मी घेतली यॉट
ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.
मी तर घेतली बाबा यॉट
फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट
मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ ||
नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे
अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे
मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१||
इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड
मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट
मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२||
आय.आय.टी., आय.आय.एम. शिकलोय
मोठ्या कंपनीत मध्ये मॅनेजर झालोय
मल्टीनॅशलांचे दररोज कॉल येती सत्राशेसाठ ||३||
नकोच ते मुलूंड ठाणे माहीम बोरीवली चेंबूर घणसोली कोपर येथे राहणे
किंवा नकोच ते सदाशिवपेठीय वागणे
कुलाबा पाली हिल किंवा पाषाण कर्वेनगरातील घेतलाय मोठा ब्लॉक ||४||
मी तर घेतली ब्वॉ यॉट
मी तर घेतली ब्वॉ यॉट
- यॉटकरी यॉ - पाषा भेदकर
प्रश्न:
१) यॉट कशाचे प्रतीक आहे?
२) मुलूंड ठाणे माहीम, बोरीवली, चेंबूर, घणसोली, कोपर येथे कोण राहते? (उपेक्षीत व्यक्तीसमुहाचे नाव अपेक्षीत)
३) वर प्रश्न क्रमांक २ मधे राहण्यार्या ठिकाणांव्यतिरीक्त इतर ठिकाणी कोण राहते? (अपेक्षीत व्यक्तींचे उल्लेख अपेक्षीत.)
४) आय.आय.टी., आय.आय.एम. मध्ये कोण शिकू शकतात?
५) चार महाग असलेल्या चारचाकी वाहनांची नावे सांगा.
(मिळून मिसळून【ツ】या व्हाटसअॅप गृपवर पुर्वप्रकाशीत. (येथे केवळ मिपावासीयांना प्रवेश आहे. सामील होण्यासाठी "उपयोजक" या सदस्यांशी संपर्क साधावा.)
वरील झैरातीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही हे बोलून मी माझे भाषण संपवतो.