भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसृत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी. परंतु या सर्व कारणांमध्ये भारतीय अन्नाची चव व ते अन्न रूचीदार बनवणार्या गृहीणी किती कारणीभुत आहेत?
या गृहीतकामागे बर्याच घरांमध्ये भारतीय अन्नपुर्णा घरी अन्न बनवतात असे गृहीत धरलेले आहे. भारतीय पदार्थ चविष्ट असण्यामागे या अन्नपुर्णांचा हात स्पष्टपणे असतो. सढळ हाताने चमचमीत अन्नपदार्थ, मिठाया बनवण्यात सर्व जगात पहिल्या क्रमांकासाठी भारतीय उपखंडातल्या स्त्रीयांचा समावेश करावा लागेल. आपल्या उपखंडात मसाल्याचे पदार्थांचा मुबलक वापर केला जातो. हे फार पुर्वीपासून चालत आलेले आहे. त्याकाळातही असल्या आजारांचे प्रमाण येथल्या उपखंडात जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याबाबतीत त्याकाळी शास्त्रशुद्ध अभ्यास नसल्यामुळे ती आकडेवारी मिळणार नाही.
भारतीय नारी ही घरातल्या व्यक्तीच्या खाण्याच्या आवडीनिवडीबाबत फारच जागरूक असते. पतीला ही भाजी आवडत नाही - नको डब्यात द्यायला, मुलाला डब्यात निरनिराळे पदार्थ देणे जेणेकरून तो शाळेत डबा संपवेल, असे तीचे चालू असते. अर्थात या सर्वांत त्या स्त्रीचे कुटूंबाप्रती असलेले प्रेमच निर्देशीत होत असते. असल्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला आदर आहेच, त्यात वाद नाही. एखादा पदार्थ जर चांगला झाला अन तो आग्रहपुर्वक वाढण्यात आला तर त्यास सहसा नकार न देता दोन घास जास्तीचे खाल्ले जातात हा अनुभव आपणास एकदातरी आलेला असेलच.
आणखी एक उपमुद्दा येथे येवू शकतो तो म्हणजे आपल्याकडचे सण-समारंभ आणि उत्सव. यांचेही प्रमाण इतर समाजात व भारतीय समाजात व्यस्त आहे. महिन्याकाठी एकतरी सण समारंभ आपल्या संस्कृतीत करण्याचे प्रमाण आहे. त्यावेळी काहीतरी गोडधोड, चमचमीत पदार्थ घरी केले जातात.
भारतीय समाजात वाढणारे आजारपणाची सामाजीक व्याप्तीला नवीन दिशा मिळण्याच्या हेतूने वरील सर्व मुद्दे लक्षात घेवून चर्चा अपेक्षीत आहे. (या चर्चेत अमेरीकन्स पण जाड होतायेत, पिझ्झा बर्गर यांची भारतातही चंगळ होते आहे हे टाळावे. संशोधन करणार्या बर्याचशा संस्था ह्या अमेरीकन (अभारतीय) असल्याने बहूतेक शारीरीक स्केल्स ह्या अमेरीकन/ ब्रिटीश लोकांनाच गृहीत धरून असतात. उदा. BMI, उंची/ वजन/ रक्तदाब यांचा रेशो आदी.
No comments:
Post a Comment