Friday, April 8, 2011

गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा

गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा

असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा
उगा खोड्या काढी मज सोड ना ||धृ||

गोड बोलणे तुझे लाघवी
यमुनातीरी वेणू वाजवी
करशी मग तु रे बळजोरी
मीही सांगे यशोदेला तुझा खोटा गुन्हा ||१||

दह्यादुधाचे विरजण लावले
लोणी सारे विकण्या निघाले
वाट अडवण्या आडवा येई
उपकार कर माझ्यावरती आता जावू दे ना ||२||

तुझ्या रुपात एकरूप झाले
माझे मी पण हरवून गेले
उरला नाही भेद कसला
कोण गौळण कोण कान्हा ओळखू येईना ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०१०

No comments: