जुना जमाना गेला आता नवा जमाना आला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला
शालिनता गेली सारी कुठं, दिखावूपणा राहीला ||धृ||
आईवडील मोठे करती मुलाला
आजारपणात साथ देती त्याला
शिक्षण देती गुणाचा व्हायला
म्हातारपणी मुलगा पांग फेडी
वृद्धाश्रमी धाडी म्हातार्या आईबापाला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||१||
शिक्षक विद्यार्थी नाते किती पवित्र असे
शिष्य गुरूला आधी वंदन करीत असे
आदराने मान झुकवूनी विद्यार्थी बोलायचा
शिक्षकही आदर्श व्यक्ती त्याला बनवायचा
आता शिक्षक विद्यार्थी एकत्र जाती दारू प्यायला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||२||
नऊवारी साडीचोळी सारं अंग झाकीतसे
मळवट कुंकू, लांब वेणी, हाती चुडा स्त्री घालीतसे
सहावारी साडी नेसूनही स्त्री सुंदर दिसे
बाई आताची मायक्रो स्कर्ट घालूनी फिरे
डेटींग चालू झाली अन रेव्ह पार्टी होई फ्रेंडशीप डेला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||३||
वाचली का तुम्ही 'आज्ञापत्रे' शिवाजी महाराजांची?
ताकीद दिली त्यात अधिकार्यांनी निट वागण्याची
रयतेस नका नाडू कणसेही नका खुडू पिकांची
विपरीत वागाल तर भिती मनात ठेवा शिक्षेची
आता अधिकारीही चाटावले लाच खाण्याला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||४||
मान्य आहे की प्रगती झालीच पाहीजे
जुने सोडूनी नवे अंगी बाणवले पाहीजे
आदर्श वागण्याला कोणाचे बंधन आहे हो?
कसेही वागणे म्हणजे जीवन नव्हे हो!
योग्य वर्तन करून समृद्ध करा जगण्याला
जुन्या जमान्याला विसरू नका जरी नवा जमाना आला ||५||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०९/२०१०
शालिनता गेली सारी कुठं, दिखावूपणा राहीला ||धृ||
आईवडील मोठे करती मुलाला
आजारपणात साथ देती त्याला
शिक्षण देती गुणाचा व्हायला
म्हातारपणी मुलगा पांग फेडी
वृद्धाश्रमी धाडी म्हातार्या आईबापाला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||१||
शिक्षक विद्यार्थी नाते किती पवित्र असे
शिष्य गुरूला आधी वंदन करीत असे
आदराने मान झुकवूनी विद्यार्थी बोलायचा
शिक्षकही आदर्श व्यक्ती त्याला बनवायचा
आता शिक्षक विद्यार्थी एकत्र जाती दारू प्यायला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||२||
नऊवारी साडीचोळी सारं अंग झाकीतसे
मळवट कुंकू, लांब वेणी, हाती चुडा स्त्री घालीतसे
सहावारी साडी नेसूनही स्त्री सुंदर दिसे
बाई आताची मायक्रो स्कर्ट घालूनी फिरे
डेटींग चालू झाली अन रेव्ह पार्टी होई फ्रेंडशीप डेला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||३||
वाचली का तुम्ही 'आज्ञापत्रे' शिवाजी महाराजांची?
ताकीद दिली त्यात अधिकार्यांनी निट वागण्याची
रयतेस नका नाडू कणसेही नका खुडू पिकांची
विपरीत वागाल तर भिती मनात ठेवा शिक्षेची
आता अधिकारीही चाटावले लाच खाण्याला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||४||
मान्य आहे की प्रगती झालीच पाहीजे
जुने सोडूनी नवे अंगी बाणवले पाहीजे
आदर्श वागण्याला कोणाचे बंधन आहे हो?
कसेही वागणे म्हणजे जीवन नव्हे हो!
योग्य वर्तन करून समृद्ध करा जगण्याला
जुन्या जमान्याला विसरू नका जरी नवा जमाना आला ||५||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०९/२०१०
No comments:
Post a Comment