डोक्याला ताप नाही
आपण पैसे देवून वर्तमानपत्र खरेदी करतो ते काही आपल्याला मानसीक त्रास व्हावा म्हणून नाही. अगदी महत्वाच्या बातम्या देवून कोणाचे भले झाले आहे? सकाळमध्ये असल्या बातम्या वरचेवर यायला लागल्या आहे. वाचा : नितीशकुमारही बनले मांसाहारी. मागेही त्याने (सकाळने) 'लालू मांसाहारी बनले', राहूल गांधीने ईडली सांबर खाल्ले असल्या (बीपी न वाढवणार्या बातम्या) दिल्या होतात. आपल्या आरोग्याची काळजी करणारे आता फार वृतपत्रे (सकाळच नाही तर इतरही. सकाळ हे प्रातिनीघीक नाव येथे आले.) निर्माण होत आहेत ही चांगली बातमी आहे, नाही?
सकाळसारख्या वृतपत्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अवांतर: बिहार मधल्या वृतपत्रांत महाराष्ट्राच्या पुढारी फाडार्यांविषयी असल्या पांचट बातम्या येत असतील काय?
No comments:
Post a Comment