फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?
साधारणता: १९८० च्या दशकात ज्यावेळी दुरदर्शनवर वाहिन्यांचा सुळसूळाट चालू झालेला नव्हता त्या काळी दिल्ली दुरदर्शनवर वरचेवर भारतीय फिल्म डिव्हीजन ने तयार केलेल्या काही कार्टून फिल्म दाखवल्या जायच्या. सदर फिल्म्स ह्या देशभक्तिपुर्ण, अर्थपुर्ण, संगीतमय व काहीतरी उद्दात हेतू असणार्या होत्या. त्यातल्या माझ्या लक्षात राहिलेल्या काही म्हणजे
१) अन्न का हर दाना बचाईये
२) एक चिडीया (अनेकता में एकता) (डायरेक्शन: विजय मुळे, संगीतकार:वसंत देसाई, अॅनिमेशन: भीमसेन, 'हिंद देश के निवासी' : पंडित विनय चंद्र)
सगळी फिल्म संपली की मग 'फिल्म्स डिव्हीजन कीं भेंट' अशी पाटी यायची. वरचेवर या फिल्म्स लागत असल्याने (त्या काळी कार्यक्रमही मर्यादितच होते.) या फिल्मस मधील गाणे तोंडपाठ होत असत. घरातले छोटे, मोठे लोक या फिल्म्स आवडीने बघत असत. असल्याच फिल्म्स, काही सामाजीक जाहिराती (उदा. रेल्वे क्रॉसींग, रक्तदान, एडस् आदी.) फिल्म डिव्हीजन कडून दाखवल्या जायच्या. ह्या फिल्म्स मी थेटरातही चित्रपट सुरू होण्याच्या आधी बघितल्याचे स्मरते. काळाच्या ओघात ह्या असल्या सामाजीक जाहीराती दुरदर्शन वर येणे कमी झाले. एकतर फिल्म चा वेळ जास्त, देशभक्तिची /अधिकार्यांची उदासीनता, जाहीरातींचा मलीदा मिळवण्याची हाव ही कारणे या असल्या फिल्म च्या अघोगतीस कारणीभूत ठरत असतील.
असो. एक आनंदाच्या ठेव्याला या फिल्म्स/ जाहिराती न बघणारे मुकले आहेत.
या लिंकवर हा खजिना आपल्याला मिळू शकतो.
(हा धागा वाचून परत काही जण 'जुन्यातून बाहेर या, कधी मोठे होणार?' आदी आरोप करतील. त्यांना माझे एकच सांगणे आहे, मी लहान असतांना या फिल्म्सनी मला आनंद दिला जो आनंद तुम्हाला आताचे शिंग चॅन, पॉवर रेंजर, बेन टेन पाहतांना होतोय. मी सुद्धा या आताच्या फिल्म्स एंजॉय करतो. आगामी काळात या आताच्या फिल्म्स काळाच्या पडद्याआड गेल्या तर आपणासही असला धागा काढूशी वाटेल.)
No comments:
Post a Comment