मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या थोडे आधी सरसगडावर जाण्याचे झाले. मी आणि माझा पालीतला भाचा -शुभम- असे दोघे जण सकाळी ११ वाजता बल्लाळेश्वराचे नाव घेवून घरातून निघालो.
छाया. १. निघतांना आम्ही एका बॅगेत खाण्याचे पदार्थ, पाणी आदी. घेतले.
छाया. २. गडाखालच्या विस्तीर्ण पठारावर आस्मादिक व शुभम
छाया. ३. सरसगडाचे खालून घेतलेले छायाचित्र १
छाया. ४. सरसगडाचे खालून घेतलेले छायाचित्र २
छाया. ५. या ठि़काणी आम्ही थांबलो असतांना आमच्या मागून ग. बा. वडेर हायस्कूलची शुभमच्या वर्गातली ४ मुले भेटली. ती शाळा बुडवून आली होती. (असे ते नेहमीच येत असे समजले.) ती मुले आम्हास वाटाड्या म्हणून नंतर उपयोगात आली.
छाया. ६. थोडे पुढे गेल्यानंतर दिसणारा गड. या दोन दिसणार्या भागात पायर्या खोदलेल्या आहेत. (नंतर छायाचित्र येत आहेच.)
छाया. ७. मागे वळून बघतांना दिसणारे पठार
छाया. ८. गडाच्या पहिल्या टप्प्यावर एक गुहा खोदलेली आहे.
छाया. ९. खालून वर जाणार्या पायर्या
छाया. १०. वरून खाली दिसणार्या पायर्या
छाया. १२. घळीतून दिसणारा समोरचा देखावा
छाया. १३. पायर्या संपल्यानंतर लागणारा पहीला दरवाजा
या नंतर आमच्याकडचे पाणी संपले आणि गडावर असलेल्या १ ल्या पाण्याच्या टाक्यातुन पाणी भरून घेतले.
छाया. १४. या ठिकाणी असलेली नैसर्गीक खोबण. येथे गडकरी राहत असावेत. (आपली नावे गडावर टाकणार्यांना चाबकाने फोडले पाहीजे. )
छाया. १५. या ठिकाणावरुन दिसणारे गडाच्या पाठीमागील द्रुष्य
छाया. १६. दुसर्या टप्प्यात आम्ही येथे डबा खाल्ला आणि थोडी विश्रांती घेतली.
छाया. १७. तिसरा टप्पा थोडा अवघड आहे. सरळ चढाईवर पाय सरकू शकतो. गडमाथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे.
छाया. १८. गडावरून दिसणारे सुधागड एज्यू. सोसा. चे ग. बा. वडेर हायस्कूल. शाळेत होणार्या वार्षीक क्रॉसकंट्री स्पर्धेत काही मुले शाळेतून येणार्या वाटेने ३० मिनीटात गडावर येतात.
छाया. १९. गडावरून दिसणारी अंबा नदी
छाया. २०. गडाच्या उत्तरे कडील द्रुष्य. गडावर येण्यासाठी उत्तरेकडुन पण बिकट वाट आहे.
छाया. २१. आणखी एक द्रुष्य
गडावर थोडे थांबुन ईतिहासातील अनाम विरांचे स्मरण करून आम्ही खाली उतरलो. शाळेतली मुले केव्हाच पसार झाली होती. खाली येण्यास ४:३० झाले होते.