Friday, April 8, 2011

आले गणपती माझ्या अंगणी

आले गणपती माझ्या अंगणी

आले गणपती माझ्या अंगणी
वाट पाहीली गेल्या वर्षापासूनी

मुकुट शिरावरी दिसे शोभुनी
भरजरी पितांबर अंगी नेसूनी
पुष्पमाला सुगंधी गळ्यात घालूनी
शुंडेसहित एकदंत राखूनी
आले गणपती माझ्या अंगणी

कमळपुष्प हाती धरूनी
दुसर्‍या हाती परशू घेवूनी
एका हाती मोदक लेवूनी
शुभ हाताने आशिष देवूनी
आले गणपती माझ्या अंगणी

वक्रतुंड हेरंब लंबोदर
विकट विनायक विघ्नेश्वर
गणेश महोदर विघ्नहर
अगणीत असली नावे घेवूनी
आले गणपती माझ्या अंगणी

दहा दिवस गणपती येता दारी
रोमहर्षक सोहळा घडतो भारी
मुर्ती तुझी एक सदस्य होई
कुटुंबात सुख आमच्या आणूनी
आले गणपती माझ्या अंगणी

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०८/२०१०

No comments: