आज परत ही लावनी ऐका.
आजची लावनी लिहूनशान म्या या आयपीएल किरकेट च्या मॅचेमधी जशी हॅट्रीक करत्यात तशी सलग तीन दिवस ३ लावन्या लिहूनशान हॅट्रीकच केलीया. तुमी म्हनाल या सुक्काळीच्या पाषानाला काय लावनी चावली का लावनीवालीनं धरलं.
पन काय सांगू मंडळी, आहो खिशात 'लय शिरीयस' मुक्तछंदी परकृतीच्या ४/५ कवितांचे ड्राफ्ट हायती. पन मन ह्ये लावनीकडंचं वळतया पगा. माझ्यासारख्या दगडफोडी करनार्या मान्साला आसं लय इचार करूं करूं लागलं म्हंजे माझं टाळकं कसं पहार लावल्येल्या कातळागत फुटतंया पगा. काय करावं आन काय नायी त्ये तुमीच सांगा बाबांहो.
तर ही लावनी वाचूनशान तुमीच सांगा आपली होरो आन हिरवीनीची जोडी आशी का पळूं र्हायलीय ते? कसं?
नका अंगचटीला येवू
आडवाटंना जाता जाता नका अंगचटीला येवू
गाववाले मागं वळू वळू र्ह्यायलेत पाहू ||धृ||
कालच्या दिसापासूनी फिरतोया आपन जोडीनी
जातोया दुसर्या गावी पहिलं गाव सोडूनी
खोटं पडलं तुमी, उगा म्हनं आज खंडाळ्याला जावू
जा मी न्हाई येत आता, कारन....
गाववाले मागं वळू वळू र्ह्यायलेत पाहू ||१||
कोरस:
ते प्रवासी मागं वळू वळू र्ह्यायलेत पाहू
तो डायवर मागं वळू वळू र्ह्यायलाय पाहू
तो कंडक्टर मागं वळू वळू र्ह्यायलाय पाहू
ते प्रवासी मागं वळू वळू र्ह्यायलेत पाहू
तो डायवर मागं वळू वळू र्ह्यायलाय पाहू
तो कंडक्टर मागं वळू वळू र्ह्यायलाय पाहू
एस्टी मधी बसबसूनी कंबर माझी धरली
एका स्टँन्डावर थांबूनी वाट पाहूनी पुढली
निसतं एकाजागी बसूनी, कटाळा लागला मला येवू
जा मी न्हाई जात सच्यासंगती आता, कारन....
गाववाले मागं वळू वळू र्ह्यायलेत पाहू ||२||
कोरस:
ते प्रवासी मागं वळू वळू र्ह्यायलेत पाहू
तो डायवर मागं वळू वळू र्ह्यायलाय पाहू
तो कंडक्टर मागं वळू वळू र्ह्यायलाय पाहू
ते प्रवासी मागं वळू वळू र्ह्यायलेत पाहू
तो डायवर मागं वळू वळू र्ह्यायलाय पाहू
तो कंडक्टर मागं वळू वळू र्ह्यायलाय पाहू
- पाषाणभेद
०३/०४/२०१०
No comments:
Post a Comment