http://www.misalpav.com/node/12769 या लेखाचे विडंबन
माननीय मिपाकरहो,
या पूर्वी मी काही उपयोगी धागे काढले म्हणून कौतूक केले त्यामूळे जाहीर आनंदून मी हा धागा काढत आहे. तसे माझ्यासमोर इतरही पर्याय होते! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला नाही आहे असे नाही.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी देवळातून बाहेर येणार आहे आणि मला माझ्या जीभेला एक चटकदार, टेसदार, चमचमीत, खमंग खावू घालायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही खाल्लं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे.
इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते. तो दिवस आम्ही हॉटेलमध्ये मध्ये किंवा मुंबईतल्या एखाद्या गल्लीतून (भिक मागून) परत (देवळात) येता येईल अशा ठिकाणी घालवू शकतो. माझ्याकडे मुंबई मध्ये अस्सल भिकार्याचा गेटप उपलब्ध आहे. रूपांतर करण्यात मी एक्स्पर्ट आहे. लेडी भिकारीण चा गेटप उपलब्घ आहे पण मी लेडी नाही. मी मुंबईचा आहे त्यामुळे कुठुन कसं जायचं व रस्ते मला ठाऊक आहेत. माझं भिकेचं बजेट आहे १० दिवसांचं. अर्थात तेवढे मिळालेच पाहिजेत असं काही नाही पण काही झकास दाता असेल असेल तर तयारी आहे. मी पट्टीचा शिळेपाकेआहारी असून तिलाही शुद्ध चटकदार, टेसदार, चमचमीत, खमंग अन्न नेहमी लागते.
आता पर्यंत माझ्या समोर आलेले पर्याय असे:
१. ताज कॉन्टीनेंटल ब्रंच: ताज कॉन्टीनेंटला जाण्याची ही योग्य वेळ आहे का? कर्जत पासूनची लोकल जुलैमधल्या पानकाळ्यात चालू असते का? इंटरनेटवरील साईट वाचून थोडी फार माहिती काढली आहे पण मी स्वतः कधी तिकडे गेलो नाही. आपोलो बंदर पर्यंत जाण्यास लंगडत जावे किंवा घसरगाडी वापरावी की भीक मागत मागत लोकलने? लंगडत जाण्यास मजा येईल की वाट लागेल? भीकेचं काय? भीक कमी मिळाली तर लंगडत जाणे शक्य आहे का?
२. गुजराथी थाळी : गुजराथी थाळी मध्ये मटण, कोंबडी आणखी काही मांसाहारी असते का? मस्त नळीतोड १२ नं मिळेल?
३. भात: पदार्थ छान आहे पण आख्खे १० दिवस भातच खावून करायचे काय हा प्रश्न आहे.
४. धर्मशाळा / अन्नछत्र/ सदावर्त: तिथे जाऊन परत शिळेपाके अन्न काय खायचे असं एक मित्र म्हणाला त्यामुळे हा पर्याय कितपत चांगला आहे याची कल्पना नाही.
फक्त अन्नपदार्थांच्या डिशच नव्हे तर तिला सरप्राईज देण्यासाठी आणखी काही पदार्थ असतील तर उदा. रानभाज्या - टेरी (पावसाळी आळू), सुकं मटण / (व्हेज व्हर्जन), पुदिना पुलाव वइतर पदार्थ (आठवा तुम्ही चापलेले/ तुम्ही खावू घातलेले चमचमीत पदार्थ) तर ते पण सांगा.
अनुभवी मिपाकर खवय्यंना/ खिलवयांना या प्रसंगी मदत करण्यासाठी मी कळकळीचे आवाहन करतो. सखोल रेसेपी लिहायला वेळ नसेल तर जाताजाता मेनूकार्डावरचे पदार्थ सांगितलीत तरी चालेल.
भीक द्यायची नसेल तर नका देवू हो पण चमचमीत हादाडण्याचा जेवणाचा विषय बाजुला पडु नये एवढीच अपेक्षा.
आणखी काय मागू? भीकेच्या अपेक्षेत !
~
भिकमांग्या
(उद्यापरवा हनिमुन ला काही मदत लागलीच तर अशीच चौकशी करेल)
No comments:
Post a Comment