Tuesday, November 15, 2011

शब्द

शब्द
शब्द ऐकतो शब्द बोलतो
शब्दांचे वार झेलूनी
शब्दांचेच प्रहार करतो

शब्द कधी गळ्यात पडती
हार होवूनी खोटे सुखवती
स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती

नफा नुकसान व्यवहार जेव्हा
नजरेसमोर जाणवतो केव्हा
शब्द गिळतो शब्द फिरवीतो

शब्द जोडतो शब्द पेरतो
रूजवूनी त्यांना कागदावर
शब्दांचीच शेती करतो

शब्दांचा आधार बोलण्याला
शब्दच साह्य करी भावनांना
शब्द नसता बोलतो निशब्दांना

- पाषाणभेद
१४/११/२०११

No comments: