीने त्याला
हिरवीन नं २: आरती करा आता निरांजन ओवाळा

दोघी: नमस्कार करा सारे, प्रसादाला हात पुढे करा
कोरस: चला रे चला, चला गणपतीला आणू चला ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०९/२०१०

No comments: