Sunday, April 4, 2010

माझी निघाली वार्‍यावरची वरात: पुढील मदत हवी आहे

मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला.

खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की

एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का?

माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.

1 comment:

Mahendra said...

या मधे दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे कॉन्स्टंट आरपीएम असायला हवे, तरच आउटपुट सारखं राहिल.
हवेचा स्पिड वाढला किंवा कमी झाला, तरीही आरपिएम सारखं राहिल तरच प्रोजेक्ट सक्सेस्फुल होइल.
पण छान प्रयत्न आहे.