पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा
पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9226
{सदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते.
(पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.)
स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.}
पहीले वंदन धरणी मातेला sssssमातेला,
नंतर वंदून मराठी मातीला..
वंदतो शिवाजीराजांना
वंदन माझे मावळ्यांना
वंदतो संयूक्त महाराष्ट्राच्या हुताम्यांना...
वंदतो आई बापाला...
वंदतो हिंदवी सैन्याला....
वंदतो झाशीच्या राणीला
वंदून थोरामोठ्यांना...
शाहीर सचिन बोरसे करतो पोवाड्याला
जी र हा जी जी जी जी जी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी sssssss
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी... स्थापूनी
केले उपकार राज ठाकरेन राज ठाकरेंनी... राज ठाकरेंनी... राज ठाकरेंनी
मरगळलेला महाराष्ट्र जावून...
घेतली उभारी मराठी मनानंss मनानं ss जीरहा जी जी जी...
{गद्य : २००० च्या दशकात अचानक जिकडेतिकडे भैया लोकांचा संचार सुरू झालेला होता...
रेल्वे तर त्यांच्या बापाचीच मालमत्ता आहे असे समजून भैये लोक वागत होते...
कारखान्यात कमी रोजंदारीवर भैया लोक भरती होत होते... अशा वेळी.....}
महाराष्ट्रावर जोरदार हल्ला झाला भैया
अन कारखान्यात बट्याबोळ झाला आपल्या रोजीचा
रेल्वे भरतीत केला चालूपणा लालूने
साथ दिली त्याला तिकडे मुलायमसिंगने
अमरसिंग आहे तो तर त्याच जातीचा
मनातले त्यांच्या हाणून पाडायचा बेत राज ठाकरेंचा
{गद्य : अशा वेळी लालू, मुलायम, अमरसिंग व ईतर उत्तर भारतीय एकत्र आले...
मुंबईत छट पुजा करायची.... उत्तर भारतीय दिवस साजरे करायचे.... असले कार्यक्रम त्यांनी राबवायला सुरूवात केली....}
मुंबई तो हमारीच माई, बोलले युपीचे भाई
काम हम यहीच करेंगे, पैसा सब गाव ले जायेंगे (अहा)
राम आयेगा यहा... तो लछमन को भी यहा लायेंगे
{गद्य : असल्या वल्गना हे भैया लोक करत असत...
येथे राहून, येथे काम करून सगळा पैसा ते युपी बिहारात नेत असत....
ते येथे संटे येत असल्यामुळे येथील पोरीबाळींवर आयाबहीणींवर त्यांची वाईट नजर असे...
अशा ह्या महाराष्ट्रावर आलेल्या वाईट वेळी महाराष्ट्राकडे लक्ष देणारे होतेच कोण?}
महाराष्ट्राचे पुढारी फाडारी
बसले होते दिल्ली दरबारी... दिल्ली दरबारी
हाजी हाजी करू चालू होती सोनीयाची चाकरी...चाकरी (अहा..)
बसले होते मुग गिळुन... बोलत होते आवो आवो महाराष्ट्र
संयूक्त महाराष्ट्रासाठीचे विसरले घेतलेले कष्ट...
असले आपले भ्रष्ट नेते नतद्रष्ट अन भैये झालेत पुष्ट...
{गद्य : आपणच लोकसभा, विधानसभेसाठी निवडुन दिलेले नेते दिल्ली, मुंबईत नुसते तोंड बंद करून बसले होते....
पवार, पाटिल, देशमूख असली सरदारे दिल्ली दरबारात मुजरे करत होते...
मराठी जनतेची चाकरी करायची सोडून ईतर संघटना, पक्ष हेही भैया लोकांची चाकरी करीत होते....
भैया लोकांनी पुरवीलेल्या पैशावर मस्ती चालत होती...
ईकडे भैयांचा लोंढा महाराष्ट्रात येतच होता.... अत्याचार वाढतच होता...}
स्थिती ओळखली राज ठाकरेंनी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापियली
एकत्र जनता मराठी आली
युपी बिहारची जनता हादरली....
{गद्य : महाराष्ट्रावर पडलेल्या संकटकाळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली.
ज्या ठिकाणी आपले पोट भरते त्या महाराष्ट्राला आपले मानणारे जर युपी बिहारातले असतील तर तेही मराठी बांधव आहेत असे उदात्त विचार मांडणार्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत्रूत्व मराठी मनाचे पुरस्कर्ते राज ठाकरेंनी करावे हे महाराष्ट्राचे भाग्यच.}
महाराष्ट्रात राहणारा, राहणारा
महाराष्ट्रात जन्मणारा, जन्मणारा
मराठी बोलणारा, बोलणारा
मराठी मातीला आपलं मानणारा, मानणारा
तोच मराठी माणुस अभिप्रेत राजेंना...राजेंना
{गद्य : जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.
अशा या विचारांत काय वाईट आहे हो? जे जे युपी बिहारातल्या बांधव येथे राहून जर ते मराठी मनाचा, मराठी जनांचा, मराठी अस्मितेचा सन्मान करतात त्यांना दुखवायचे काय कारण?
आम्हालाही प्रगती करायचीय, स्वातंत्रानंतरही आपण फक्त चांगले रस्ते, पाणी ईत्यादी गोष्टींसाठीच आग्रह करत होतो.... आता ती वेळच येणार नाही... कारण....}
भौतिक, सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचे
कर्तव्य आहे आपले प्राप्त करण्याचे...
समस्यांची सोडवणूक करणे,
सर्व जाती, धर्म, पंथ, वर्गांचे...
एकत्र येवूण विकास करण्याचे....
उद्देश असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
{गद्य : विकासाआड येणारे सत्तागटांशी सर्व पातळींवर संघर्ष करणे,विकास करण्यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामे करणे, सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे,महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.}
{गद्य : भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे. }
मराठी माती अन मराठी विचार....
बाळासाहेबांसारखे रक्तात मुरले माझ्या छान.... (अहा)
महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय्य आयुष्याचे
त्यासाठीच जन्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
असे हे विकासाचे राज ठाकरी विचार...
शाहीर सचिन बोरसे मुजरा करी त्रिवार.... जी र हा जी जी जी जी जी
- शाहीर सचिन बोरसे
०३/०९/२००९
स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.
रामराम हो पाव्हणं! वाईच जरा बसा ईथं.
Sunday, September 13, 2009
Wednesday, September 2, 2009
(भूत कॉस्टींगचे...)
पुर्वप्रसिद्धी: http://www.misalpav.com/node/9205
मला माझ्या धंद्याबद्दल बेसीक शंका विचारायची होती. ति कुठे विचारावी असा प्रश्न मला पडला होता. माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राने हा धागा दाखवला व माझा हुरूप वाढून धंद्याची लाज न बाळगता हा धागा काढला.
भादव्याच्या महिन्यात घरगुती पित्रांच्या निमीत्ताने जेवणाची सोय झाल्याने माझा जीभेचा आणि तब्येतीचा प्रश्न हे कळीचे मुद्दे निकाली निघाले आहेत. आर्थिक दृष्टीने बघता खर्च व दगदगही कमी झाली आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी! नंतर भादवा संपल्यावर कोणत्या देवळापुढे बसावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नाहितरी आजकाल लोक जेवणाच्या बाबतीत फारच कॉस्टींग बघत जेवण बनवत असून त्यांचे जेवण फार कमी उरते. त्यातच त्यांना काही लोक शिळ्या अन्नाच्याही डिश करायला सांगतात. कोणी आपल्या ऑफीसातल्या गरीब लोकांना ते शिळे अन्न देतात व त्यांचा दुवा घेवून पुण्य मिळाल्याचे समाधान मानतात. पण माझ्यासारख्या भिकार्याला कोणी "जेवून जा रे. पोटभर जेव, स्वयंपाक येत असेल तर उद्या स्वयंपाक करायला व जेवायलाच ये, मस्त मटण करू, नाहीतरी मला जेवण घरी बनवायचा कंटाळाच येतो." असे म्हणत नाही. असो. काय हा भिकार्याला लेखनाचा हव्यास. आता देवळाच्या समोर लावलेल्या फलकावर लेखन केले पाहीजे. पर्वतीच्या टेकडीवर जाणारे टेकडे लोक आहेतच तेथे. देतील दोन, आपल घास म्हणायचे होते. घासानेच पोट भरते. काय हा विपर्यास. आता अंतीम असो.)
तर आर्थिक दृष्टीने बघता खर्च व दगदगही कमी झाली आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी!) पण तो नक्की किती टक्क्याने कमी झाला हे समजण्यासाठी रोजच्या एकवेळच्या भिक मागण्याचे कॉस्टींग काढून गणित मांडून फायद्याचे (मला तर फायद्याचेच वाटते. कोणी काही म्हणो भिक मागणे फायद्याचेच असते. आहो गुंतवणूक काय लागते, सांगा तुम्ही ? काहीच नाही. काय म्हणताय, तुम्ही येताय आमच्यात? (हे काय, पुन्हा अवांतर लेखन? माझ्यासारख्या चांगल्या भिकार्याला भिकेचे डोहाळे लागलेत मला असे वाटते.) असो. असो. (तुम्हीच कंस सोडवा. गणितातले तज्ञ ना तुम्ही?) ) प्रत्यक्ष गणित काढायचे असे ठरवले.
कॉस्टींग हा प्रकार मला नविन असल्याने अख्खा शनिवार भिकार्या मारुतीच्या मंदिरात यासंदर्भात माहिती ईतर समवयस्क भिकार्यांबरोबर (आय टी मधून ते मंदीच्या काळात हाकलले होते) बुकलत बसलो होतो पण नक्की कल्पना येईल कॉस्टींगची असे काहीच मिळाले नाही. (अगदी मायक्रोसॉफ्ट मनी, टॅली, ईतर ओपन सोर्स पॅकेजेस, राजे नावाच्या माणसाने दिलेली बजेटींगसाठीची एक्सेल फाईल, मिपावरचा हा धागा सर्व पाहून झाले होते. (हे काय, पुन्हा अवांतर लेखन? माझ्यासारख्या चांगल्या भिकार्याला भिकेचे डोहाळे लागलेत मला असे वाटते.) असो. असो. (तुम्हीच कंस सोडवा. गणितातले तज्ञ ना तुम्ही?))
कोणाला याबाबत माहिती असल्यास अथवा अभ्यास असल्यास मार्गदर्शन करू शकाल का?
Toll Free No.: 1800-365-24365
माझा फोन नं: 92 -020 -2365 24 365 Extn: 365 (ईंटरनॅशनल कॉल साठी पहिले ० लावा), मोबाईल: 91365 24 365, 91365 24 365 (कधीही फोन करा. 24 x 7 x 365 days service available.) (होलसेल भिक घेतली जाईल. (जुने कपडे/ वस्तू पण चालतील.) ट्रांसपोर्ट चा खर्च पार्टीला करावा लागेल. त्यासाठी ट्रक भाड्याने मिळेल. (वरचाच फोन वापरा.) )
व्य. नि. साठी email ID: it-exiled@cut-copy-paste-jobworker.org
visit us at: cut-copy-paste-jobworker.org

Subscribe to:
Posts (Atom)