मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ||
मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||१||
भाजी पाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात
मोठ्या नोटा सोडून सार्या सुट्टे पैसे नव्हते हातात
दररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||२||
बँकेमध्ये नोटा बदलायला भली मोठी लाईन
लाखो रूपये भरले तर इन्कमटॅक्स फाईन
एटीएम झाले बंद पर्स माझी रिकामी केली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||३||
हे मात्र छान झाले काळा पैसा बाहेर आला
भ्रष्ट्राचार लाचखोरीचा एक मार्ग बंद झाला
ह्या उपायांनी धनदांडग्यांची दातखीळ बसली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||४||
- पाषाणभेद