शिडाशिडात भरारे वारा
शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||
होड्या निघाल्या किनारा || धृ ||
फिरवा सुकाणू सारी जाली भरली
मांदेली नगली करली तारली गावली
गोळा करुन घोळ चिंबोरी अन पाला
होड्या निघाल्या किनारा ||१||
घेवून दर्याची दौलत हाती
विकून होईल कमाई मोठी
पडो शिल्लक पैसा थोरा बरा
होड्या निघाल्या किनारा ||२||
उभी आसलं माझी बाय पाहत वाट
"कवा येईल धनी माझा परतून आज"
तिच्या कालजीचा आज होईल उतारा
होड्या निघाल्या किनारा ||३||
शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||
- पाषाणभेद कोळी
०३/०४/२०१९
No comments:
Post a Comment