Saturday, July 17, 2010

पाऊस आला

पाऊस आला


पाऊस आला पाऊस आला पडू लागल्या धारा
थेंबांच्या नक्षीला साथ द्याया धावे अवखळ वारा ||

अलगद हलक्या सरी येवूनी सुरू होतसे वर्षाव
वेग वाढूनी जोर येतसे धारेला नसतो ठाव
क्षणात ओली होई धरती पडता असंख्य धारा ||१||

नभातून तुषारांचे पडती बारीक बारीक थेंब
धरती होईल हिरवी अवघी लेवूनी हिरवे कोंब
हिरवाईची किमया होईल निसर्ग बदलेल सारा ||२||

- पाषाणभेद
१७/०७/२०१०

3 comments:

Meenal Gadre. said...

छानच आहे कविता!
विषय एव्हर ग्रीन आहेच.
यमक, शब्द मांडणी ही छान जमली आहे.

पाषाणभेद said...

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.ane

prabhavati said...

vaah. chhaan !