लावणी: जाल हो राया उद्या
जाल हो राया उद्या,रात आजची खास
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||धृ||
हात नका धरू हाती, सोडा मज थोडी
लांब नाही जायची नको ओढा ओढी
तुमच्या अशा वागण्यानं वेगळं वाटं खास
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||१||
तुम्ही शेवंती गजरा आणला मला माळला
शुर रसीक पाहूनी तोरा जिव भाळला
कसं जगावं तुम्हावीण लागली तुमची आस
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||२||
कालच्या दिशी वाट पाहीली, भेट राहीली
नजरेनं घायाळ केलं, काया तुम्हा वाहीली
नका जावू आता, पुढ्यात ओतली ज्वानीची रास
शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०८/२०१०

No comments:
Post a Comment