Sunday, October 31, 2021

राम दुहायी, यह दुरी मुझसे अब सहा नही जाए

हवा मे पल्लू लहराये, वो थोडी शरमाये

राम दुहायी, यह दुरी मुझसे अब सहा नही जाए ||

कितनी कातील अदा है उसकी

छुरी बिनाही मै कट जाऊं |

मर तो जाता मै, और क्या करता

कैसे तकलीफ मै सहूं?

वो तो आती जैसे बिन बादल बिजली मुझपर गिर जाए |

राम दुहायी, यह दुरी मुझसे अब सहा नही जाए ||

कितने पागल हो चूके कितने तो बरबाद

रोजगार कितनो का छुटा न करो गिनती बारबार |

एक मै था बचा हुवा जो अब हुवा लाचार

क्या करू मै की तुम हम मिल पायें |

राम दुहायी, यह दुरी मुझसे अब सहा नही जाए ||

Sunday, October 24, 2021

मी एकटी

तांबडा का तो चंद्र नभीचा
का न असे नेहमीचा चंदेरी
ओळख असूनी अनओळखी
प्रित लपवीत रागावली स्वारी

फुले कळ्या घेवून पाने
मी एकटी उभी कधीची
वाट पाहूनी रात्र संपली 
पहाट उजाडली नभाची

- पाषाणभेद
२४/१०/२०२१       

अवकाळी आला पाऊस

अवकाळी आला पाऊस त्यानं सारं रानं धुतलं
हाती आलेलं पीक गेलं ते डोळ्यासमूर घडलं

काय सांगावी दैना चहूबाजूनी तो आला
ढगफुटी झाली जणू एकाजागी बरसला

किती निगूतीनं केलं व्हतं शेत आवंदा
बैलं नव्हते मदतीला औताला लावी खांदा 

खतं बियाणं आणूनीया येळेवर केला पेरा  
पाण्यासारखा पैसा पाण्यातच वाया गेला

पाऊस आला घेवून पाण्याचा मोठा लोंढा
न उरली बांधबंदिस्ती न उरला माती भेंडा

दु:ख सारं गेलं वाहून आलेल्या पाण्यात
उभारीनं करू पुन्हा तेच आपल्या हातात

- पाषाणभेद
२४/१०/२०२१

Saturday, October 23, 2021

पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर

रानी तू ना करो मांग की, "कही ले जावो हमें",
क्यूं की,
पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर
पिछले साल था वह लीटर का साठ सत्तर
अब वह चढ गया है सौ से बत्तर
कल पचास का डलवाते थे
आज भी उतनाही डलवाये हम
पॉकेट नही मानता, नही अब उसकी खैर
क्यूं की,
पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर
पेट्रोल का रहने दो अब डीजल भी हुवा महंगा
सरकार चाहती है कोई उससे ना ले पंगा
ट्रान्सपोर्टवाले हुवे कंगाल
ना करे सब्जी सामान का व्यापार
कैसे चलेगा चक्का, कैसे दौडेगा देश
टॅक्स के चक्कर में फसा आदमी कैसे करे परहेज
आपही बताओ कैसे निकले घर के बाहर
पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर
एक भैया ने डलवाया पेट्रोल हुए रुपये हजार
उसकी जांच करने आया चौकी का थानेदार
बोला इसकी तकरार अब जायेगी ईडी में
काहे का सकून भैया मन दुविधामें
बोला अब पैदल ही चलता हूं न चलावूंगा कार
क्यूं की,
पेट्रोल हुवा महंगा अब काहे की सैर

23/10/2021

Friday, October 22, 2021

सकाळ कोवळी

सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई
हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई

धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर
शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई

झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड
सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई

रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर
वार्‍यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई

फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती
खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई

- पाषाणभेद
१७/१०/२०२१

चांदणी अन प्रियकर

कुणी एक चांदणी नवथर
खाली आली धरणीवर
काय कसले तिला ना ठावे
इकडे तिकडे कोठे जावे
भूकेलेली रडवेली
रडून कोमेजलेली
तशात भेटला तिजला प्रियकर
अशाच चांदणीसाठी होता आतूर
कोण कुठली तू आलीस कशी
आपूलकीने त्याने केली चौकशी
लांब असते दूरदेशी येथे परदेशी
कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी
प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला
परी स्वगृहाच्या ओढीने जीव खंतावला
मी तर तुझा आताचा प्रियकर
घर तुझे कधीचे सुखकर
नको तू गृह विरह सहू
तू अन मी वेगळे होवू
प्रियकर त्वरीत निर्णय घेई
प्रियेस त्याच्या पोहचवून देई
हा राहीला पुन्हा एकला
रोज रात्री पाही तिजला
चांदणीही विरहात तळपे
अंधारअंगणी रात्रीस झळके
दोन जिवांची अशी ताटातुट झाली
प्रियकरास चांदणी कधी न मिळाली

पाभे
१४/१०/२०२१

लपाछपीचा डाव

निळ्या जांभळ्या ढगांआडूनी कोण बरे बोलावतो?
इकडे आहे मी इकडे तिकडे देखील मीच आहे असे बोलतो.

लपाछपीचा डाव असा हा राज्य माझ्यावर यावेळी
शोधण्यासाठी त्याला निघालो वेळ अवेळी

शोधता शोधता मी दमतो थकतो
त्यानंतर हळूच कधी तो चाहूल देतो.

दडूनी पुन्हा तो ढागांआड मला पुकारी
शोध घेण्या पुढे जातसे कानोसा घेऊनी

हा डाव कसला ठावूक नाही कधी संपतो
कधी येईल समोर त्याची मी वाट पाहतो

पाषाणभेद
१४/१०/२०२१

Tuesday, October 12, 2021

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ वृत्तांतलेखन

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकरहो!
आपला कट्टा नाशिक येथे दिनांक ०३/१०/२०२१ रोजी नाशिक येथे होणार आहे. आपणा सर्वांना या निमित्ताने तेथे कुटूंबासहीत उपस्थित राहण्याचे हार्दीक निमंत्रण आहे.

एकत्र जमण्याचे ठिकाणः नाशिक, अशोक स्तंभ - सर्कल थिएटर (किंवा ठरणार्‍या हॉटेलातही सरळ यावे)
वेळः मिसळ खाण्याची, अर्थात सकाळची, ९:३० वाजताची.

पुन्हा एकदा सर्व मिपा परिवाराला एकत्र येण्याचे हार्दीक निमंत्रण आहे.

#मिपाकट्टा, #मिसळपाव.कॉम-कट्टा, #मिपाकट्टा@नाशिक, #चला-नाशिकला, #mipakatta@Nashik, @katta-nashik
-------------------------------------------------

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ - वृत्तांतलेखन

बर्‍याच दिवसांच्या प्रतिक्षेत असणारा "मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१" त्याच दिवशी म्हणजे दिनांक ०३/१०/२०२१ रोजी नाशिक येथे "पेरूची वाडी" या हॉटेलात साजरा झाला त्याचा हा वृतांत. या भेटीचे फोटो आधीच प्रसिद्ध झाले असल्याने ते पुन्हा येथे डकवत नाही.

मिपाकर वरचेवर कट्टाभेट म्हणजेच गाठभेट किंवा गेट टुगेदर करतात. नाशकात आजपर्यंत जाहीर मिपाकट्टा कधी झाला नाही. या आधी आम्ही नाशिककर वरचेवर भेटत असतोच. या कोरोनाकाळात त्याला अल्प विश्रांती भेटली होती. त्यावर उतारा म्हणून मिपाकट्टा नाशिक येथेच करण्याचे आम्ही नाशिककरांनी ठरवले होते. बाहेरगावातून येणार्‍या पाहूण्यांची सरबराई करण्याची, त्यांची ठेप, व्यवस्था राखण्याची जय्यत तयारी आम्ही नाशिककरांनी केली होती. पण या कट्याला बाहेरगावचे कुणीही पाहूणे आले नाहीत हे सत्य आहे. आमचा त्यांचेवर राग असणार आहेच. असो.

तर कट्याचे नियोजन कसे करायचे यासाठी नाशिक तसेच इतर ठिकाणच्या मिपाकरांशी संपर्क साधला. त्यात कट्याचा दिवस व ठिकाणावरून बरीच खलबते झाली. अनेक जणांनी यंदाचा कट्टा मुंपुठाच्या (मुंबई, पुणे, ठाणे) आसपासच घ्यावा असा आग्रह धरला होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे नाशिकला जाहीर कट्याचे प्रायोजकत्व कधीही मिळाले नसल्याने आमचा आग्रह ह्या कट्यासाठी नाशिक शहराला होता. एकदाचे नाशिक ठिकाण जाहीर करून या प्रश्नावर तोडगा काढला गेला. तसेच या भेटीत मिपाकर त्यांचे कुटूंबीय सदस्य देखील आणू शकतात हा ठराव मान्य करण्यात आला. आपले कुटूंबीय जर अशा कट्टा भेटीत सामील केल्याचा आनंद वेगळाच असतो.

एकदाचे ठिकाण ठरल्यानंतर आता भेटीसाठी हॉटेल शोधणे आले. नाशकात अनेक हॉटेल्समध्ये मिसळ मिळते. नाशकात एक खडा मारला की तो खडा दहा मिसळवाल्यांना लागतो (असे मीच म्हणतो.) मुंबई तसेच पुण्याच्या रस्त्याच्या हॉटेल्सला वगळण्यात आले. कारण असे की, तेथे शांततेने मिसळीचा आनंद घेता आला नसता. नाशकातल्या उत्तरेकडील बाहेरच्या भागात मखमलाबाद गावाच्या रस्त्यावर निसर्गरम्य वातावरण आहे. हे गाव नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येते तरीदेखील गावाने गावपण अजून जपले आहे. (येथेच अभ्या अन लतीकेची मराठी मालीका 'सुंदरा मनामध्ये भरली' याचे चित्रीकरण होत आहे.) तेथील गंगापूर गाव व धरणाकडे जाणार्‍या रस्त्याला अनेक हॉटेल्स आहेत. तेथले एक 'पेरूची वाडी' या नावाचे हॉटेल ठरवले. आदल्या दिवशी तेथे फोन करून आमचे टेबल बूक करण्यात आले.

त्या आधी मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ अशा अर्थाचे दोन बॅनर्स मिपाच्या लोगोसहीत छापून घेतले. बॅनर तयार करणारा मुलाशी (दुकान मालक) बॅनर तयार होत असतांना गप्पा मारत बसलो. त्याला असल्या कट्याचे अप्रूप वाटले. त्याने लावलेल्या रेट बोर्डावरील रेट पेक्षा ५०% कमी रक्कम तो आकारत होता. मी त्याला त्याचे कारण विचारले तर तो म्हणाला की, "तुम्ही एवढे चांगले काम करत आहात. मग तुमच्याकडून कमीच पैसे घेईन वगैरे." मी त्याला सगळे पैसे देऊ करूनही तो पैसे कमीच घेत होता. मग मात्र मी जास्तीचे १०० रूपये तेथल्या एका मुलाच्या हातात दिले. त्या दुकानदार मुलाला मी मिपावरील लेख वाचन करण्यास सांगितले. त्यानेही वेळ मिळाल्यास वाचेन असे आश्वासन दिले.

बॅनरवर मिसळपाव.कॉम असे लिहील्याने मिसळपावच हॉटेलातला मेन्यू आपोआप ठरला गेला. सकाळी साडेनऊ वाजता हॉटेलात भेटण्याचे ठरले गेले. तशा अर्थाची झुम मिटींग आदल्या दिवशी झाली.

मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ रोजी हजर असलेले मिपा सदस्य व त्यांच्या कुटूंबीयांची नावे येथे आधीच लिहीतो म्हणजे लिखाणाला/ वाचनाला संदर्भ लागेल.

- मिपाआयडी- वकिलसाहेब असलेले श्री. संतोष भोई सर.
- मिपाआयडी- हर्‍या असलेले श्री. शिरीष कुलकर्णी साहेब, सौ. कुलकर्णी मॅडम, चि. पार्थ.
- मिपाआयडी पाषाणभेद असलेला सचिन बोरसे, सौ. अर्चना बोरसे, कु. स्वराली.
- मिपाआयडी जानू असलेले श्री सर्वेष लोहार सर, सौ. लोहार मॅडम, कु. प्रज्ञा, चि. आरुष.

बर्‍याच दिवसांच्या प्रतिक्षेत असणारा "मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१" त्याच दिवशी म्हणजे दिनांक ०३/१०/२०२१ रोजी नाशिक येथे "पेरूची वाडी" या हॉटेलात साजरा झाला त्याचा हा वृतांत. 

या भेटीचे फोटो येथे आहेत:-

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट),
चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट), श्री. जानू (निळसर शर्ट).
निळ्या टी शर्ट मध्ये असलेला: चि. आरुष (सर्वेष सरांचा मुलगा.), पाठमोरी असलेली माझी मुलगी कु. स्वराली.

Mipakatta@Nashik
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट).  सौ. पाषाणभेद (अर्चना)- (राखाडी पंजाबी सुट)

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), श्री. जानू (निळसर शर्ट).
निळ्या टी शर्ट मध्ये असलेला: चि. आरुष (सर्वेष सरांचा मुलगा.), पाठमोरी असलेली माझी मुलगी कु. स्वराली.

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), पाषाणभेद (पोपटी शर्ट).
सौ. पाषाणभेद (अर्चना)- (राखाडी पंजाबी सुट), सौ. कुलकर्णी मॅडम - (हिरवा पंजाबी सुट)

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
मिपाकट्याला उपस्थित: मिपाकर आयडी असलेले:- श्री. हरी (चौकटी शर्ट), श्री. वकीलसाहेब (पांढरा शर्ट), चि. पार्थ कुलकर्णी (श्री. कुलकर्णी साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव), श्री. जानू (निळसर शर्ट).

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

मिपाकर त्यांच्या कुटूंबीयांसोबत मिपाकट्याला आले होते. उपस्थित: डावीकडून: सौ. कुलकर्णी मॅडम, सौ. बोरसे मॅडम, झाडावर बसलेली कु. स्वराली, कु. आरूष, सौ. लोहार मॅडम, कु. प्रज्ञा.

(तिनही महिला शिक्षिका असून सर्व जणी मराठी विषयच शिकवितात हा दुर्मीळ योगायोग आहे.)

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
लहान मुले धबधब्याच्या टोकावरच्या टेकडीवर गेले होते.

मिपाकट्टा@Nashik
मिपाकट्टा साजरा झाला त्याच्या जवळील दरी गावाजवळ असलेले दर्‍याईमाता देवस्थान.
पाठमोरे असलेले श्री. सर्वेष सर (मिपाआयडी - जानू.)

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
दर्‍याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी, तसेच लांबवर दिसणारे काश्यप्यी धरणाचे पाणी.

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१

दर्‍याईमाता मंदीरातून दिसणारे विहंगम दृष्य. धबधबा, दरी.

मिपाकर वरचेवर कट्टाभेट म्हणजेच गाठभेट किंवा गेट टुगेदर करतात. नाशकात आजपर्यंत जाहीर मिपाकट्टा कधी झाला नाही. या आधी आम्ही नाशिककर वरचेवर भेटत असतोच. या कोरोनाकाळात त्याला अल्प विश्रांती भेटली होती. त्यावर उतारा म्हणून मिपाकट्टा नाशिक येथेच करण्याचे आम्ही नाशिककरांनी ठरवले होते. बाहेरगावातून येणार्‍या पाहूण्यांची सरबराई करण्याची, त्यांची ठेप, व्यवस्था राखण्याची जय्यत तयारी आम्ही नाशिककरांनी केली होती. पण या कट्याला बाहेरगावचे कुणीही पाहूणे आले नाहीत हे सत्य आहे. आमचा त्यांचेवर राग असणार आहेच. असो.

तर कट्याचे नियोजन कसे करायचे यासाठी नाशिक तसेच इतर ठिकाणच्या मिपाकरांशी संपर्क साधला. त्यात कट्याचा दिवस व ठिकाणावरून बरीच खलबते झाली. अनेक जणांनी यंदाचा कट्टा मुंपुठाच्या (मुंबई, पुणे, ठाणे) आसपासच घ्यावा असा आग्रह धरला होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे नाशिकला जाहीर कट्याचे प्रायोजकत्व कधीही मिळाले नसल्याने आमचा आग्रह ह्या कट्यासाठी नाशिक शहराला होता. एकदाचे नाशिक ठिकाण जाहीर करून या प्रश्नावर तोडगा काढला गेला. तसेच या भेटीत मिपाकर त्यांचे कुटूंबीय सदस्य देखील आणू शकतात हा ठराव मान्य करण्यात आला. आपले कुटूंबीय जर अशा कट्टा भेटीत सामील केल्याचा आनंद वेगळाच असतो.

एकदाचे ठिकाण ठरल्यानंतर आता भेटीसाठी हॉटेल शोधणे आले. नाशकात अनेक हॉटेल्समध्ये मिसळ मिळते. नाशकात एक खडा मारला की तो खडा दहा मिसळवाल्यांना लागतो (असे मीच म्हणतो.) मुंबई तसेच पुण्याच्या रस्त्याच्या हॉटेल्सला वगळण्यात आले. कारण असे की, तेथे शांततेने मिसळीचा आनंद घेता आला नसता. नाशकातल्या उत्तरेकडील बाहेरच्या भागात मखमलाबाद गावाच्या रस्त्यावर निसर्गरम्य वातावरण आहे. हे गाव नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येते तरीदेखील गावाने गावपण अजून जपले आहे. (येथेच अभ्या अन लतीकेची मराठी मालीका 'सुंदरा मनामध्ये भरली' याचे चित्रीकरण होत आहे.) तेथील गंगापूर गाव व धरणाकडे जाणार्‍या रस्त्याला अनेक हॉटेल्स आहेत. तेथले एक 'पेरूची वाडी' या नावाचे हॉटेल ठरवले. आदल्या दिवशी तेथे फोन करून आमचे टेबल बूक करण्यात आले.

त्या आधी मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ अशा अर्थाचे दोन बॅनर्स मिपाच्या लोगोसहीत छापून घेतले. बॅनर तयार करणारा मुलाशी (दुकान मालक) बॅनर तयार होत असतांना गप्पा मारत बसलो. त्याला असल्या कट्याचे अप्रूप वाटले. त्याने लावलेल्या रेट बोर्डावरील रेट पेक्षा ५०% कमी रक्कम तो आकारत होता. मी त्याला त्याचे कारण विचारले तर तो म्हणाला की, "तुम्ही एवढे चांगले काम करत आहात. मग तुमच्याकडून कमीच पैसे घेईन वगैरे." मी त्याला सगळे पैसे देऊ करूनही तो पैसे कमीच घेत होता. मग मात्र मी जास्तीचे १०० रूपये तेथल्या एका मुलाच्या हातात दिले. त्या दुकानदार मुलाला मी मिपावरील लेख वाचन करण्यास सांगितले. त्यानेही वेळ मिळाल्यास वाचेन असे आश्वासन दिले.

बॅनरवर मिसळपाव.कॉम असे लिहील्याने मिसळपावच हॉटेलातला मेन्यू आपोआप ठरला गेला. सकाळी साडेनऊ वाजता हॉटेलात भेटण्याचे ठरले गेले. तशा अर्थाची झुम मिटींग आदल्या दिवशी झाली.

मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ रोजी हजर असलेले मिपा सदस्य व त्यांच्या कुटूंबीयांची नावे येथे आधीच लिहीतो म्हणजे लिखाणाला/ वाचनाला संदर्भ लागेल.

- मिपाआयडी- वकिलसाहेब असलेले श्री. संतोष भोई सर.
- मिपाआयडी- हर्‍या असलेले श्री. शिरीष कुलकर्णी साहेब, सौ. कुलकर्णी मॅडम, चि. पार्थ.
- मिपाआयडी पाषाणभेद असलेला सचिन बोरसे, सौ. अर्चना बोरसे, कु. स्वराली.
- मिपाआयडी जानू असलेले श्री सर्वेष लोहार सर, सौ. लोहार मॅडम, कु. प्रज्ञा, चि. आरुष.

मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१
( कट्टाभेटीचे हे केवळ प्रातिनिधीक छायाचित्र आहे. या आधीच कट्टा भेटीचे इतर छायाचित्रे प्रकाशीत केले आहेत. कृपया ते पहावेत.)

तर मिपा कट्याच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक ०३/१०/२०२१ रोजी आपले वकील साहेब हॉटेलमध्ये सर्वात आधी म्हणजे नऊ वाजेच्या दरम्यान पोहोचले होते. मी देखील त्याच दरम्यान पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो पण नेमके आनंदवली पुढे चांदशीच्या रस्त्याचे काम चालू असल्याने मला पुन्हा माघारी यावे लागले व लांबचा रस्ता जवळ करावा लागला. त्यात वेळ गेला. अर्थात मी जास्त वेळ न जाता मी 9:40 च्या दरम्यान पोहोचलो. त्यानंतर कुलकर्णी साहेबांचा फोन आला. त्यानंतर ते घरून निघाले. ते जवळच राहत असल्याने व त्यांना चांदशीच्या नव्या होणार्‍या रस्त्याचा बायपास माहीत असल्याने ते लगोलग पोहोचले.

हॉटेलमध्ये आल्यानंतर सगळ्यांची व एकमेकांच्या कुटूंबातील सदस्यांची ओळख पाळख झाली. पेरूची वाडी हॉटेल हे पेरूच्या बागेतच केले आहे. पेरूची झाडे पेरूच्या बहाराने लगडलेली होती. सर्वेष सर (जानू) व कुटूंबीय अजून पोहोचले नव्हते. त्यामुळे जमलेल्या मंडळींनी पेरूच्या बागेत फोटो काढले. कुणी झाडावर चढून तर कुणी झोक्यावर बसून मजा केली. तेथेच ताजे पेरू विक्रीला होते. मंडळींनी ते पेरू विकत घेतले. सर्वेष सर अजूनही हॉटेलात पोहोचले नव्हते. ते देखील चांदशीच्या नव्या रस्त्यात अडकले होते. मग कुलकर्णी साहेबांनी त्यांना फोनवरून मार्गदर्शन केले. तो पर्यंत मिसळीची ऑर्डर दिल्या गेली होती. मंडळी मिसळ पावाचा आस्वाद घेत होती. जरा वेळाने सर्वेष सर त्यांच्या कुटूंबासमवेत हॉटेलात पोहोचले. मग लगोलग त्यांच्या डीशची ऑर्डर दिल्या गेली. तेथेच ओळख होवून गप्पा सुरू झाल्या. महिला वर्ग गप्पात रंगला होता. मिसळीचा आस्वाद घेणे सुरू होते. तिनही महिला शाळेत मराठी विषय शिकवत आहेत हा एक योगायोग होता. त्यामुळे त्यांच्या गप्पांना निराळाच संदर्भ लाभला.

मिसळ खाऊन झाल्यानंतर गुळाच्या जिलेबीच्या रिपीट ऑर्डरी दिल्या गेल्या. त्यानंतर तेथे पेरूच्या स्वादाचे आईस्क्रीम छान मिळते अशी बातमी कुलकर्णी सरांनी दिली. त्याचा आस्वाद घेण्यात आला. एकूणच आईस्क्रीम छान होते. आता हॉटेलमध्येही गर्दी वाढलेली होती.

खाणे झाल्यानंतर पेरूच्या बागेत पुन्हा फोटो काढल्या गेले. या ठिकाणाहून जवळच आठ एक किमीवर डोंगरावर एक दर्‍या धबधबा आहे. तेथे जाण्याचे आमचे ठरले. वकीलसाहेबांना कामामुळे लगेच निघायचे असल्याने त्यांनी निरोप घेतला. कुलकर्णी दांपत्यानेही पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला. सर्वेष सर व माझे कुटूंब यांनी धबधब्याला भेट देण्याचे ठरवले. धबधब्याचे जवळचे गाव दरी आहे. रस्ता छान शेतातून जाणारा होता. पावसाने शेती बहरली होती. हिरवीगार शेती व वळणाचा डोंगरावर जाणारा रस्ता पाहून मन प्रसन्न होत होते.

धबधब्याच्या बाजूलाच दर्‍या मातेचे डोंगरातल्या कपारीत मंदीर आहे. तेथे जाण्यासाठी पायर्‍या आहेत. मंदीरातून समोरची दरी, बाजूचा धबधबा समोरच्या धरणाच्या पाण्याचा विस्तार दिसत होता. सर्वेष सर मुलांना, महिलांना धबधब्याच्या टेकडीवर चढून गेले. वरती एक छोटासा बांध होता. मी धबधब्याच्या खाली असलेल्या छोट्या पुलाच्या खाली बसून विश्रांती घेतली. कु. प्रज्ञा, चि. आरूष व कु. स्वराली या मुलांनी धबधब्याच्या परिसराचा खरा आनंद घेतला. ते चारही जण भरपूर वेळ धबधब्याच्या काठावर, वरती टेकडीवर होते.

त्यानंतर तेथून निघण्याची वेळ झाली. मखमलाबाद पर्यंत आमच्या गाड्या एकत्र धावल्या व नंतर आमचा मार्ग निराळा होवून आम्ही एकमेकांच्या कुटूंबाचा निरोप घेतला.

अशा रितीने मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ साजरा झाला.

या प्रतिसादाच्या आधीच कट्याच्या भेटीचे, हॉटेल तसेच धबधब्याचे, दर्‍या मातेच्या मंदीराजवळील फोटो टाकले असल्याने आपणास कोण कोण आले होते याची कल्पना आलीच असेल.

कार्यबाहूल्यामुळे मिपाकट्याच्या वृतांता टाकण्यास खूपच उशीर झाला असल्याने क्षमस्व. (शुद्धलेखन तपासले नसल्याने लिखाणातल्या चूकांकडे दुर्लक्ष करावे.)

नाशकात होणार्‍या आगामी कट्ट्यास तुम्हा सगळ्या मिपाकरांस आताच आमंत्रण देत आहे, हे सांगून मिपाकट्टा@नाशिक दि. ०३/१०/२०२१ चे वृतांतलेखन येथेच थांबवतो.

कळावे,

तुमचाच,
पाषाणभेद.
११/१०/२०२१

अरी ओ फरजाना

अरी ओ फरजाना दरवाजा खोलना
बाहर खडा हूं मै अंदर मुझे है आना

कबसे कर रहा हू मै इंतजार
अंदर आने को मै बेकरार
नही सुनती क्या तू मेरा इकरार
अब ना कर तू मनमानी मुझे है तुझे पाना

जरा देख तो ले मै क्या लाया
मेरे हाथ मै है यह हार नया
चूडी भी है उसके साथ साथ
पहनोगी तो सुंदर लगे तेरे हाथ
बालों की सुई मै लगा है हिरा पन्ना

अपना झगडा तू अब छोड दे
आपस की बाते आपस मे रहने दे
काहे तू जाय मैके क्या है वहा
मै तेरा आशिक खडा है यहा 
भूल जा सारी दुनिया पर मुझे न भुलना