गणेशा वंदन तुजला आता
गणेशा वंदन तुजला आता
तुझ्या चरणी ठेवीतो माथा ||धृ||
कुशल बुद्धीचे दैवत तू रे
आम्हां मुढास सुबुद्धी दे रे
सुगम होवूदे गौळण वग कथा
गणेशा वंदन तुजला आता ||१||
मुर्ती तुझी तुंदील तनू हासरी
आनंदे भरती येई बघता नाचरी
नृत्य गायने हरू दे रसीक व्यथा
गणेशा वंदन तुजला आता ||२||
कला चौसष्ट चौदा विद्या
पारंगत असशी विघ्नहर्ता
सफल कार्य होई गण तुला अर्पीता
गणेशा वंदन तुजला आता ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०८/२०१०
गणेशा वंदन तुजला आता
तुझ्या चरणी ठेवीतो माथा ||धृ||
कुशल बुद्धीचे दैवत तू रे
आम्हां मुढास सुबुद्धी दे रे
सुगम होवूदे गौळण वग कथा
गणेशा वंदन तुजला आता ||१||
मुर्ती तुझी तुंदील तनू हासरी
आनंदे भरती येई बघता नाचरी
नृत्य गायने हरू दे रसीक व्यथा
गणेशा वंदन तुजला आता ||२||
कला चौसष्ट चौदा विद्या
पारंगत असशी विघ्नहर्ता
सफल कार्य होई गण तुला अर्पीता
गणेशा वंदन तुजला आता ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०८/२०१०