Friday, April 8, 2011

माझ्या झोपेची झाली आता येळ

माझ्या झोपेची झाली आता येळ

आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर
माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ||

दिसभर मी राबराबतो
कष्टानं दमून जातो
किती आटवन तुझी मला येई
कामामदी बी लक्ष लागत न्हाई
दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ
माझ्या झोपेची झाली आता येळ ||१||

कधी दिवसपाळीत दिस जाई
कधी रातपाळी आडवी येई
हातामधी हात तुझा कधी मी घेई?
त्यासाठी जीव माझा कसनुसा होई
कधी खेळायचा ग पिरीतीचा आपन खेळ?
माझ्या झोपेची झाली आता येळ ||२||

नको दुनीयेची चिंता आता तू करू
राघू मैना आपन दोघे ठरू
उगा नको नको तू म्हनू
जीव टांगनीला नको आणू
आता येतीस का भजनाचे वाजवू का टाळ? ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०९/२०१०

No comments: