Monday, March 23, 2009

दररोजच्या भाजीच्या कटकटीपासून मुक्ती

घरातील ग्रूहीणी होणे म्हणजे फार कठीण आहे. त्यातल्या त्यात नोकरी करणारी स्री म्हणजे तारेवरची कसरतच. दररोज घर आवरणे, लहान मुलांचे करणे, घरातल्यांची मर्जी सांभाळणे ह्या फार अवघड गोष्टी आहेत. त्यात भर म्हणजे दररोज जेवणात / डब्यात काय भाजी करावी ही कटकट.
या भाजीच्या काळजीवर मी माझ्या परीने (वतीने) मी खालील उपाय सांगत आहे.
एक पदार्थांची यादी बनवायची. (मेनु कार्ड नव्हे.) त्यात सगळ्या भाज्या / न्याहारीचे पदार्थ / बनवण्याच्या पध्दतीनुसार वर्गीकरण (नुसत्या भाताचे १५० च्या वर प्रकार आहेत.) यानुसार एक यादी बनवायची. या यादीत पदार्थांची रेसीपी नाही तर फक्त पदार्थांची नावे पाहिजे.
सगळ्या भाज्या, त्यांचे वर्णन इ. माहीती कुठल्याही पदार्थांच्या ४/५ (रेसीपी बुक) पुस्तकात मिळेल.
{
नंतर यादीतला पहिला पदार्थ (करायला) घ्यायचा. (समजा मेथीची भाजी ही पहिली आहे.)
त्याची सर्व सामुग्री आहे का ते पहावे.( भाजी/ इतर ingredients (भर ??) )आपल्या घरात आज आहे का हे पहावे.
घरातील इतर सदस्यांचे तो पदार्थ आज करण्याबद्दल मत घ्यावे. (मी माझ्या घरी म्हणतो की काही पण चालेल. त्यामुळे हे घरी मला कोणी हिंग लावून विचारत नाही. )
ह्या पदार्थांची सामुग्री नसेल (किंवा इतर काही कारणास्तव बदल, जसे उपवास, रविवार , बाहेरुन 'आनंद' घेउन येणे इ.) तर यादीतला दुसर्‍या क्रमांकाचा पदार्थ घेणे.नंतर...ह्या पदार्थांची सामुग्री नसेल (किंवा इतर काही कारणास्तव बदल, जसे उपवास, रविवार , बाहेरुन 'आनंद' घेउन येणे इ.) तर यादीतला तिसर्‍या क्रमांकाचा पदार्थ घेणे.नंतर...ह्या पदार्थांची सामुग्री नसेल (किंवा इतर काही कारणास्तव बदल, जसे उपवास, रविवार , पाहुणे , बाहेरुन 'आनंद' घेउन येणे इ.) तर यादीतला चौथ्या क्रमांकाचा पदार्थ घेणे.(हा कापुस कोन्ड्या सारखा किंवा if - then - else सारखा लुप- loop होउ शकतो.)
दुसर्‍या दिवशी दुसर्‍या क्रमांकापासुन सुरुवात करावी. (आणि तो वरील loop मधुन टेस्ट करुन घ्यावा. )
}
भाजी / पदार्थ करतांना फ्रिज मधील उपलब्ध भाजी किंवा घरातील उरलेले पदार्थांचापण विचार करावा. (उदा. उरलेला भात फोडणी लावुन छान लागतो.)
ही यादी फार मोठी होऊ शकते. (आपले भारतीय पदार्थ फार आहेत.) त्यामुळे एका वहीत ही यादी बनवलीतर फार चांगले. ही वही स्वयंपाकघरात ठेवावी. तिला प्लास्टिक चे कव्हर लावावे म्हणजे स्वयंपाकघरात हात लागून खराब होणार नाही.

No comments: