Saturday, June 26, 2010

गीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना

पहाटे पहाटे जवळ तू ये ना


पहाटे पहाटे जवळ तू ये ना
धुंदीत झोपतांना जागी तू हो ना
पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ||

थंडी गुलाबी न सोसणारी
अशातच रात्र गेली न संपणारी
अनुभूती वेगळी सारी, आली माझीया तना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||१||

आठवणी सार्‍या डोळ्यात जाग्या होवोनी
झोप ही सुखाची डोळ्यात येवोनी
स्वप्नात माझ्या तू येशी का पुन्हा पुन्हा
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||२||

आठवून सारी रात झोपलेली
उमगते गुढ काव्य मंतरल्या वेळी
रोम रोम फुलले अंगी सुखावी तना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||३||

मखमली त्या केसांत सारे
विश्व माझे मलाच फासणारे
गुंतवून माझे मला मी सोडवू कुणा
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||४||

मोगर्‍याचा सुगंध वेड लावतो जीवा
माळलास तो तेव्हाचा, कुस्करला केव्हा?
समरसून अलिंगना नाही म्हणू नको ना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||५||

पहाटे पहाटे जवळ तू ये ना
धुंदीत झोपतांना जागी तू हो ना
पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०६/२०१० ( पहाटे ५:१७!)

1 comment:

प्रसाद पवार said...

छान कविता वाटली.
त्यालाच जोडून काही सुचले ते लिहित आहे

पहाटे पहाटे मिठीत तू ये ना
मिठीत येऊन सार जग विसरून जा ना
बेधुंद होऊनी समरस हो ना
एकमेकांत गुंतून जाऊ ना